ग्रंथोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद ;चार लाख रुपयांचे ग्रंथविक्री

 

 

ग्रंथोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद ;चार लाख रुपयांचे ग्रंथविक्री

 

बुलडाणा, दि. 20 (जिमाका):  बुलढाणा येथे आयोजित ग्रंथोत्सव या कार्यक्रमाला ग्रंथप्रेमी, रसिक आणि वाचकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या ग्रंथोत्सवात जिल्ह्यातील ग्रंथप्रेमींनी विविध स्टॉलमधून तब्बल 4 लाख रुपयांचे ग्रंथ खरेदी करून वाचन संस्कृतीला चालना दिली.

 

दोन दिवसीय या ग्रंथोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी सकाळी 11 वाजता कृत्रिम बुद्धिमत्ता या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला. या चर्चासत्रात प्रा. डॉ. अरुण नन्हई, प्रा. कमलेश खिल्लारे, महेंद्र बोर्डे, विनोद देशमुख आणि प्रशांत सोनोने यांनी सहभाग घेतला.

 

यानंतर दुपारी 1.30 वाजता सार्वजनिक ग्रंथालयांचे वाचन चळवळीत योगदान या विषयावर विशेष सत्र पार पडले. या सत्राचे अध्यक्षस्थान डॉ. अनंत शिरसाट यांनी भूषवले. चर्चासत्रात डॉ. राजेंद्र गणगे, देविदास समुद्रवार, अनंत सातव, विष्णू इंगळे, सुनील झोरे आणि गोपाल सोनटक्के यांनी आपले विचार मांडले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गजेंद्रसिंग राजपूत यांनी केले.

 

यानंतर डॉ. सुनील पवार यांच्या अध्यक्षतेखाली कविसंमेलन पार पडले. या संमेलनात नितीन वरणकर, अरविंद शिंगाडे, राम सोनोने, सर्जेराव चव्हाण, कडूबा बनसोडे आणि किसन पिसे या कविनांनी आपल्या कविता सादर करून रसिकांची मने जिंकली.

 

ग्रंथोत्सवाच्या समारोप सत्राला डॉ. राजेश पाटील, रवींद्र साळवे, उदय देशपांडे, नेमिनाथ सातपुते आणि         डॉ. कि. वा. वाघ यांची प्रमुख उपस्थिती होती. समारोपानंतर डॉ. राजेश पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानून ग्रंथोत्सवाचा यशस्वी समारोप जाहीर केला. 00000000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

news 9.6.2017 dio buldana

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या