धानोरी क्र.2 साठवण तलाव या तलावावर संस्था नोंदणी संबंधाने बँक खाते प्रस्ताव सादर करावे
बुलडाणा, दि. 23 : शासन निर्णय कृषि व पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग क्रमांक मत्स्यवि २०१६/प्र.क्र./१७१/(भाग-१) पदुम-२३. मंत्रालय मुंबई दिनांक ०३ जुलै २०१९ अन्वये शासनाने मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थांच्या नोंदणीसाठी सुधारीत निकष लागू केले आहेत. बुलडाणा जिल्ह्यातील नविन तयार झालेला धानोरी क्र.2 साठवण तलाव (10.22 हेक्टर) ता.चिखली तालुक्यातील तालाव हा मृद जलसंधारण विभाग, बुलडाणा या कार्यालयाकडून मत्स्यव्यवसाय विभागाकडे हस्तांतरीत झालेला आहे. व सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय (तांत्रीक) बुलडाणा यांनी या कार्यालयास त्यांचे पत्र जा.क्र.सआम/बुल/तां/2066/2024 दि.13.06.2024 अन्वये कार्यालयास प्राप्त झालेले संस्था नोंदणीच्या अनुषंगाने नाव राखून ठेवण्याचा व बँकेत खाते उघडण्याच्या प्रस्तावावर प्राप्त झाल्यानंतर, नैसर्गिक न्याय तत्वाने सक्रीय मच्छीमारांना समान संधी मिळण्याच्या हेतूने सदर प्रस्तावावर १५ दिवसाची जाहीर नोटीस देवून आक्षेप व हरकती मागविण्यात येत आहे. प्राप्त हरकतीवर संबंधिताचे म्हणणे ऐकल्यानंतर प्रस्तावावर पुढील कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल. १५ दिवसानंतर प्राप्त हरकती,आक्षेपावर कोणताही विचार केला जाणार नाही.
पुढील नियोजित संस्थाचे प्रस्ताव या कार्यालयास प्राप्त झालेले आहेत. नियोजित स्व.दयासागरजी महाले मत्स्यव्यवसाय सहकारी संस्था मर्या.ईसोली पो.इसोली ता.चिखली जि.बुलढाणा. नियोजित मुंगी मत्स्यव्यवसाय सहकारी संस्था मर्या.इसोली पो.इसोली ता.चिखली जि.बुलढाणा. नियोजित धानोरी साठवण तलाव क्र.2 मत्स्यव्यवसाय सहकारी संस्था मर्या.धानोरी ता.चिखली जि.बुलढाणा 000000
डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजना सन 2024-25
बुलडाणा, दि.23 : राज्य शासनाच्या अल्पसंख्यांक विकास विभाग मंत्रालय मुंबई यांचे विभागाकडून शासन निर्णय क्रमांक अविवि-2010/प्र.क्र.152/10/का-6
योजनेच्या अटी व शर्ती- मदरसा चालविणारी संस्था अथवा मदरसा, धर्मदाय आयुक्त अथवा वक्फ बोर्डाकडे नोंदणीकृत आहेत. अशा मदरसांना सदर योजनांचा लाभ दिला जाईल. ज्या मदरसांना Scheme for providing education in madrasa या केंद्र पुरस्कृत योजनेंतर्गत लाभ मिळाला आहे अशा मदरशांना ही योजना अनुज्ञेय राहणार नाही. शासन निर्णयात नमुद पायाभूत सुविधांसाठी रु 2 लाख अनुदान देय आहे. यापूर्वी ज्या प्रयोजनासाठी अनुदान देण्यात आले आहे त्या प्रयोजनासाठी पुन्हा अनुदान अनुज्ञेय असणार नाही. शासन निर्णयातील तरतूदीनुसार जास्तीत जास्तम 3 डी.एड/बी.एड शिक्षकांना मानधन देण्यात येईल शिक्षणसाठी हिंदी/इंग्रजी/मराठी/उर्दु यापैकी एका माध्यमाची निवड करुन त्यानुसार शिक्षकांची नेमणूक करणे आवश्यक राहील. सदर अनुदान शासन निर्णयामध्ये नमुद पायाभूत सुविधा वगळून इतर सुविधांसाठी अनुज्ञेय असणार नाही. शासन निर्णयानुसार अर्जाचा नमुना व आवश्यक कागदपत्रांची यादी www.maharashtra.gov.in या
अल्पसंख्याक शाळा,महाविद्यालय पायाभुत सोयी सुविधा पुरविण्यासाठी अनुदान वितरण
बुलढाणा, दि.23 : अल्पसंख्यांक विकास विभाग शासन निर्णय क्रमांक अविवि-2015/प्र.क्र.80/15/का-6 दिनांक 7.10.2015 अन्वये अल्पसंख्याक विद्यार्थी बहुल शासनमान्य खाजगी अनुदानती /विना अनुदानित/ कायम विना अनुदानित शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, औद्योगिक प्रशिक्षण व अपंग शाळांमध्ये पायाभुत सोयी- सुविधा अनुदान योजनेतंर्गत वार्षिक कमाल 2 लाख अनुदान उपलब्ध होणार आहे. योजनेच्या अटी व शर्ती- शासनमान्य खाजगी अनुदानातील/विना अनुदानित/ कायम विना अदुनदानित शाळा, कनिष्ठ माहविद्यालय, औद्योगिक प्रशक्षिण संस्था व न.प. शाळांमध्ये अल्पसंख्यांक समाजाचे किमान 70 टक्के विद्यार्थी शिकत असणे आवश्यक आहे. शासन मन्यता प्राप्त अपंगाच्या शाळामध्ये किमान 50 टक्के अल्पसंख्याक विद्यार्थी शिकत असणे आवश्यक आहे.
सदर योजनेतंर्गत पायाभुत सुविधांसाठी अनुदान देय राहील- शाळेच्या इमारतचे नुतनीकरण व डागडुजी, शुध्द पेयजलाची व्यवस्था करणे . ग्रंथालय अद्यावत करणे, प्रयोगशाळा उभारणे/अद्यावत करणे, संगणक कक्ष उभरण व अद्यावत करणे, प्रसाधनगृह/स्वच्छतागृह उभारणे/ डागडुजी करणे. शैक्षणिक कार्यासाठी आवश्यक फर्निचर, वर्ग खोल्यामध्ये आवश्कतेनुसार पंख्यांची व्यवस्था करणे. इन्व्हर्टरची सुविधा निर्माण करणे. अध्यापनाची साधने एल.सी.डी प्रोजेक्टर अध्ययनासाठी लागणारे विविध सॉफटवेअर, इत्यादी इंग्रजी लॅग्वेज लॅब, संगणक हार्डवेअर/ सॉफटवेअर. इत्यादी सुविधा उपलब्ध असाव्यात. जिल्हयातील अल्पसंख्याक बहुल खाजगी शासन मान्यताप्राप्त इच्छुक शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, अपंग शाळा व न.प. शाळ यांनी शासन निर्णय अल्पसंख्यांक विकास विभाग. क्रामंक अविवि-2015/प्र.क्र.80/15/का-6 दिनांक 07.10.2015 नमुद कागपदत्रांची पुर्तता करुन परिपुर्ण अर्ज /प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालय, बुलढाणा येथे 15 सप्टेंबर 2024 पर्यंत सादर करावेत. सदर योजनेचा लाभ घ्यावा. आवश्यक कागदपांची यांदी www.maharashtra.gov.in
किटकनाशक फवारणी करतांना घ्यावयाची काळजी
बुलढाणा, दि.23 : खरीप हंगामास सुरुवात झालेली असून किडरोगाच्या नियंत्रणासाठी शेतक-यांकडून मोठ्या प्रमाणात किटकनाशकांची फवारणी करण्यास सुरुवात झालेली आहे. किटकनाशकांची हाताळणी , फवारणी करतांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. किटकनाशके अधिकृत परवानाधारक विक्रेत्याकडूनच खरेदी करण्यात यावी. खरेदीचे पक्के बिल घ्यावे. अनोळखी व्यक्तीकडून किटकनाशकांची खरेदी करु नये. किटकनाशके सिलबंद व लेबल असल्याची खात्री करुनच खरेदी करावी.
पाकीटावर बॅच नंबर उत्पादन व अंतिम तारीख तसेच नोंदणी क्रमांक व उत्पादक कंपनीची माहिती असल्याबाबत खात्री करुन खरेगी करावी. सिल फुटलेली बॉटल अथवा पाकीटे खरेदी करु नये.आपण ज्या पिकावर किटकनाशके ,तणनाशकाची फवारणी करणार आहोत त्याचे नाव लेबलवर नमुद असल्याची खात्री करावी. लेबलक्लेम नुसार किटकनाशकांचा वापर करावा. किटकनाशके ही मुळ बॉटल अथवा पाकीटामध्ये ठेवावी तसेच ती इतरत्र घरामध्ये कुठेही न ठेवता कुलूपबंद ठिकाणी ठेवावी तसेच किटकनाशके व तणनाशके स्वतंत्र वेगवेगळी ठेवण्यात येऊन लहानमुले व इतर पाळीव प्राणी अथवा जनावरांपासून दूर ठेवण्यात यावी. किटकनाशके व तणनाशके फवारणी करतांना वेगवेगळया पंपाचा वापर करण्यात यावा. पिकांच्या प्रकारानुसार फवारणीच्या पंपासाठी योग्य त्या आकाराची नोझल्स वापरावी. फवारणीसाठी द्रावण तयार करतांना स्वच्छ पाण्याचा वापर करावा. तसेच द्रावण तयार करतांना बॉटल, पाकीटा वरील लेबल वाचून त्यावर दिलेल्या निर्देशानुसारच द्रावण तयार करावे. विविध किटकनाशकांचे एकत्र मिश्रण करु नये. त्याचे वेगळेच रसायन तयार होऊन पिकावर व शरीरावर विपरीत परिणाम होतात. द्रावण तयार करतांना कान, नाक, डोळे, हात यांचे सुरक्षेकरीता हातमोजे, मास्क, काठी यांचा वापर करावा. दिलेल्या शिफारसीत मात्रेमध्येच द्रावण तयार करुन सकाळी किंवा संध्याकाळी वा-याच्या दिशेने फवारणी करावी. फवारणीच्या वेळेस काहीही खाऊ अथवा पिऊ नये मात्र फवारणीपुर्वी न्याहरी आवश्य करावी. फवारणी करतांना सुरक्षा किटचा वापर करावा. फवारणी नंतर रिकाम्या बॉटल्स, खाली पाकीटे सुरक्षित ठिकाणी खड्डा खोदून जमीनीत गाडून टाकावीत. फवारणी केल्यानंतर फवारणीचे पंप व इतर साहित्य सुध्दा स्वच्छ धुवावे व त्यानंतर स्वच्छ आंघोळ करावी. फवारणी करीत असतांना मजुर त्याच हातांनी तंबाखु खातांना, धुम्रपान करतांना दिसतात व साबणाने हात न धुता जेवतात. त्यामुळे विष पोटात जाऊन विषबाधा होऊन जीवाची हानी होते. मजुराकडून सलग फवारणी करुन मजुरांना विषबाधा झाल्याची प्रकरणे जास्त निदर्शनास येतात त्यामुळे एकाच व्यक्तीकडून सलग व जास्त फवारणी करुन घेऊ नये. फवारणी नंतर विषबाधेची लक्षणे जसे त्वचेचा क्षोभ, डोकेदुखी, उलटी, घाम येणे, मळमळणे डोळयातून पाणी येणे इत्यादी आढळून आल्यास प्राथमिक उपचार करुन त्वरीत किटकनाशकाची फवारणी केलेली रिकामी बॉटल, पाकिट व त्यासोबतचे माहितीपत्रक घेवून डॉक्टरांकडे जावे. फवारणी करतांना वरीलप्रमाणे काळजी घेण्यात यावी असे आवाहन कृषि विकास अधिकारी जिल्हा परिषद बुलडाणा यांनी केले आहे. 0000000
No comments:
Post a Comment