समाज कल्याण कार्यालयात संविधान दिन साजरा

 

समाज कल्याण कार्यालयात संविधान दिन साजरा

 

बुलडाणा, (जिमाका) दि. 26:  सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयात व कार्यालयाच्या अधिनस्त समाजकार्य महाविद्यालय, तसेच अनुसूचित मुलामुलींच्या शासकीय निवासी शाळा व मागासवर्गीय मुलामुलींचे शासकीय वसतिगृह येथे संविधान दिन कार्यक्रम साजरा करण्यात आला. या कार्यक्रमामध्ये संविधान प्रस्ताविकाचे वाचन करणे, संविधानाबाबत जनजागृती, नागरिकांचे हक्क व कर्तव्ये इत्यांदी विषयावर व्याख्याने आयोजित करण्यात आले होते.  

जिल्हास्तरावरील संविधान दिन कार्यक्रम हा महात्मा फुले समाजकार्य महाविद्यालय येळगांव व सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय बुलढाणा यांचे संयुक्त विद्यमाने समाजकार्य महाविद्यालय येळगांव येथे आयोजित करून साजरा करण्यात आलेला आहे. या कार्यक्रमामध्ये विद्यार्थी रॅली काढण्यात आली. कलापथकाच्या माध्यमातून संविधानाबाबत जनजागृती करण्यात आली.   यावेळी सर्व अधिकारी-कर्मचारी, नागरीक, महिला, विद्यार्थी यांचेसह एकत्रित संविधान प्रास्ताविकेचे वाचन करण्यात आले. या  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.हरिश साखरे हे होते. तर नंदकुमार गायकवाड, सुरेश जाधव, संदिप कपले, रणजित सोळंके, गणेश कपले आदींची प्रमुख उपस्थिती होते.

या कार्यक्रमांचे प्रास्तविक सतिश बाहेकर यांनी केले. तर मुख्य मार्गदर्शक म्हणून संदिप कपले, नंदकुमार गायकवाड यांनी आपल्या व्याख्यानामध्ये संविधान दिनाचे महत्व पटवून दिले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ.अविनाश गेडाम यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महात्मा फुले समाजकार्य महाविद्यालय येळगांव व सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय बुलढाणा येथील कर्मचाऱ्यांनी मोलाची भुमीका बजावली.

000000000

 

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

news 9.6.2017 dio buldana

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या