कुष्ठरुग्ण शोध अभियान; जिल्हास्तरीय आढावा बैठक संपन्न कुष्ठरुग्णांचा शोध घेऊन उपचार करा- जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.गीते

 



बुलढाणा, (जिमाका) दि. 01: कुष्ठरुग्ण शोध अभियानांतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्रनिहाय व तालुकानिहाय आढावा घेण्यात आला. यावेळी कुष्ठरुग्ण शोध मोहिम अंतर्गत सर्व नागरिकांची तपासणी करावी, जास्तीत जास्त संशयित रुग्ण शोधून त्यांचे स्थानिक वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून निदान निश्चित करावा. नव्याने आढळणाऱ्या कुष्ठरुग्णांना त्वरित उपचार सुरू करावा, अशा सूचना जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गीते यांनी तालुका आरोग्य अधिकारी व वैद्यकीय अधिकारी यांना दिल्या. 

जिल्हा परिषदच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय आढावा बैठक नुकतीच घेण्यात आली. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. के. व्ही. राठोड, सहाय्यक संचालक डॉ. हरी पवार, तालुका आरोग्य अधिकारी व वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.  डॉ. के. व्ही. राठोड यांनी कुष्ठरोग आजार, त्याचे निदान, उपचार पद्धती तसेच चालू अभियानातील तांत्रिक बाबींबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

000000

Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

स्वयं अर्थसहाय्यिता नवीन शाळांना मान्यता व दर्जावाढीची शिफारस; हरकती मागविल्या