विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024; 18, 19, 20 व 23 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात मद्य विक्री बंद

 

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024;  18, 19, 20 व 23 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात मद्य विक्री बंद

 

बुलडाणा, (जिमाका) दि. 14: विधानसभा सार्वत्रिक निवडणूक -2024 चा कार्यक्रम घोषित करण्यात आला असून जिल्ह्यात दि.20 नोव्हेंबर रोजी मतदान तर दि.23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. या निवडणुका खुल्या, मुक्त तसेच निर्भय वातावरणात, शांततेत पार पाडण्याकरिता लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1951 च्या कलम 135 (सी ) तसेच मुंबई मदय निषेध कायदा 1949 चे कलम 142 नुसार सर्व अबकारी अनुज्ञप्ती बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी दिले आहेत.

 

दि. 18ऑक्टोबर 2024 सायंकाळी 5 वाजेपासून, दि. 19 नोव्हेंबर 2024 मतदानाच्या पूर्वीचा संपूर्ण दिवस, दि.20 ऑक्टोबर 2024, मतदानाचा संपूर्ण दिवस, दि.23 ऑक्टोबर 2024, मतमोजणीचा संपूर्ण दिवस जिल्‍ह्यातील सर्व सर्व देशी दारु विक्री, विदेशी मद्या विक्री, परमिट रुम, बिअर बार, बिअर शॉपी, (सीएल-2, सीएल-3, एफएल-2, एफएल-3, फॉर्म इ, एमएलबिआर-2 इ.) विक्री परवाने बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.  या आदेशाची जिल्ह्यातील सर्व अबकारी अनुज्ञप्तीधारकांनी नोंद घ्यावी, जे अनुज्ञप्तीधारक या आदेशाचा भंग करतील त्यांच्याविरुध्द मुंबई दारुबंद कायदा 1949 चे कलम 54 (सी ) नुसार आवश्यक कार्यवाही करण्यात येईल, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

0000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

news 9.6.2017 dio buldana

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या