बेरोजगार उमेदवारांसाठी प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना; 31 मार्चपर्यंत अर्ज आमंत्रित

 

बेरोजगार उमेदवारांसाठी प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना; 31 मार्चपर्यंत अर्ज आमंत्रित

 

बुलडाणा, (जिमाका) दि. 13 : सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींसाठी केंद्र शासनाच्यावतीने प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना सुरू केली आहे. योजनंतर्गत तरुणांना मोठ्या कंपन्यांमध्ये इंटर्नशिपची संधी दिली जाणार असून दुसऱ्या फेरीसाठी पुन्हा अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. इच्छुक उमेदवारांनी दि. 31 मार्चपर्यंत अर्ज नोंदणी करुन योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त ग. प्र. बिटोडे यांनी केले आहे.

 

जिल्ह्यातील पात्र उमेदवारांनी http://pminternship.mca.gov.in  या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन आपली नोंदणी करावी. उमेदवारांना 12 महिन्यांसाठी इंटर्नशिप मिळणार असून दरमहा 5 हजार रुपये मिळणार आहेत. याशिवाय इंटर्नशिप पूर्ण झाल्यानंतर 6 हजार रुपये एक रक्कमी अनुदान दिले जाईल. या योजनेंतर्गत भारत सरकारकडून प्रत्येक प्रशिक्षणार्थीला प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेंतर्गत विमा संरक्षण दिले जाणार आहे.

00000000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

news 9.6.2017 dio buldana

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या