जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी बजावला मतदानाचा हक्क
बुलढाणा, (जिमाका) दि. 2: नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीसाठी
आज सकाळी जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी प्रभाग क्रमांक 10 मधील सरस्वती विद्यालयातील
मतदान केंद्रावर भेट देत इतर मतदारांप्रमाणे रांगेत उभे राहून मतदानाचा हक्क बजावला.
मतदानानंतर त्यांनी नागरिकांना
लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी निर्भयपणे, पारदर्शकपणे आणि उत्साहाने मतदान करण्याचे
आवाहन केले. मतदानाचा हक्क बजावताना कोणतीही चूक, गैरप्रकार किंवा बनावटपणा करणाऱ्यांवर
कडक कारवाई करण्यात येईल, असा कडक इशाराही दिला.
जिल्हाधिकारी पाटील यांनी
सांगितले की, प्रशासनाच्या वतीने मतदान प्रक्रिया शांततेत, सुव्यवस्थित आणि सुरळीत
पार पाडण्यासाठी सर्व आवश्यक तयारी पूर्ण करण्यात आली आहे. त्यांनी सर्व नागरिकांना
लोकशाही प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदविण्याचे आवाहन केले.
पिंक मतदान केंद्राला भेट
बुलढाणा नगरपरिषद क्षेत्रातील
महिलांसाठी जिल्हा प्रशासनाने विशेष पिंक मतदान केंद्र सुरु केले होते. या केंद्रात
मतदान केंद्र अध्यक्षापासून सर्व कर्मचारी हे महिला वर्ग नियुक्त करण्यात आले होते.
या पिंक मतदान केंद्राला जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी
भेट देऊन पाहणी केली.
00000









Comments
Post a Comment