बालक दत्तक विधानासाठी अर्ज आमंत्रित

 

बालक दत्तक विधानासाठी अर्ज आमंत्रित

 

             बुलढाणा, (जिमाका) दि. 26: बालक दत्तक विधानासाठी अर्ज आमंत्रित करण्यात आले आहे. बालक दत्तक घेण्यासाठी इच्छूकांनी अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा बाल संरक्षण अधिकारी दिवेश मराठे यांनी केले आहे.

 

बाल न्याय मुलांची (काळजी व संरक्षण) अधिनियम 2015 व सुधारित 2021 व दत्तक नियमावली 2022 नुसार भारतात दत्तक विधान प्रक्रिया राबविल्या जाते.

 

बाळ दत्तक कोण घेऊ शकतो- भावी दत्तक माता हे शारीरिक, मानसिक, भावनात्मक आणि आर्थिक स्वरुपात सक्षम असणे आवश्यक आहे. या दत्तक विधान प्रक्रियेसाठी दोन्ही पती-पत्नी यांची सहमती असणे आवश्यक आहे. एकल महिला हि दत्तकसाठी बालक किंवा बालिका निवडु शकते, एकल पुरुष फक्त बालकाची निवड करु शकतो.

 

 बाळ दत्तक घेण्यासाठीची पालकांची वयोमर्यादा-   दोन वर्षाच्या आतील बालक असल्यास भावी दत्तक माता पिता यांची संयुक्तिक कमाल वयोमर्यादा 85 वर्ष, तर भावी एकल माता पिता यांची कमाल वयोमर्यादा 40 वर्ष, दोन   ते चार वर्षापर्यंतचे बालक असल्यास भावी दत्तक माता पिता यांची संयुक्तिक कमाल वयोमर्यादा   90 वर्ष, तर  भावी एकल माता व पिता यांची कमाल वयोमर्यादा 45 वर्ष, चार   ते आठ वर्षापर्यंतचे बालक असल्यास  भावी दत्तक माता पिता यांची कमाल वयोमर्यादा संयुक्तिक 100 वर्ष, तर भावी एकल माता व पिता यांची कमाल वयोमर्यादा 50 वर्ष,   आठ   ते 18 वर्षापर्यंतचे बालक असल्यास भावी दत्तक माता पिता यांची संयुक्तिक कमाल वयोमर्यादा  110 वर्ष, तर एकल भावी माता व पिता यांची कमाल वयोमर्यादा 55 वर्ष असावी.

दत्तक विधानासाठी अर्ज कुठे करावा- दत्तक विधानामार्फत बाळ घेऊ इच्छिणाऱ्या भावी माता पिता यांनी https://cara.wcd.gov.in या ऑनलाईन पोर्टलवर आपला अर्ज करावा. तसेच  दत्तक विधानाबाबत अधिक माहितीसाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय अंतर्गत जिल्हा बाल संरक्षण कक्ष, सुवर्ण नगर, मुठ्ठे ले आऊट, बस स्टँड मागे, डॉ.जोशी हॉस्पिटल यांचे शेजारी, बुलढाणा येथे भेट देऊ शकता व यशोधाम, दि लव्ह ट्रस्ट, खामगाव रोड, सुंदरखेड, बुलढाणा या विशेष दत्तक संस्थेस भेट देऊन माहिती प्राप्त करुण घेऊ शकता.

दत्तक विधानासाठी अर्ज केल्यानंतरची प्रक्रिया – दत्तक विधानासाठी अर्ज केल्यानंतर गृह अध्ययन अहवालासाठी अर्जदारांना निकटची दत्तक संस्था निवडावी लागते, सदर अर्ज केल्यानंतर गृह अध्ययन अहवाल करण्यासाठी सदर संस्थेने 60 दिवसाच्याआत अर्जदारांच्या घरी जाऊन अहवाल तयार करणे बंधनकारक आहे. सदर गृह अध्ययन अहवाल हा तीन वर्षासाठी लागू राहील.

            दत्तक विधान  संस्थेमार्फत गृह अध्ययन अहवाल कारा पोर्टलवर अपलोड केल्यानंतर एक महिन्यानंतर आपल्याला आपल्या पसंतीनुसार बाळ दिसने सुरु होईल. ज्यामध्ये बाळाचा फोटो, मेडीकल रिपोर्ट, बालक अभ्यास अहवाल इत्यादी माहिती असेल. जर एखादे बाळ आपणास पसंद पडल्यास सदर बालकास 48 तासाच्या आत कारा पोर्टलवरुन आरक्षित करावे लागेल. सदर भावी माता पितांची  दत्तक विधान समिती बैठकीत साक्षात्कार व आकलन केल्यानंतर व भावी माता पिता हे बालकासाठी योग्य वाटल्यास बालक पालकांच्या ताब्यात तात्पुरत्या स्वरुपात प्रि फोस्टर केअर अंतर्गत दिले जाते व संस्थेमार्फत   बालक व पालकांची नस्ती तयार करुन  न्यायालयामार्फत पालकांना दत्तक आदेश दिल्या जातो. अशी माहिती  जिल्हा बाल संरक्षण अधिकारी यांनी दिली आहे.

00000000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

news 9.6.2017 dio buldana

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या