नवउद्योजकांनी स्टँड अप इंडिया योजनेचा लाभ घ्यावा *समाज कल्याण विभागाचे आवाहन

 

नवउद्योजकांनी स्टँड अप इंडिया योजनेचा लाभ घ्यावा

*समाज कल्याण विभागाचे आवाहन

बुलढाणा, (जिमाका) दि. 28: सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील नवउद्योजकांसाठी केंद्र शासनाच्या स्टँड अप इंडिया योजना राबविण्यात येते. या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन समाज कल्याण विभागातर्फे करण्यात आले आहे.

अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील नवउद्योजकांनी, उद्योग आधार नोंदणी पत्र, जात प्रमाणपत्र, बॅंकेचे कर्ज मंजूरीची कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहेत. सदर योजनेतील सवलतीस पात्र नवउद्योजकांनी 10 टक्के स्वहिस्सा भरण केल्यानंतर व बँकेने अर्जदारास स्टॅण्‍ड अप इंडिया योजनेंतर्गत 75 टक्के कर्ज मंजूर केल्यानंतर उर्वरित 15 टक्के राज्य शासनामार्फत देण्यात येणार आहे. 

पात्र लाभार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयास दि. 20 डिसेंबर 2024 पर्यंत सादर करावे, असे आवाहन समाज कल्याणच्या सहाय्यक आयुक्त मनोज मेरत  यांनी केले आहे. 00000000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

news 9.6.2017 dio buldana

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या