DIO BULDANA NEWS 01.02.2023

 भंगार साहित्याचे निर्लेखनासाठी निविदा आमंत्रित

बुलडाणा, दि. 1 : शेलापूर येथील अन्विका प्रात्यक्षिक केंद्रातील भंगार साहित्याचे निर्लेखन करण्यात आले आहे. यासाठी निविदा आमंत्रित करण्यात आले आहे.

उपविभागीय कृषि अधिकारी बुलडाणा कार्यालयाच्या शेलापूर, ता. मोताळा येथील अन्वीक्षा आणि प्रात्यक्षिक केंद्रातील भंगार साहित्याचे निर्लेखन करण्यात येणार आहे. ज्या साहित्याचे निर्लेखन करावयाचे आहे, अशा साहित्याची यादी बुलडाणा येथील उपविभागीय कृषि अधिकारी कार्यालयात उपलब्ध असून खरेदीदारानी त्यांचे दरपत्रक उपविभागीय कृषि अधिकारी कार्यालयात दि. 8 फेब्रुवारी 2023 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत बंद पाकिटात सादर करावे. तसेच सोबत खरेदीदाराने आधार कार्ड, पॅनकार्ड नोंदणी दाखला सादर करावे, असे आवाहन उपविभागीय कृषि अधिकारी संतोष डाबरे यांनी केले आहे.

000000


Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

news 9.6.2017 dio buldana

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या