नववर्षाच्या पार्श्वभुमीवर राज्य उत्पादन शुल्क विभाग सक्रीय; अवैध मद्य विक्री, वाहतूक प्रकरणी तक्रार नोंदविण्याची आवाहन

 


 

बुलढाणा, दि. 30(जिमाका): नववर्षाच्या आगमनाच्या पार्श्वभुमीवर जिल्ह्यातील विविध भागात अवैध वाहतुक तसेच विक्री मोठ्या प्रमाणात होतात. अशा घटनाना प्रतिबंध घालण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत दि. 31 डिसेंबरपर्यंत विशेष मोहिम राबविण्यात येत आहे.  तथापि कोणत्याही अनुज्ञप्तीमध्ये विना परवाना मद्यविक्री किंवा अल्पवयीन तरुणांना दारु उपलब्ध होत असल्यास अशावर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून कडक कारवाई केली जाणार आहे. तसेच नागरिकांनादेखील काही तक्रारी असल्यास विभागाशी संपर्क करावा, असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक चारुदत्त हांडे यांनी केले आहे.

 

नाताळ व नववर्ष आगमनाच्या अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्क बुलढाणा कार्यालयाच्यावतीने अवैध मद्य निर्मिती, वाहतुक व विक्री वर प्रतिबंध घालण्यासाठी बुलढाणा जिल्ह्यातील कार्यक्षेत्रीय अधिकारी निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, बुलढाणा, राज्य उत्पादन शुल्क देऊळगाव राजा व राज्य उत्पादन शुल्क खामगाव व राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथक यांच्याकडून जिल्ह्यातील विविध हातभट्टी ठिकाण, अवैध मद्यविक्री केंद्रावर छापे टाकुन कारवाई करणे चालु आहे. तसेच नववर्षाच्या अनुषंगाने आयोजित करण्यात येणाऱ्या पार्ट्या, हॉटेल्समध्ये होणारी मद्यविक्री यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाची करडी नजर असणार आहे.

Ø  गेल्या नऊ महिण्यात 1 कोटी 88 लक्ष रुपयांचा मुद्देमाल जप्त

राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध विक्री, मद्यनिर्मीती व वाहतुक प्रकरणी दि. 1 मार्च  2025 पासून ते आजपर्यंत विशेष मोहिम राबवून  1 कोटी 88 लक्ष 63 हजार 380 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आले आहेत. यामध्ये 1 हजार 201 व्यक्तीवर गुन्हे दाखल करण्यात आले असून 82 वाहन जप्त करण्यात आले आहे, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक चारुदत्त हांडे यांनी दिली आहे. सदर कारवाई राज्य उत्पादन शुल्क आयुक्त राजेश देशमुख, सह आयुक्त प्रसाद सुर्वे साहेब व विभागीय उप-आयुक्त डॉ. पराग नवलकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेली आहे.

Ø  गेल्या दहा दिवासात 13 लक्ष 31 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

बुलढाणा जिल्ह्यातील हातभट्टी ठिकाणे व अवैध मद्यविक्री केंद्रावर दि. 21 ते 30  डिसेंबर या कालावधीत छापे घालुन एकुण 62 गुन्हे नोंदविले असुन 59 आरोपींना अटक केली आहे.सदर गुन्ह्यात एकुण 7 वाहने जप्त केली असुन या गुन्हयांत एकुण रुपये 13 लाख 31 हजार 820 इतका मुद्येमाल जप्त केलेला आहे. सदर कारवाई बुलढाणा जिल्ह्यातील मौजे बोराखेडी, पाडोळी, मातला,पेसोंडा, चौंडी,बोरी आडगाव,राजुर,उमरखेड शिवार,कोलवड इत्यादी ठिकाणी छापे टाकुन केलेली आहे. सदर कारवाईत जिल्ह्यातील सर्व निरीक्षक, दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क व त्यांचे अधिनस्त कर्मचारी यांचा सहभाग आहे.

 

            बुलढाणा जिल्हयात कोणत्याही अनुज्ञप्तीमध्ये विना मद्यसेवन परवाना मद्यविक्री होऊ नये यासाठी संबंधित कार्यक्षेत्रीय निरीक्षक,दुय्यम निरीक्षक यांच्या मार्फत संपूर्ण जिल्ह्यातील अनुज्ञप्तीधारकांना एकुण 50 हजार इतके एक दिवसीय विदेशी मद्यसेवन परवाने वितरीत करण्यात आलेले आहेत. कोणत्याही अनुज्ञप्तीमध्ये विना मद्यसेवन परवाना मद्यविक्री चालु असल्याचे आढळल्यास, तसेच अल्पवयीन तरुणांना दारु उपलब्ध होत असल्याचे आढळल्यास त्याबाबत विभागाला माहिती देण्यात यावी. नववर्षाच्या आगमनाच्या पार्श्वभुमीवर शहरासह जिल्ह्यातील विविध भागात अवैध मद्य वाहतुक, विक्री करणा-यांवर कारवाई केली जाईल, असा इशारा देण्यात आला आहे. अवैध मद्यविक्री करणाऱ्या हॉटेल्स, ढाब्याबाबत, अवैध मद्यनिर्मीती वाहतुकीबाबत माहीती देण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडील टोल फ्री नंबर 18002339999 किंवा व्हॉटसअॅप नंबर 8422001133 वर किंवा excisesuvidha.mahaonline.gov.in या विभागाचे पोर्टलवर तात्काळ माहिती द्यावी.

0000000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

news 9.6.2017 dio buldana

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या