शुक्रवारी
डाक अदालतीचे आयोजन
बुलडाणा, दि. 14 : पोस्ट विभागाच्या तक्रारी सोडविण्यासाठी
बुलडाणा डाकघर विभागातर्फे शुक्रवारी, दि. 16 सप्टेंबर 2022 रोजी 4 वाजता डाक
अदालत आयोजित करण्यात आली आहे. पोस्टाच्या कार्याविषयी किंवा कामकाजाबद्दल सहा
आठवड्यात तक्रारींचे निवारण झालेले नसल्यास अशा तक्रारींची दखल डाक अदालतीमध्ये
घेतल्या जाणार आहे.
देशातील पोस्टाची सेवा ही सामाजिक आणि आर्थिक जीवनाचा एक
अभिन्न भाग आहे. देशातील प्रत्येक नागरिकांच्या मनामध्ये पोस्टाच्या सेवेने
वेगळ्या प्रकारचे स्थान निर्माण केले आहे. पोस्ट खाते हे लोकांना चांगल्या
प्रकारची सेवा देण्याचा व ग्राहकांचे जास्तीत जास्त समाधान करण्याचा प्रयत्न करते.
ही सेवो देताना संभाषण, पत्रव्यवहार किंवा सेवेमध्यील काही त्रृटीमुळे पोस्टाच्या सेवेबद्दल तक्रारी होतात. तक्रारींचा
योग्य प्रकारे न्याय निवडा करण्यासाठी पोस्ट खात्यातर्फे डाक अदालती घेण्यात
येतात.
विशेषत: टपाल, स्पीड पोस्ट, डाक वस्तू पार्सल, बचत बँक आणि
मनीऑर्डरबाबत तक्रारी विचारात घेतल्या जातील. तक्रारींचा उल्लेख सर्व तपशीलासह
केलेला असावा. तक्रारीत तारीख आणि ज्या अधिकाऱ्यास मुळ तक्रार पाठविली त्याचे नाव
आणि हुद्दा आदी संबधित माहिती डाक सेवेबाबत तक्रार डाकघर अधिक्षक राकेश एल्लामेली,
बुलडाणा विभाग, यांचे नावे दोन प्रतीत गुरूवार, दि. 15 सप्टेंबर 2022 पर्यंत
पोहचेल, अशा रीतीने पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
000000
जिल्हा
रुग्णालयात पोषक आहार पोस्टर प्रदर्शनी
बुलडाणा, दि. 14 : जिल्हा सामान्य रुग्णालयातील बाह्यरुग्ण
विभागात पोषण आहाराबाबत पोस्टर प्रदर्शनी पार पडली. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.
नितीन तडस यांच्या हस्ते प्रदर्शनीचे उद्घाटन करण्यात आले.
सप्टेंबर महिना राष्ट्रीय पोषण आहार माह म्हणून साजरा करण्यात
येतो. पोषण आहार माहनिमित्ताने रुग्णालयामध्ये विविध कार्यक्रम आयोजित केले आहे.
नर्सिंग स्कुलच्या विद्यार्थ्यांनी आहार प्रदर्शनी घेतली. या प्रदर्शनीमध्ये
कुपोषण प्रतिबंधक सकस आहार, गर्भवती व स्तनदा मातांसाठी सकस आहार, मधुमेह व उच्च
रक्तदाब नियंत्रणासाठी आहाराचे नियोजन, तसेच तंबाखू, जर्दा, विडी, सिगारेट, दारु,
गुटखा यांच्या दुष्परिणामाच्या माहितीसाठी प्रदर्शन पार पडले.
सांडपाण्यातून फुलवलेली परसबाग, शोषखड्डा, दोन वर्षापर्यंतच्या
मुलांचे आहार आदी समाज उपय ोगी
आरोग्यदायी आहार प्रदर्शनी आयोजित करण्यात आली. निरोगी जीवन शैलीसाठी सकस आणि
संतुलित आहार घ्यावा, तसेच पोषणमाहनिमित्त राबविण्यात येणाऱ्या विविध
कार्यक्रमांचा लाभ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन डॉ. तडस यांनी केले आहे.
0000000
जिल्ह्यातील
दहा तालुक्यात लम्पींची लागण
*जिल्ह्यात
लसीकरण सुरू
*सतर्कता
बाळगण्याचे आवाहन
बुलडाणा,
दि. 14 : लम्पी आजाराचा जिल्ह्यातील दहा तालुक्यात लागण झाली आहे. यामुळे
जिल्ह्यात पशूंच्या लसीकरणास सुरवात झाली आहे. नागरिकांनी या आजाराबाबत सतर्कता
बाळगावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील देऊळगाव राजा तालुक्यात लम्पी चर्मरोग प्रथमत:
आढळून आला आहे. सध्यापर्यंत 10 तालुक्यात या रोगाची लागण झाली आहे. दहा
तालुक्यातील 271 पशू बाधित झाले असून 175 पशू रोगातून बरे झाले आहे. यातील 3
पशूंचा मूत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 21 हजार 771 पशूंचे लसीकरण करण्यात
आले आहे. आजपर्यंत 97 हजार 600 लसी उपलब्ध झाल्या आहेत. लसीकरणाचे काम पशु रूग्णालयात
दररोज सुरू आहे.
पशूपालकांमध्ये या रोगाविषयी या आजाराविषयी गैरसमज निर्माण
झाले आहे. हा रोग पशूंपासून माणसांना होत नाही. हा रोग जनावरांवरील नियमित
उपचाराणे बरा होणारा आहे. पशुपालकांनी जनावरांमध्ये रोगाची लक्षणे आढळल्यास
पशुवैद्यकीय रूग्णालय किंवा पंचायत समिती किंवा जिल्हास्तरीय कक्षाशी संपर्क
करावा.
लम्पी हा आजार विषाणूजन्य आहे. हा विषाणू अत्यंत संसर्गजन्य
आजार, देवी विषाणू गटातील कप्रिपाक्स प्रवर्गातील आहे. रोग प्रसार हा चावणाऱ्या
माश्या, डास, गोचीड, चिलटे, बाधित जनावरे यांच्यातील प्रत्यक्ष स्पर्श, दूषित चारा
आणि पाणी यामुळे होतो. अंगावर 10 ते 50 मिमी व्यासाच्या गाठी, सुरुवातीस भरपूर
ताप, डोळे, नाकातून चिकट स्त्राव, चारा पाणी खाणे बंद किंवा कमी, दूध उत्पादन कमी
होणे, काही जनावरांच्या पायावर सूज येऊन लंगडणे, ही लक्षणे आहेत. गोठ्यामध्ये डास,
माश्या, गोचीड होणार नाही याच दक्षता घ्यावी. जनावरांवर उपचार करताना नवीन सिरींज
निडलचा वापर करावा. गोठ्यामध्ये बाहेरील व्यक्ती, डॉक्टर येत असल्यास सर्वप्रथम
त्यांचे निर्जंतुकीकरण करावे. साथीचा आजार सुरु असेपर्यंत बाजारातून जनावरांची
खरेदी विक्री थांबवावी, ही या रोगावरी नियंत्रण करण्याच्या उपाययोजना आहेत.
रोगावर नियंत्रणासाठी बाधित जनावरांना तात्काळ वेगळे करावे.
गोठ्यामध्ये सोडियम हायपोक्लोराईड, फिनाईल फवारणी करावी. जनावारांना आयव्हरमेक्टिन
इंजेक्शन दिल्यास कीटक, गोचिडाचे नियंत्रण होते. गावामध्ये कीटकनाशकाची फवारणी
करण्याची काळजी पशुपालकांनी घ्यावी.
लम्पी आजाराच्या नियंत्रणासाठी जिल्हास्तरीय नियंत्रण कक्ष
संपर्क जाहीर करण्यात आले आहे. यामध्ये डॉ. ए. बी. लोणे 8329122297, डॉ. आर. एस.
पाटील 9689330341, डॉ. टी. एस. पाटील 8999918104, डॉ. व्ही. ए. ऊइके 7841853224,
डॉ. डी. व्ही. जुंदळे 9403740047 यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हा परिषद
पशुसंवर्धन विभाग, पंचायत समिती पशुसंवर्धन विभाग, पशु वैद्यकीय रूग्णालय, जिल्हा
आणि तालुकास्तरीय कक्ष आणि संबंधित पशुवैद्यकीय रूग्णालयांचे मोबाईल क्रमांक
जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
000000
क्षयरुग्णांच्या
सहाय्यासाठी जिल्हा टीबी फोरमची सभा
बुलडाणा, दि. 14 : क्षयरुग्णांना पोषण आहाराचे सहाय्य
करण्यासाठी जिल्हा टीबी फोरमची सभा पार पडली. जिल्हाधिकारी एस. राममुर्ती
अध्यक्षस्थानी होते. क्षयरोग निर्मुलनासाठी राबवित येणाऱ्या शासकीय योजनांबाबत
यावेळी चर्चा करण्यात आली.
बैठकीला जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत पाटील, जिल्हा
क्षयरोग अधिकारी डॉ. दिनकर खेरोडकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नितीन तडस, वैद्यकीय
अधिकारी डॉ. आर. डी. गोफणे, जिल्हा उपनिबंधक राजेंद्र घोगे, क्षयरोग धामचे
वैद्यकीय अधीक्षक डॉ. एस. पी. वासेकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. शिवदास सरोदे आदी
उपस्थित होते.
जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. दिनकर खेरोडकर यांनी टीबी फोरमचा
उद्देश आणि कार्य तसेच निक्षय मित्राबाबत माहिती दिली. क्षयरोग निर्मुलनासाठी
राबविल्या जाणाऱ्या विविध योजना, सद्याची परिस्थिती आणि उपचार पद्धतीबाबत सादरीकरण
केले. राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत नवीन क्षयरुग्णांची संख्या कमी
करण्यासाठी समाजातील विविध घटकांचा सक्रिय सहभाग वाढविण्याचे आवाहन केले.
क्षयरुग्ण आणि कुष्ठरोग शोध मोहिम दि. 13 सप्टेंबर ते 30
सप्टेंबर 2022 या कालावधीत राबविल्या जात आहे. यासाठी नागरिक, आशा आणि आरोग्य
कर्मचारी यांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी एस. रामामुर्ती यांनी केले.
0000000
दक्षता
समितीची शुक्रवारी सभा
बुलडाणा, दि. 14 : जिल्हा
दक्षता समितीची सभा शुक्रवार, दि. 16 सप्टेंबर 2022 रोजी दुपारी 1 वाजता आयोजित
करण्यात आली आहे. तसेच भ्रष्टाचार निर्मूलन समितीची सभा मंगळवार, दि. 20 सप्टेंबर
2022 रोजी सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आली आहे.
ज्या नागरिकांना जिल्हा
दक्षता समिती सभा तसेच जिल्हा भ्रष्टाचार निर्मूलन समितीची सभा यामध्ये तक्रारी
दाखल करावयाच्या आहेत, त्यांनी प्रतिज्ञालेखावर तक्रारी स्पष्ट शब्दात सबळ
पुराव्यानिशी समितीसमोर दाखल करावे, असे आवाहन सामान्य प्रशासन विभागाचे तहसिलदार
यांनी केले आहे.
0000
No comments:
Post a Comment