साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ; विविध योजनेंतर्गत लाभ्यार्थ्यांची चिठ्ठीव्दारे निवड

 

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ; विविध योजनेंतर्गत लाभ्यार्थ्यांची चिठ्ठीव्दारे निवड

 

बुलडाणा, दि. 5 (जिमाका): साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळामार्फत विविध योजनेअंतर्गत ईश्वरचिठ्ठीव्दारे लाभार्थीची निवड डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे दि. 8 ऑक्टोंबर रोजी दुपारी 12 वाजता होणार आहे.

 

महामंडळामार्फत प्रकल्प मर्यादा पाच लाख रुपये व समृद्धी योजनेंतर्गत प्रकल्प मर्यादा एक लाख 40 हजार रुपये कर्ज योजनेसाठी लाभार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे. सुविधा कर्ज योजनेचे 125 कर्ज मागणी अर्जापैकी 117 अर्ज पात्र तर 8 अर्ज आपात्र ठरले आहे. महिला समृद्धी योजनेचे 33 कर्ज प्रस्तावाला मान्यता दिली असून त्यामधुन 25 महिला लाभार्थ्यांची निवड करावयाची आहे. पात्र अर्जाची यादी महामंडळ कार्यालयाच्या सूचना फलकावर लावण्यात आली आहे, याची नोंद घ्यावी.  तसेच लाभार्भ्यांनी बैठकीकरीता उपस्थित राहावे, असे आवाहन महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक जे. एम. गाभणे  यांनी केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

news 9.6.2017 dio buldana

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या