Monday, 1 July 2024

DIO BULDANA NEWS 01.07.2024

 


जिल्हाधिकारी कार्यालयात वसंतराव नाईक यांना अभिवादन

बुलढाणा, दि. 01 : जिल्हाधिकारी कार्यालयात हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांना अभिवादन करण्यात आले.

जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी निर्भय जैन, उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार, सुरेश थोरात, समाधान गायकवाड, डॉ. जयश्री ठाकरे, अजिंक्य गोडगे, उपविभागीय अधिकारी शरद पाटील, जिल्हा माहिती व तंत्रज्ञान अधिकारी सुनील खुळे, तहसीलदार संजीवनी मुपडे, नाझर गजानन मोतेकर आदी उपस्थित होते.

000000



जिल्हा नियोजन कार्यालयात महालनोबीस जयंती साजरी

बुलडाणा, दि. 01 : जिल्हा नियोजन कार्यालयात प्रो. प्रशांतचंद्र महालनोबीस यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय सांख्यिकी दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. यावर्षी राष्ट्रीय सांख्यिकी दिनाचा विषय ‘निर्णय घेण्यासाठी डेटाचा वापर’ आहे.

सदर कार्यक्रमाला जिल्हा नियोजन अधिकारी सुनय लाड अध्यक्षस्थानी होते. यावेळी जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक सुनिल पाटील, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद गाजरे, जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकारी डॉ. दिवाकर काळे, पशुसंवर्धन सहायक आयुक्त डॉ. पाचरणे उपस्थित होते.

यावेळी ‘निर्णय घेण्यासाठी डेटाचा वापर’ यातील  सांख्यिकी विषयाबाबत मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाला जिल्हा नियोजन कार्यालयातील सहायक जिल्हा नियोजन अधिकारी अनिल शेवाळे, उल्का राणे, तसेच जिल्हा सांख्यिकी कार्यालय, मानव विकास समिती, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था व जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संस्था, अर्थ व सांख्यिकी संचालनालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

000000

शिष्यवृत्तीचे अर्ज भरण्यासाठी 15 जुलैपर्यंत मुदतवाढ

बुलडाणा, दि. 01 : इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत प्रत्येक वर्षी विजाभज, इमाव आणि विमाप्र जाती प्रवर्गातील मॅट्रीकोत्तर शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना भारत सरकार शिष्यवृत्ती आणि राज्य शासनाची शिक्षण फी, परीक्षा फी योजनेचा लाभ देण्यात येतो. यासाठी विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज भरणे आवश्यक आहे. यासाठी दि. 15 जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

विद्यार्थ्यांना mahadbt.mahait.gov.in या पोर्टलवरुन ऑनलाईन अर्ज भरणे आवश्यक आहे. सदर प्रणालीवर ऑनलाईन अर्ज भरण्याची सुविधा दि. 11 ऑक्टोबर 2023 पासून उपलब्ध करुन देण्यात आली आहे. विजाभज, इमाव, विमाप्र जाती प्रवर्गाकरीता भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती, शिक्षण फी परिक्षा फी, व्यावसायिक पाठ्यक्रम निर्वाह भत्ता, राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती योजनेचे अर्ज भरण्याकरीता दि. 15 जुलै 2024पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. यासाठी पात्र मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी मुदतीत ऑनलाईन अर्ज नोंदणी करावी लागणार आहे.

अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी अद्यापपर्यंत सन 2023-24 शैक्षणिक वर्षातील अर्ज भरलेले नाहीत असे विद्यार्थी, तसेच सन 2022-23 या शैक्षणिक वर्षातील अर्ज रिअप्लाय करण्यासाठी विद्यार्थ्यांनी विहित मुदतीत अर्ज भरावेत. अनुसूचित जाती प्रवर्गातील योजनेस पात्र सर्व विद्यार्थ्यांनी mahadbtmahait.gov.in संकेतस्थळावर दि. 15 जुलै 2024 पर्यंत अर्ज भरावेत. महाविद्यालयांनी योजनेस पात्र असलेल्या अनुसूचित जाती प्रवर्गातील संपूर्ण विद्यार्थ्यांचे अर्ज महाडीबीटी संकेतस्थळावर विहित मुदतीपूर्वी अर्ज भरुन घेण्याची कार्यवाही करावी.

जिल्ह्यातील सर्व कनिष्ठ, वरिष्ठ आणि व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या महाविद्यालयांनी प्रवेशित विद्यार्थ्यांचे महाडीबीटी पोर्टलद्वारे योजनेची आवेदन पत्रे भरावीत. मुदती विद्यार्थ्याचे अर्ज भरुन घेण्याची जबाबदारी संबधित महाविद्यालयाची राहणार आहे. तसेच मागासवर्गीय विद्यार्थी अर्ज भरण्यापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घ्यावी. महाविद्यालय, विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज भरावेत, असे आवाहन सहाय्यक संचालक मनोज मेरत यांनी केले आहे.

00000





केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते वृक्षारोपण

बुलढाणा, दि. 01 : नगर पालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने शहरात मिशन ग्रीन बुलडाणा आणि माझी वसुंधरा अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानात केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते रविवार, दि. 30 जून रोजी वृक्षारोपण करण्यात आले.

यावेळी आमदार संजय गायकवाड, जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील, उपविभागीय अधिकारी शरद पाटील, मुख्याधिकारी गणेश पांडे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी मनोजकुमार ढगे, कार्यकारी अभियंता सुभाष राऊत आदी उपस्थित होते.

000000






जिल्हाधिकारी यांच्या हस्ते विविध ठिकाणी वृक्षारोपण

बुलढाणा, दि. 01 : मिशन ग्रीन बुलडाणा अंतर्गत जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी विविध ठिकाणी वृक्षारोपण केले.

सकाळी जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. त्यानंतर बसस्थानक परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी तहसिलदार विकास कुमरे, मुख्याधिकारी गणेश पांडे, विभाग नियंत्रक श्री. वाडीभस्मे, इंडियन रेडक्रॉस सोसायटीचे सचिव रवींद्र लहाने, श्री. जवरे, गोपाल राजपूत, आर्ट ऑफ लिव्हिंग परिवाराचे सुनील देवरे, भगवान सावळे यांनी सहकार्य केले.

00000

शेतकरी शिधापत्रिकाधारकांना धान्याऐवजी रोख रक्कम मिळणार

बुलडाणा, दि‍. 01 : शासनाच्या निर्णयानुसार दारिद्र्यरेषेवरील शेतकरी शिधापत्रिकाधारकांना धान्याऐवजी प्रति व्यक्ती 170 रुपये रोख रक्कम हस्तांतरण करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यामुळे शेतकरी शिधापत्रिकाधारकांना आता धान्याऐवजी रोख रक्कम मिळणार आहे.

या निर्णयाच्या अनुषंगाने एपीएल शेतकरी शिधापत्रिकाधारकांना स्वत: आणि कुटुंबातील इतर सभासंदाचा आधार क्रमांक, राष्ट्रीय बँक खाते क्रमांकाला जोडून रोख रक्कम हस्तांतरणाचा अर्ज दि. 15 जुलै 2024 पर्यंत भरुन द्यावा लागणार आहे. या मुदतीत विहित नमुन्यातील अर्ज भरुन दिला नसल्यास त्यांना यात स्वारस्य नसल्याचे गृहित धरण्यात येवून त्यांना एनपीएच योजनेमध्ये वर्ग करण्यात येणार आहे, याची नोंद शेतकरी शिधापत्रिकाधारकांनी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.

00000

योजनांच्या अनुदानासाठी बँकखाते आधार लिंक करण्याचे आवाहन

बुलडाणा, दि‍. 01 : संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना या दोन योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहायाचे वितरण महाडीबीटी प्रणालीद्वारे करण्यात येणार आहे. त्यामुळे या योजनांच्या लाभार्थ्यांनी त्यांचे बँक खाते आधार लिंक करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

या योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना महाडीबीटी प्रणालीद्वारे अनुदान थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे. योजनेमधील लाभार्थ्यांची  महाडीबीटीप्रणालीवर माहिती भरण्यात येवून, त्यावर त्यांच्या आधारची वैधता तपासवयाची आहे. ज्या लाभार्थ्यांचे आधार अद्ययावत नसतील त्यांची आधार वैधता होणार नाही. तसेच लाभार्थ्यांचे आधार क्रमांक बँक खात्यासोबत संलग्न असणे आवश्यक आहे.

या योजनेतील लाभार्थ्यांनी आपले आधार अद्ययावत करावे, तसेच आधार क्रमांक बँक खात्यासोबत संलग्न करावे, आधार क्रमांक बँक खात्यासोबत संलग्न नसल्यास लाभार्थ्यांना त्यांचा लाभ प्राप्त होणार नाही. त्यामुळे योजनेतील लाभार्थ्यांनी आपले बँक खाते आधार क्रमांकाशी संलग्न करुन घ्यावे, तसेच जवळच्या आधार सुविधा केंद्रात जाऊन आपले आधार अद्यावत करावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी निर्भय जैन यांनी केले आहे.

00000




अपंग कल्याण, पुनर्वसन संस्थेत वृक्षारोपण

बुलडाणा, दि. 01 : जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या ग्रीन मिशन बुलढाणा अंतर्गत सोमवार, दि. 1 जुलै रोजी वृक्षारोपण करण्यात आले. स्थानिक अपंग पुनर्वसन केंद्राच्या आवारात वृक्षारोपणाचा कार्यक्रम शीला किरण पाटील यांचे हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

अपंग कल्याण व पुनर्वसन संस्था बुलढाणा, इंडिया रेडक्रॉस सोसायटी बुलढाणा, तसेच आर्ट ऑफ लिव्हींग, बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम राबविण्यात आला. संस्थेच्या आवारात 100 हून अधिक झाडे लावून त्याचे संगोपन करण्यात येणार असल्याचे संस्थेचे अध्यक्ष डॉ. छाजेड यांनी सांगितले. यावेळी शीला पाटील यांच्यासमवेत आर्ट ऑफ लिव्हिंगच्या शिक्षीका शुभांगी लहाने, भगवान सावळे, सुनील देवरे, तसेच अपंग पुनर्वसन संस्थेचे अध्यक्ष डॉ. छाजेड, सुरेखा जतकर, श्रीमती कारंजकर, अजय कारंजकर, धर्मेश कमानी, श्री. उमाळे, गजानन कुळकर्णी आणि संस्थेचे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

कार्यक्रमासाठी श्री. डव्हळे, श्री. खरात, श्रीमती माळी यांनी पुढाकार घेतला. शाळेच्या नवीन सत्राचा पहिला दिवस असल्यामुळे शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत शीला पाटील यांनी केले.

00000

No comments:

Post a Comment