विभागीय हातमाग कापड स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन

 विभागीय हातमाग कापड स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन


बुलडाणा, (जिमाका) दि. 13: सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागामार्फत हातमाग विणकरांनी विणलेल्या उत्कृष्ठ हातमाग कापड नमुन्यांना प्रोत्साहन देऊन विणकरांना गौरविण्यासाठी हातमाग कापड स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. यानुसार विभागीय हातमाग कापड स्पर्धा नागपुरच्या विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांच्या अध्यक्षतेखाली दि. 20 मार्च रोजी सायंकाळी 5 वाजता घेण्यात येणार आहे.


अमरावती आणि नागपुर विभागातील सर्व जिल्ह्यातील हातमाग विणकरांनी जास्तीत जास्त संख्येने या स्पर्धेत सहभाग नोंदविण्याकरीता हातमाग विणकरांनी तयार केलेले नमुने प्रादेशिक उपआयुक्त, वस्त्रोद्योग, नागपूर या कार्यालयात दिनांक 18 मार्च रोजी सायंकाळी 5 वाजतापर्यंत सादर करणे आवश्यक आहे. विणकरांनी आपले नमूने प्रादेशिक उपआयुक्त वस्त्रोद्योग, नागपुर प्रशासकीय इमारत क्रमाक 2, आठवा माळा, "बि" विंग, सिव्हील लाईन्स, नागपूर येथे पाठवावेत. अधिक माहितीसाठी प्रादेशिक उपआयुक्त, वस्त्रोद्योग यांच्याशी किंवा 0712-2537927 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन वस्त्रोद्योग प्रादेशिक उपआयुक्त तथा विभागीय हातमाग कापड स्पर्धा सदस्य सचिव सीमा पांडे यांनी केले आहे.

000000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

news 9.6.2017 dio buldana

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या