सैयद रोशन सैयद कादिर यानी
बैतूल जिल्हा न्यायालयात उपस्थित राहावे
बुलडाणा, दि. 20 : नांदुरा येथील तेलीपुरातील सैयद रोशन पिता सै
गौवंश अधिनियम अंतर्गत, वाहन राजसात प्रकरणात बैतूल येथील जिल्हा मॅजिस्ट्रेट न्यायालय येथे उपस्थित राहण्यासाठीची जाहिर सूचना अपर जिल्हादंडधिकारी यांनी प्रकाशित केली आहे.
00000
उद्योजकता विकास केंद्रातर्फे शेळी, कुक्कुट, पशूपालन प्रशिक्षण
बुलडाणा, दि. 20 : महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राच्या जिल्हा उद्योग केंद्रातर्फे उद्योग व्यवसाय सुरु करु इच्छिणाऱ्या सुशिक्षीत बेरोजगार युवक, युवतींसाठी बुलडाणा येथे शेळीपालन, कुक्कुट आणि गाय, म्हैस पालन प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हे प्रशिक्षण दि. 20 ते 28 सप्टेंबर 2022 या कालावधीत होणार आहे.
सदर प्रशिक्षण सुशिक्षित बेरोजगार युवकांनी तंत्रशुद्ध प्रशिक्षण घेऊन स्वत:चा उद्योग, व्यवसाय सुरु करावा यासाठी देण्यात येणार आहे. या प्रशिक्षणात शेळी, कुक्कुट आणि गाय, म्हैस पालनाचे तंत्र आणि प्रकार, त्यांच्या जाती, लसीकरण, संशोधन रोग आणि लक्षणे, निर्मिती व चाऱ्याचे प्रकार आणि उद्योग सुरु करण्यासाठी संपुर्ण सहकार्य करण्यात येणार आहे. त्यासोबतच उद्योजकता विकास, उद्योग संधी, मार्गदर्शन, शासकीय योजनांची माहिती प्रशिक्षणात तज्ज्ञ व्यक्ती करणार आहेत. प्रशिक्षणात प्रवेश घेऊ इच्छिणारा उमेदवार हा किमान पाचवी पास, वय 18 ते 50 वर्षे असावे. प्रशिक्षण यशस्वीपणे पुर्ण केल्यानंतर प्रमाणपत्र दिल्या जाणार आहे. प्रशिक्षण नोंदणीसाठी दि. 28 सप्टेंबर 2022 पर्यंत कार्यालयीन वेळेत प्रकल्प अधिकारी गणेश गुप्ता, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, द्वारा जिल्हा उद्योग केंद्र, दुरदर्शन केंद्रासमोर, मलकापूर रोड, बुलडाणा, मोबाईल नंबर 8275093201 / 9011578854 यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन विभागीय अधिकारी प्रदिप इंगळे यांनी केले आहे.
00000
जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी
महाविद्यालयात कॅम्पचे आयोजन
*महाविद्यालयातच होणार अर्ज स्विकृती
बुलडाणा, दि. 20 : जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीतर्फे दि. 21 ते 30 सप्टेंबर 2022 या दरम्यान तालुकानिहाय महाविद्यालयात जाऊन जात प्रमाणपत्राचे अर्ज स्विकृती करण्यात येणार आहे.
अकरावी आणि बारावी विज्ञान शाखेतील विद्यार्थी, तसेच बाहेर जिल्ह्यात शिक्षणाकरिता गेलेल्या विद्यार्थ्यांचे अर्ज तालुकास्तरावर निश्चित केलेल्या महाविद्यालयात स्विकारण्यात येणार आहे. यासाठी कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे. सदर कॅम्प वेळी विद्यार्थ्यांनी त्यांचे अर्ज bartievalidity.maharashtra.
000000
सेवा पंधरवड्यानिमित्त शनिवारी विशेष कार्यशाळा
बुलडाणा, दि. 20 : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत सेवा पंधरवड्याच्या निमित्ताने विशेष मोहीमे अंतर्गत दि. 23 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी 11 वाजता स्टँडअप योजनेची कार्यशाळा आयोजित केली आहे.
ही कार्यशाळा डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, चिखली रोड, समाज कल्याण कार्यालय, बुलडाणा येथे होणार आहे. सदर योजनेंतर्गत ज्या अर्जदारांनी संबधित बँकेमध्ये लाभ मिळण्यासाठी प्रस्ताव सादर केले आहेत, अशा अर्जदारांनी या कार्यशाळेस उपस्थित राहावे, असे आवाहन समाज कल्याण सहायक आयुक्त डॉ. अनिता राठोड यांनी केले आहे.
0000000
जिल्हास्तरावरील क्रीडा स्पर्धा आयोजनाबाबत बैठक
बुलडाणा, दि. 20 : जिल्ह्यातील क्रीडा संयोजकांची विविध वयोगटाच्या तालुकास्तर क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात येतात. यासंदर्भात गुरूवार, दि. 29 सप्टेंबर 2022 रोजी दुपारी 4 बैठक वाजता घेण्यात येणार आहे. ही बैठक जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा संकुल, क्रीडानगरी, जांभरुन रोड येथे जिल्हा क्रीडा अधिकारी यांचे अध्यक्षतेखाली सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे शालेय क्रीडा स्पर्धा आयोजन सन 2022-23 यावर्षात एकुण 93 खेळांच्या विविध वयोगटाच्या तालुका, जिल्हा, विभाग व राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा आयोजनास मान्यता प्रदान करण्यात आली आहे.
यापैकी नेहरु कप हॉकी व सुब्रतो मुखर्जी फुटबॉल क्रीडा स्पर्धा वगळता इतर 91 खेळांच्या क्रीडा स्पर्धांचे आयोजन जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत तथा एकविध खेळ संघटनेच्या तांत्रिक सहकार्याने, क्रीडा स्पर्धा आयोजन संदर्भात नियोजन करण्यात येणार आहे. यासाठी जिल्ह्यातील एकविध खेळ संघटनेचे अध्यक्ष, सचिव यांच्या सभेचे आयोजन केले आहे. सभेस येताना अधिकृत राज्यस्तर संघटना, महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेला संलग्न असल्याचे प्रमाणपत्र दोन प्रतीत कार्यालयास सादर करावे लागेल.
नमूद क्रीडा स्पर्धा आयोजनाबाबत आर्थिक व तांत्रिक जबाबदारी असणाऱ्या विविध एकविध खेळ संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहावे, सोबत अधिकृत राज्यस्तर संघटनेचे संलग्न असल्याचे प्रमाणपत्र तथा क्रीडा स्पर्धा आयोजनाबाबतचे नियोजन सोबत आणणे आवश्यक आहे.
सन 2022-23 या शैक्षणिक सत्रात होवू घातलेल्या विविध वयोगटातील विविध स्तरीय क्रीडा स्पर्धांमध्ये अल्पसंख्यांक समुदायातील शालेय विद्यार्थी-विद्यार्थींनी, पालक, शिक्षकांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी असे गणेश जाधव यांनी केले आहे.
00000
आजपासून पंडीत दिनदयाल उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळावा
बुलढाणा, दि. 20 : जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांना नोकरीच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रातर्फे पंडीत दिनदयाल उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळावा बुधवारी, दि. 21 ते 23 सप्टेंबर 2022 या कालावधीत करण्यात आला आहे.
या रोजगार मेळाव्यात नामांकीत खाजगी उद्योजक, कंपनी, त्यांचे प्रतिनिधी एकुण १०० पेक्षा अधिक पदांसाठी ऑनलाईन भरती प्रक्रिया राबवतील. तसेच पात्र पुरूष व महिला उमेदवारांच्या ऑनलाईन मुलाखत घेतील. यातून पात्र उमेदवारांची निवड करण्यात येईल.
कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर नाव नोंदणी केलेल्या दहावी, बारावी, पदवी, आयटीआय, पदवीधर पुरुष आणि महिला उमेदवारांनी आपले सेवायोजन कार्डचा युजर आयडी पासवर्डचा वापर करुन आपले लॉगइनमधून ऑनलाईन अर्ज करुन यात सहभागी होऊन रोजगार प्राप्त करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. उमेदवार आहे त्या ठिकाणावरुन आपल्या सेवायोजन कार्ड युझर आयडी व पासवर्डचा वापर करुन आपल्या लॉगीनमधून ऑनलाईन रोजगार मेळाव्यात ऑनलाईन पद्धतीने सहभागी होवू शकतात.
पात्र असलेल्या पुरुष आणि महिला उमेदवारांनी आपल्या शैक्षणिक पात्रतेच्या आधारे एकापेक्षा जास्त पदांकरीता ऑनलाईन अर्ज करु शकतात. उमेदवारांनी दि. 21 ते 23 सप्टेंबर 2022 या कालावधी दरम्यान आपल्या सेवायोजन कार्डच्या युझर आयडी आणि पासवर्ड वापर करुन आपले लॉगीन मधून ऑनलाईन अर्ज करावा. तसेच ऑनलाईन अर्ज करताना अडचण आल्यास जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उदयोजकता मार्गदर्शन केंद्र, बुलडाणा या कार्यालयाच्या (07262-242342) या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त प्रां. यो. बारस्कर यांनी केले आहे.
00000
No comments:
Post a Comment