भारतीय डाक विभागाची सेल्फ बुकींग व डोरस्टेप पिकअप सुविधा; नागरिकांना घरबसल्या जलद आणि आधुनिक सेवा
बुलढाणा, (जिमाका) दि.
3 : भारतीय डाक विभागामार्फत नागरिकांसाठी
आधुनिक, जलद व वापरण्यास सुलभ अशा सेल्फ बुकींग व डोरस्टेप पिकअप (Self-Booking
& Doorstep Pickup Service) या सुविधा उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या सेवेमुळे
ग्राहकांना आता घरी किंवा कार्यालयात बसूनच स्पीड पोस्ट, रजिस्ट्रर्ड, पार्सल इत्यादींचे
ऑनलाईन बुकिंग करता येणार आहे. विशेष म्हणजे, बुकिंगनंतर डाक विभागाचे कर्मचारी थेट
ग्राहकांच्या घरी येऊन पार्सलचे पिकअपही करतील.
ही सुविधा व्यवसायिक, व्यापारी, स्टार्टअप्स, कार्यालये
तसेच सर्वसामान्य ग्राहकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार असून, अनावश्यक प्रवास टाळून वेळ
आणि खर्च दोन्हीची बचत होणार आहे. सेल्फ बुकींग सुविधा वापरण्यासाठी ग्राहकांनी www.indiapost.gov.in किंवा
India Post Mobile App वर जाऊन “Self Booking” हा पर्याय निवडून संबंधित माहिती भरावी. तर डोरस्टेप पिकअप सुविधेसाठी त्याच
अॅप/वेबसाईटवरून पिकअप विनंती नोंदवता येते. निश्चित वेळेत डाक कर्मचारी पिकअपसाठी
भेट देतात.
या दोन्ही सेवा पूर्णपणे सुरक्षित, पारदर्शक असून ट्रॅकिंगची
सुविधा देखील उपलब्ध आहे. ग्राहकांनी पाठवायचे साहित्य योग्य प्रकारे पॅक करून ठेवणे,
प्रतिबंधित वस्तू टाळणे, तसेच पत्ता अचूक लिहिणे आवश्यक आहे, असे विभागाने स्पष्ट केले
आहे. या आधुनिक सेवांचा अधिकाधिक नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन डाकघर अधीक्षक गणेश
आंभोरे यांनी केले आहे.
000000
Comments
Post a Comment