महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयात अन्न भेसळ संदर्भात कार्यशाळा; प्रात्यक्षिकाव्दारे तज्ज्ञांचे मार्गदर्शन

 

 

महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयात अन्न भेसळ संदर्भात कार्यशाळा; प्रात्यक्षिकाव्दारे तज्ज्ञांचे मार्गदर्शन

 

            बुलडाणा, (जिमाका) दि. 26 : अन्न पदार्थामधील भेसळ ओळखण्याबाबत जनजागृती व्हावी यासाठी येथील महात्मा फुले विद्यालयात दि. 24 मार्च 2025 रोजी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अन्न पदार्थातील भेसळ कसे ओळखावे याबाबत तज्ज्ञांव्दारे प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून जनजागृती केली.

 

            दैनंदिन जीवनातील अन्नपदार्थांमध्ये वेगवेगळे अपायकारक पदार्थाची भेसळ होत आहे. या अन्न्पदार्थातील भेसळीला घरच्या घरी तपासायचे आणि भेसळ आहे, की नाही हे ठरवायचे कसे यासाठीची जागृती करण्यासाठी फुड सेप्टी ऑन व्हील या फिरती अन्न व औषधी प्रशासन प्रयोगशाळा छत्रपती संभाजीनगर यांच्या वतीने प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. सादरीकरणासाठी छत्रपती संभाजीनगरहून आलेले अन्न व औषध विश्लेषण रसायनशास्त्रज्ञ सत्यवान बादाडे यांनी प्रात्यक्षिकसह अन्न भेसळ ओळखयची कशी याविषयींचे सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी पनीर, खवा, हळद, लाल मिरची पावडर, डाळी यामध्ये होणाऱ्या भेसळी आणि त्या भेसळी वेगवेगळ्या रसायनाच्या माध्यमातून कशा ओळखायच्या याचे प्रात्यक्षिकाद्वारे सादरीकरण केले. विषारी घटकांचे अनेक खाद्यपदार्थात भेसळ होत असल्याने विद्यार्थ्यांनी दर्जाहीन, रस्त्यावरील उघडे खाद्यपदार्थ, शीतपेय, रंगबिरंगी मिठाई खाण्याचे टाळावे, असे आवाहन श्री. बादाडे यांनी केले.

 

अन्न् व औषध प्रशासन कार्यालयाचे सहायक आयुक्त प्रमोद पाटील यांनी विद्यार्थी व त्यांच्या घरातील कोणी गुटखा, पानमसाला, सिगारेट, तंबाखु इ. निकोटीन युक्त पदार्थ सेवन करत असतील तर त्यांना या वाईट सवयी सोडण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रवृत्त करावे, असेही आवाहन केले. तसेच नेहमी दर्जेदार पदार्थांचीच निवड करावी. भेसळ करणाऱ्या खाद्यपदार्थ विक्रेत्याविरुद्ध रीतसर तक्रार नोंदविण्याचे आवाहन यावेळी केले.

 

कार्यक्रमाचे प्रास्तविक व संचलन जेष्ठ शिक्षक नरेश पेदये यांनी केले. तर आभार प्रदर्शन शिक्षीका सुचीता सातव यांनी केले. यावेळी अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त प्रमोद पाटील, सहायक आयुक्त (औषधे) गजानन घिरके, मुख्याध्यापीका श्रीमती स्नेहलता मानकर, वरिष्ठ लिपीक श्रीकांत मोरे, महात्मा फुले मंडळाचे अध्यक्ष प्रकाश वानेरे, सचिव बाळासाहेब चौधरी तसेच शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षीका, विद्यार्थी, विद्यार्थीनी, कर्मचारी उपस्थित होते.

0000000000

Comments