एचआयव्ही नियंत्रणासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा- जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बिराजदार
बुलढाणा,
(जिमाका) दि. 1: एचआयव्ही संसर्गाचा नियंत्रणासाठी एड्स कार्यक्रमांतर्गत
उत्कृष्ठ काम सुरु असून संसर्गाचे प्रमाण दरवर्षी कमी होत आहे. संसर्गाचे प्रमाण शून्यापर्यंत
येण्यासाठी संपूर्ण आरोग्य यंत्रणा, जोखमीचे घटक, अशासकीय संस्था व विशेषता तरुणांनी
पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दत्तात्रय बिराजदार यांनी केले.
जिल्हा क्षयरोग प्रतिबंध व नियंत्रण विभाग
तसेच जिल्हा रुग्णालय, बुलडाणा यांच्या संयुक्त विद्यमाने एड्स दिनाच्या निमित्ताने
कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आनंद भुजारी, सहाय्यक
आयुक्त गजानन घिरके, जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रमोद टाळे आणि वैद्यकीय अधिकारी डॉ.
सरोज शेवाळे आदी उपस्थित होते.
एचआयव्ही नियंत्रण कार्यक्रमामध्ये
इंटेन्सिफाईड आयइसी कॅम्पेनमध्ये विशेष कार्य केलेल्या आयसीटिसी कर्मचारी संदिप गोंड,
सतिश डामरे, गजानन लहासे, अशोक महाले, सारिका खंडारे, अनिकेत गाडेकर यांचा सत्कार करण्यात
आला. तसेच प्रश्नमंनुषा, चित्रकला व निबंध स्पर्धेत सहभागी झालेल्या विजेत्यांना प्रमाणपत्र
व रोख बक्षीस देण्यात आले.
अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक
डॉ. भागवत भुसारी व सहायक आयुक्त गजानन घिरके यांनी एचआयव्ही संसर्गाविषयी उपस्थितांना
मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे समन्वयक गजानन देशमुख यांनी संचालन केले तर आभार लक्षीकांत
गोंदकर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संदिप राऊत, भागवत कव्हळे, करुणा
घोडेस्वर, सीमा देशपांडे, नरेंद्र सनांते, भारत कोळे, इंदू मोरे, पियुष मालगे, प्रवीण
बंबटकार, मिलींद इंगोले, दीपक गवई, मंगला उमाळे आणि नेटवर्थ टीम बुलडाणा यांनी परिश्रम
घेतले.
0000

Comments
Post a Comment