Monday, 26 September 2022

DIO BULDANA NEWS 24.09.2022

 


जिल्हाधिकारी कार्यालयात आयुष्मान भारत दिवस साजरा 

*प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेस चार वर्षे पूर्ण
* आरोग्यामित्रांचा प्रशस्तीपत्र देवून सन्मान
बुलडाणा, दि. २४ : प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेस चार वर्षे पूर्ण झाल्याबद्दल जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती यांच्या उपस्थितीत आयुष्मान भारत दिवस साजरा करण्यात आला. यावेळी योजनेत कार्यरत असलेले आरोग्यामित्र यांना प्रशस्तीपत्र देवून सन्मानित करण्यात आले.
यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नितीन तडस, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत पाटील, जिल्हा समन्वयक डॉ. विवेक सावके, जिल्हा प्रमुख चेतन जाधव, जिल्हा पर्यवेक्षक सुरज पवार व अंगीकृत रुग्णालयातील आरोग्य मित्र उपस्थित होते. आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेला चार वर्षे पूर्ण झाली आहेत.  या  योजनेअंतर्गत  जिल्ह्यात  गेल्या  चार  वर्षात २७ अंगीकृत रुग्णालय आहेत. या योजनतून मोफत शस्त्रक्रिया  करण्यात आल्या आहेत. या  योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्यांची संख्या वाढावी, यासाठी आयुष्यमान भारत पंधरवडा साजरा केला जात आहे.
आयुष्यमान भारत पंधरवडा १५ ते ३० सप्टेंबर या कालावधीत साजरा केला जाणार आहे.  आयुष्यमान भारत दिवस २३ सप्टेंबर साजरा केला जाणार आहे. या योजनेला चार वर्षे पूर्ण झाल्याने आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेअंतर्गत विविध आरोग्यविषयक उपक्रम राज्यभर राबविले जात आहेत. जिल्ह्यात आरोग्य मेळावे तालुका, तसेच जिल्हास्तरावर साजरे केले जाणार आहे.  प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेत लाभ घेण्यासाठी ग्रामीण व शहरी भागातील कुटुंबांना आयुष्यमान कार्ड व फोटो ओळखपत् दिले जाते. रुग्णांसाठी जनआरोग्य योजना ही वरदान ठरत आहे. यासाठी आरोग्य प्रशासन प्रयत्न करीत आहे. यावेळी जिल्हाधिकारी यांनी जिल्हा समन्वयकांकडून योजनेचा आढावा घेतला. आयुष्मान भारत लाभार्थी रमेश विठ्ठल राठोड यांचे आयुष्मान भारत काॾं त्यांचा मुलगा नितेश रमेश राठोड यांनी स्विकारले. 

000000

No comments:

Post a Comment