जळगाव जामोद येथील रोजगार मेळाव्यात
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे
पांडुरंग फुंडकरांना अभिवादन
बुलडाणा, दि. 24 : केंद्रीय रस्ते वाहतूक व
महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज, दि. 24 फेब्रुवारी 2023 रोजी जिल्ह्याला
भेट दिली. यावेळी त्यांनी खामगाव येथील स्व. पांडुरंग फुंडकर यांच्या समाधीस्थळी अभिवादन
करून पुतळ्याला पुष्पहार अर्पण केले.
श्री. गडकरी यांचे खामगाव
येथील सिद्धीविनायक अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या हेलिपॅडवर आगमन झाले. याठिकाणी
असलेल्या स्व. पांडुरंग फुंडकर यांच्या समाधीस्थळी त्यांनी भेट देऊन अभिवादन केले.
यावेळी स्वागत बेटी बचाव बेटी पढाव अभियानाचे
राष्ट्रीय संजोजक डॉ राजेंद्र फडके, आमदार अॅड. आकाश फुंडकर, विजयराज शिंदे, खविसचे
अध्यक्ष शिवशंकर लोखंडकार, महेंद्र रोहनकार, डॉ. गोपाल गव्हाळे, उपविभागीय अधिकारी
अतुल पतोळे आदी उपस्थित होते.
त्यानंतर श्री. गडकरी यांनी सतीश जळगावकर यांच्या निवासस्थानी भेट दिल्यानंतर नांदेडकडे प्रयाण केले.
000000
मोफत निवासी उद्योजकता विकास कार्यक्रमासाठी सोमवारी निवड
बुलडाणा, दि. 24 : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर
विशेष सामूहिक प्रोत्साहन योजनेंतर्गत मोफत निवासी उद्योजकता विकास कार्यक्रम
अमरावती येथे घेण्यात येणार आहे. या प्रशिक्षणासाठी सोमवार, दि. 27 फेब्रुवारी 2023
रोजी 12 वाजता चिखली रोडवरील सैनिकी वसतिगृहात निवड करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रातर्फे
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विशेष सामूहिक प्रोत्साहन योजनेंतर्गत उद्योग संचालनालयातर्फे
अनुसूचित जाती प्रवर्गातील सुशिक्षित बेरोजगार युवक-युवती, नवउद्योजकांसाठी मोफत निवासी
उद्योजकता विकास कार्यक्रम दि. 28 फेब्रुवारी ते 17 मार्च 2023 या कालावधीत अमरावती येथे करण्यात येणार आहे.
या प्रशिक्षणाचा परिचय कार्यक्रम आणि लाभार्थींची निवड करण्यासाठी उद्योजकता परिचय
कार्यक्रम आणि प्रत्यक्ष मुलाखतीची आयोजन करण्यात आले आहे, असे जिल्हा उद्योग
केंद्राचे महाव्यवस्थापक सुनील पाटील यांनी केले आहे.
00000
No comments:
Post a Comment