Wednesday, 21 September 2022

DIO BULDANA NEWS 21.09.2022

 

प्रत्येक महाविद्यालयात समान संधी केंद्र उघडावे

-जिल्हाधिकारी एस. रामामुर्ती

बुलडाणा, दि. 21 : विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी प्रत्येक महाविद्यालयाने समान संधी केंद्र उघडावेत, यासाठी संबंधित महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी एस. रामामुर्ती यांनी केले.

समाज कल्याणच्या सहाय्यक आयुक्त कार्यालयातर्फे जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांची डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनात समान संधी केंद्र उघडण्याबाबत बैठक पार पडली. बैठकीस जिल्ह्यातील महाविद्यालयांचे प्राचार्य आणि प्रतिनिधी उपस्थित होते.

या बैठकीला जिल्हा जात पडताळणी समितीचे उपायुक्त डॉ. मंगेश जी वानखडे उपस्थित होते. बैठकीत ज्या महाविद्यालयांनी समान संधी केंद्र उघडलेले नाहीत, अशा महाविद्यालयांनी हे केंद्र तातडीने उघडण्याबाबत सूचना देण्यात आल्या. तसेच महाविद्यालयस्तरावरील शिष्यवृत्तीचे प्रलंबित अर्ज निकाली काढण्याबाबत सूचना देण्यात आल्या. श्री. वानखेडे यांनी जात पडताळणी समितीमार्फत विद्यार्थ्यांचे जात वैधता प्रमाणपत्र अर्ज तपासणीसाठी महाविद्यालयस्तरावर तालुकानिहाय कॅम्प घेण्यात येणार असल्याचे सांगितले. श्रीमती राठोड यांनी स्वाधार योजना, वसतीगृह प्रवेश, तसेच वृद्धाश्रमाबाबत माहिती दिली.

00000

समाज कल्याण विभागात सेवा पंधरवड्याचे आयोजन

बुलडाणा, दि. 21 : समाज कल्याण सहायक आयुक्त कार्यालयातर्फे दि. 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोंबर 2022 या कालावधीत राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा आणि कर्तव्यपथ पंधरवडा आयोजित करण्यात आला आहे.

या पंधरवाड्याच्या अनुषंगाने अनुसूचित जाती मुले, मुलींच्या शासकीय निवासी शाळा व मागासवर्गीय मुले, मुलींचे शासकीय वसतिगृहात कार्यरत अधिकारी, कर्मचाऱ्यांचे कर्तव्यपथ मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले. या शिबीरात उपस्थित कर्मचाऱ्यांना सहायक आयुक्त डॉ. अनिता राठोड यांनी मार्गदर्शन केले.

तसेच अनुसूचित जाती मुले, मुलींच्या शासकीय निवासी शाळा आणि मागासवर्गीय मुले, मुलींचे शासकीय वसतिगृह येथील कार्यरत अधिकारी, कर्मचाऱ्यांचे मुळ सेवापुस्तक तपासणी आणि अद्यावत करण्याचा उपक्रम राबविण्यात आला.

तसेच मागासवर्गीय मुले, मुलींचे शासकीय वसतीगृहाचे खात्यांतर्गत प्रलंबित परिच्छेद आणि भांडार पडताळणी प्रलंबित परिच्छेदाची पुर्तता करून अनुपालन सादर करण्याबाबत गृहपालांना मार्गदर्शन करण्यात आले.

00000

No comments:

Post a Comment