मुख्यमंत्री तिर्थदर्शन योजनेंतर्गत अयोध्या दर्शनाचे नियोजन; जेष्ठ नागरिकांनी सक्षम वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करण्याचे आवाहन

 

मुख्यमंत्री तिर्थदर्शन योजनेंतर्गत अयोध्या दर्शनाचे नियोजन;

जेष्ठ नागरिकांनी सक्षम वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करण्याचे आवाहन

        बुलडाणा, (जिमाका) दि. 5 :  मुख्यमंत्री तिर्थदर्शन योजनेंतर्गत जिल्ह्यातील 800 जेष्ठ नागरिकांना श्रीराम मंदिर अयोध्या(उत्तरप्रदेश) या तिर्थस्थळी ने-आण करण्यासाठी दि. 7 ते 11 मार्च 2025 या कालावधीत नियोजन करण्यात आले आहे. या तिर्थस्थळ दर्शनाकरीता पात्र असलेल्या जेष्ठ नागरिकांनी शारीरिकदृष्ट्या सक्षम असल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करण्याचे आवाहन समाज कल्याण सहायक आयुक्त भाऊराव रामसिंग चव्हाण यांनी केले आहे.

           

             श्रीराम मंदिर अयोध्या तिर्थस्थळी जाणाऱ्या पात्रताधारक जेष्ठ नागरिकांनी सामान्य रुग्णालय तसेच तालुकास्तरावरील आरोग्य यंत्रणाकडून वैद्यकीय तपासणी करुन त्याबाबतचे प्रमाणपत्र समाजकल्याण कार्यालयाकडे सादर करावे. तसेच प्रवासाकरीता जाण्याची तारीख व वेळ लाभार्थ्यांना यथावकाश दुरध्वनीव्दारे कळविण्यात येईल, अशी माहिती प्रसिद्धी पत्रकाव्दारे सहायक आयुक्त यांनी कळविले आहे.

0000000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

दत्तक विधान प्रक्रिया; इच्छुक पालकांनी कायदेशीर प्रक्रिया पुर्ण करावी