आयटीआय चिखली येथे निरुपयोगी साहित्यांचा लिलाव

 


आयटीआय चिखली येथे निरुपयोगी साहित्यांचा लिलाव

बुलडाणा, (जिमाका) दि. 18 : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, चिखली येथे निकामी व कालबाह्य यंत्रसामग्री, हत्यारे आणि अवजारे इत्यादी निर्लेखित साहित्याचा लिलाव केला जाणार आहे. यासाठी इच्छूकांकडून सिलबंद निविदा मागविण्यात आल्या आहेत.

संबंधित साहित्याची यादी आणि पाहणी दिनांक 17 मार्च पासून कार्यालयीन वेळेत उपलब्ध करण्यात आली असून साहित्याच्या संख्येत बदल करण्याचे तसेच निविदा नाकारण्याचे सर्वाधिकार संस्थेच्या प्राचार्यांनी राखून ठेवले आहेत.

इच्छुकांनी आपली मोहोरबंद निविदा दि. 26 मार्च रोजी सायंकाळी 4 वाजेपर्यंत संस्थेच्या निविदा पेटीत टाकावी. त्यानंतर आलेल्या निविदा स्वीकृत केल्या जाणार नाहीत.

निविदेसंबंधी अटी व शर्ती कार्यालयात उपलब्ध आहेत. तसेच निविदा अर्जासाठी 100 रुपये रोख भरून तो निश्चित कालावधीत प्राप्त करुन घेण्याचे आवाहन प्राचार्य जि.एस. भावले यांनी केले आहे. ०००


Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

news 9.6.2017 dio buldana

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या