10 नगरपरिषद निवडणुकीत 69.42 % मतदान
·
3,10,690
मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क
·
सिंदखेड
राजात 85 टक्के रेकॉर्ड ब्रेक मतदान
·
मतमोजणी
21 डिसेंबरला
बुलढाणा, (जिमाका) दि.
3 : जिल्ह्यातील 10
नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी मतदान सुरळीतपणे पार पडले असून सरासरी 69.42 टक्के
मतदानाची नोंद झाली आहे. यंदाच्या निवडणुकीत 3,10,690 मतदारांनी आपल्या मतदानाचा
हक्क बजावला आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिले आहे
या
नगरपरिषद निवडणुकीचे मतदान सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत एकूण 504 मतदान
केंद्रांवर मतदान घेण्यात आले. या मतदान प्रक्रियेमध्ये 1,48,293 स्त्री, 1,68,293
पुरुष आणि 5 इतर मतदारांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन मतदानाचे कर्तव्य पार पडले.
नगरपरिषदनिहाय मतदानाच्या टक्केवारीनुसार बुलढाणा 54.20 %, चिखली 71.02 %, जळगाव
जामोद 67.87 %, खामगाव 70.65 %, लोणार 72.26 %, मलकापूर 74.04 %, मेहकर 74.41 %,
नांदुरा 74.59 %, शेगाव 68.98 %, सिंदखेड राजा 85.08% सरासरी 69.42 % इतके मतदान
झाले.
मतदान
प्रक्रियेदरम्यान घडलेल्या अनुचित प्रकारांची जिल्हा प्रशासन आणि निवडणूक अधिकारी
यांनी गांभीर्याने दखल घेत कारवाई देखील केली आहे. या निवडणूक प्रक्रियेवर
जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ किरण पाटील सातत्याने लक्ष ठेऊन होते,
तसेच त्यांनी मतदान केंद्रांना भेटी देऊन पाहणी देखील केली.
मतदान
प्रक्रिया पार पडल्यानंतर मतपेट्या स्ट्राँग रुममध्ये ठेवण्यात आल्या आहेत. या
स्ट्राँग रुमच्या सुरक्षेसाठी पोलीस यंत्रणा, सीसीटीव्ही यंत्रणा तैनात करण्यात
आली आहे.
००००
Comments
Post a Comment