मोताळा औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील महिला प्रशिक्षणार्थीना टूलकिट वाटप

 

मोताळा औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील महिला प्रशिक्षणार्थीना टूलकिट वाटप

बुलडाणा, (जिमाका) दि. 13 : मोताळा येथील सेवागिरी बाबा शासकिय औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे नांदी फाउंडेशनमार्फत महिलांना विविध व्यवसायातील प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणामध्ये उत्तीर्ण झालेल्या महिला प्रशिक्षणार्थीना नांदी फाउंडेशनव्दारे टूलकिट व प्रमाणपत्राचे वाटप दि. 12 मार्च रोजी करण्यात आले. यावेळी संस्थेचे प्राचार्य एस. डी. गंगावणे, नांदी फाउंडेशनचे प्रतिनिधी रजत वरादे व संस्थेतील सर्व कर्मचारी वृंद तथा प्रशिक्षणार्थी उपस्थित होते. 

 

नांदी फाउंडेशनव्दारे कोपा, ड्रेसमेकिंग, संधाता, नळ कारागीर, जोडारी, तारतंत्री, आयसीटीएसएम, कॉस्मेटोलॉजी या विविध व्यवसायातील प्रशिक्षणार्थी(मुली) यांना व्यवसाय निहाय सैध्दांतिक व प्रात्यक्षिक तांत्रिक प्रशिक्षण देण्यात आले. तसेच संस्थेतील कॉस्मेटोलॉजी व्यवसायामध्ये प्रशिक्षण घेत असलेल्या व प्रशिक्षण उत्तीर्ण केलेल्या आजीमाजी महिला प्रशिक्षणार्थीना ब्युटी फॉर बेटर लाइफ हे दहा दिवसाचे मोफत प्रशिक्षण दोन सत्रामध्ये देण्यात आले.   00000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

news 9.6.2017 dio buldana

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या