जिल्हा परिषदेत कृषी दिन साजरा
बुलडाणा, दि. 02 : हरितक्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती जिल्हा परिषदेच्या श्री शिवाजी सभागृहात साजरी करण्यात आली. कृषी दिनानिमित्त उपक्रमशील शेतकऱ्यांचा गौरव करण्यात आला.
मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम अध्यक्षस्थानी होते. यावेळी अति. मुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब मोहन, मुख्य लेखा व वित्त अधिकारी प्रकाश राठोड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी आशिष पवार, आत्माचे प्रकल्प संचालक पुरुषोत्तम उन्हाळे उपस्थित होते.
कार्यक्रमात जिल्ह्यातील ११ प्रगतीशील महिला शेतकऱ्यांना राष्ट्रमाता जिजाऊ प्रगतीशील महिला शेतकरी सन्मान पुरस्कार, १३ प्रगतीशील पुरुष शेतकऱ्यांना कै. वसंतराव नाईक प्रगतीशील शेतकरी सन्मान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच गौकर्णा परिहार, रा. अंचरवाडी, ता. चिखली यांना ११ हजार रूपयांचे पारितोषिक देवून राष्ट्रमाता जिजाऊ प्रगतीशिल महिला शेतकरी म्हणून सन्मानित करण्यात आले. आवचितराव पालकर, रा. सातगाव म्हसला, ता. बुलडाणा यांना ११ हजार रूपयांचे पारितोषिक देवून कै. वसंतराव नाईक प्रगतिशील शेतकरी म्हणून सन्मानित करण्यात आले.
मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. जंगम यांनी मुलांना शालेय जीवनापासून शेतीची आवड निर्माण व्हावी, यासाठी कृषि विभागाने पुढाकार घ्यावा. असे मनोगत व्यक्त केले. कृषि विज्ञान केंद्राचे प्रकल्प समन्वयक नरेंद्र देशमुख यांनी देशी गोपालन व दुग्ध व्यवसायाबद्दल मार्गदर्शन केले. महिला प्रगतीशील शेतकरी गौकर्णा परिहार यांनी शेतातील उपक्रमाची माहिती दिली. अवचितराव पालकर यांनी शेतातील केशर आंबा लागवड व त्यापासून आलेले उत्पन्न, सामुहिक शेततळे, दुग्ध व्यवसाय, गांडुळ खत युनिटचा शेतीला फायदा होत असल्याचे सांगितले. जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी मनोजकुमार ढगे यांनी प्रास्ताविकातून वसंतराव नाईक यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला, तसेच कृषि विभागामार्फत शेतकऱ्यांसाठी असलेल्या योजनांची माहिती दिली.
कार्यक्रमाला कृषि विज्ञान केंद्राचे प्रकल्प समन्वयक विकास जाधव, शास्वज्ञ श्री. कानवडे, महाबीजचे जिल्हा व्यवस्थापक श्री. ठाकरे, कृषि विकास अधिकारी विजय खोंदिल, जिल्हा परिषदेचे जिल्हा कृषि अधिकारी दिनकर मेरत आदी उपस्थित होते.
00000
भारत सरकार शिष्यवृत्ती अर्ज भरण्यास 15 जुलैपर्यंत मुदतवाढ
बुलडाणा, दि. 02 : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे प्रत्येक वर्षी अनुसूचित जाती प्रवर्गातील मॅट्रीकोत्तर शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना भारत सरकार शिष्यवृत्ती आणि राज्य शासनाची शिक्षण फी, परीक्षा फी योजनांचा लाभ देण्यात येतो. सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी mahadbtmahait.
सदर प्रणालीवर ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा दि. 11 ऑक्टोबर 2023 पासून उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यानुसार सर्व संस्था, महाविद्यालयाच्या प्राचार्य आणि अनुसूचित प्रवर्गातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी अनुसूचित प्रवर्गाकरिता भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती, शिक्षण फी, परिक्षा फी, व्यावसायिक पाठ्यक्रम निर्वाह भत्ता, राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती योजनेचे अर्ज भरण्याकरीता दि. 15 जुलै 2024 पर्यंत मुदतवाढ करुन देण्यात आली आहे. त्यानुसार संबंधित पात्र मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी मुदतीत ऑनलाईन अर्ज नोंदणी करावी.
मागील वर्षाच्या तुलनेत महाडीबीटी पोर्टलवर अर्ज कमी भरल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे ज्या अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी अद्यापपर्यंत सन 2023-24 या शैक्षणिक वर्षातील अर्ज भरलेले नाही, अश्या विद्यार्थी, तसेच सन 2022-23 या शैक्षणिक वर्षातील अर्ज रिप्लाय करण्यासाठी विद्यार्थ्यांनी विहित मुदतीत अर्ज भरावे. अनुसूचित जाती प्रवर्गातील योजनेस पात्र सर्व विद्यार्थ्यांनी mahadbtmahait.
जिल्ह्यातील सर्व कनिष्ठ, वरिष्ठ व व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या महाविद्यालयांनी त्यांच्याकडे प्रवेशित विद्यार्थ्यांना महा डीबीटी पोर्टलद्वारे योजनेची आवेदनपत्र भरण्याबाबत सूचित करावे. सदर मुदतीत मागासवर्गीय विद्यार्थी अर्ज भरण्यापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे आवाहन समाज कल्याण सहाय्यक आयुक्त डॉ. अनिता राठोड यांनी केले आहे.
00000
No comments:
Post a Comment