निवडणूक खर्च निरिक्षकांची माध्यम कक्षाला भेट

 निवडणूक खर्च निरिक्षकांची माध्यम कक्षाला भेट


बुलडाणा, (जिमाका) दि.4:  विधानसभा निवडणूकीसाठी जिल्ह्यात दाखल झालेले निवडणूक खर्च निरिक्षक दानिश अब्दुल्लाह यांनी आज माध्यम कक्षास भेट देऊन कामकाजाची पाहणी केली. माध्यम कक्षातील कामकाजाविषयी समाधान व्यक्त केले. सहायक माहिती अधिकारी सतिश बगमारे यांनी माध्यम कक्षाविषयी सविस्तर माहिती दिली. 

        निवडणूक निरिक्षक दानिश अब्दुल्लाह म्हणाले की, निवडणूकीत उभे असलेल्या उमेदवारांच्या राजकिय जाहिरातीचे काटेकोर निरिक्षण करुन खर्चाचा नोंदी वेळोवेळी खर्च कक्षास सादर करावे. पेड न्यूज व सामाजिक माध्यमावरील पोस्ट याबाबत जागरुक राहून त्याची माहिती वेळोवेळी आयोगाला द्यावी. तसेच उमेदवारांकडून जाहिरात प्रमाणिकरणासाठी अर्ज आल्यास तात्काळ छानणी करुन प्रमाणपत्र द्यावे. समाज माध्यमांवर प्रसिद्ध होणारे जाहिराती, फेक न्युज, आक्षेपार्ह बातमीवर बारीक लक्ष ठेवण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या. 


       यावेळी त्यांचे सोबत मुख्य लेखा व वित्त अधिकारी तथा खर्च कक्षाचे नोडल अधिकारी प्रकाश राठोड, कोषागार अधिकारी ऋषीकेश वाघमारे तसेच माध्यम कक्षातील सायबर सेलचे आनंद हिवाळे, वरिष्ठ लिपीक प्रेमनाथ जाधव, प्रतिक फुलाडी, लिपीक सौरभ बढीये, संतोष पडघान, राहुल सुरडकर, सचिन पवार, प्रमोद राठोड, राम पाटील, राजू घाडगे आदी उपस्थित होते.

0000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

news 9.6.2017 dio buldana

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या