क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजना ; बालकांचे बॅंक खाते आधार सीडिंग करण्याचे आवाहन

 

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजना ; बालकांचे बॅंक खाते आधार सीडिंग करण्याचे आवाहन

बुलढाणा, (जिमाका) दि. 29: क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजनेसाठी बालकांचे बॅंक खाते आधार सीडिंग करण्याचे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांनी केले आहे.

बालकांचे बॅंक खाते आधार सीडिंग करण्यासाठी लाभार्थी बालकाचे वय 10 वर्षाच्या आत असावे. त्या बालकांचे पालकांसोबत संयुक्त खाते उघडुन त्या खात्याशी बालकाचा आधार क्रमांक सीडिंग करण्यात यावा. तसेच ज्या बालकांचे वय 10 वर्षापेक्षा जास्त आहे. अशा बालकांचे स्वतंत्र बॅंक खात्याशी सीडिंग नसल्यास या योजनेचा लाभ बँक खात्यामध्ये जमा होणार नाही.

याबाबत अधिक माहितीसाठी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, बस स्टॅडच्या पाठीमागे, मुठ्ठे-ले-आऊट, जोशी नेत्रालय जवळ, बुलडाणा येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा महिला बाल विकास अधिकारी अमोल ज्ञा. डिघुळे यांनी केले आहे.  00000000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

news 9.6.2017 dio buldana

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या