18 ते 20 नोव्हेंबरपर्यंत ध्‍वनीक्षेपकांच्या वापरावर निर्बंध

 

18 ते 20 नोव्हेंबरपर्यंत ध्‍वनीक्षेपकांच्या वापरावर निर्बंध

 

बुलडाणा, (जिमाका) दि. 14: विधानसभा सार्वत्रिक निवडणूक -2024 चा कार्यक्रम घोषित करण्यात आला असून जिल्ह्यात बुधवार दि.20 नोव्हेंबर रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदान होणार आहे. त्याअनुषंगाने निवडणूक आयोगाने मतदान दिवसाच्या 48 तास अगोदर करावयाच्या कारवाईबाबत मार्गदर्शक सूचना निर्गमित केले आहे. त्यानुसार ध्‍वनिक्षेपकाच्या वापराबाबत दि. 18 नोव्हेंबर रोजी सायंकाळी सकाळी 6 वाजेपासून ते दि. 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान प्रक्रिया संपेपर्यंत जिल्ह्यातील सातही मतदार संघाच्या क्षेत्रामध्ये निवडणूक प्रचाराचे ध्वनीक्षेपकाच्या वापरावर पूर्णपणे निर्बंध राहिल, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी दिले आहेत.

000000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

news 9.6.2017 dio buldana

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या