राजा राम मोहन रॉय प्रतिष्ठानकडून ग्रंथालयांना अर्थसहाय्य 30 नोव्हेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

 राजा राम मोहन रॉय प्रतिष्ठानकडून ग्रंथालयांना अर्थसहाय्य 30 नोव्हेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

 

बुलडाणा, (जिमाका) दि. 3:  राजा राम मोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान यांच्याकडून शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांच्या सर्वांगीण विकासासाठी अर्थसहाय्याच्या विविध योजना ग्रंथालय संचालनालयामार्फत  राबविण्यात येते. त्यानुसार यावर्षीसाठी ग्रंथालयांनी दि. 30 नोव्हेंबर 2024 पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा ग्रंथलय अधिकारी सुनिल पाटील यांनी केले आहे.


सन 2024-25 वर्षासाठी विविध समान व असमान निधी योजनांचा लाभ घेण्यासाठी राज्यातील शासनमान्य ग्रंथालयांकडून प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. त्यासंदर्भांतील नियम, अटी व अर्जाचा नमुना  www.rrlf.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. इच्छुक ग्रंथालयांनी अर्जाचा नमुना संकेतस्थळावरुन उपलब्ध करुन  घ्यावा. समान निधी योजनांमध्ये इमारत बांधकाम व विस्तार अर्थसहाय्य योजना (रु. 25 लक्ष रुपये), वरील योजनेच्या व्यतिरिक्त समान निधी योजनेंतर्गत इतर योजनांचा लाभ केंद्रीय पद्धतीने देण्यात येत असल्यामुळे इतर योजनेसाठीचे प्रस्ताव सादर करु नयेत.


असमान निधी योजनेत ग्रंथालय सेवा देणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना ग्रंथ, साधन सामग्री, फर्निचर, इमारत बांधकाम व विस्तारासाठी अर्थसहाय्य(फर्निचर खरेदी 4 लक्ष रुपये व इमारत बांधकाम 10 ते 15 लक्ष रुपये). राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान ‘ज्ञान कोपरा’ विकसित करण्यासाठी अर्थसहाय्य (2 लक्ष 50 हजार रुपये) व विशेष अर्थसहाय्य आधुनिकीकरण (2 लक्ष). महोत्सवी वर्ष साजरे करण्यासाठी अर्थसहाय्य(6 लक्ष 20 हजार व इमारत विस्तारासाठी 10 लक्ष). राष्ट्रस्तरीय चर्चासत्र, कार्यशाळा, प्रशिक्षण वर्ग व जागरुकता कार्यक्रम आयोजनासाठी अर्थसहाय्य( 1 ते 3 लक्ष रुपये), बाल ग्रंथालय व राजा राममोहन रॉय ग्रंथालय ‘बाल कोपरा स्थापन’ करण्याकरीता अर्थसहाय्य (6 लक्ष 80 हजार) देण्यात येते.


योजनांचा लाभ घेण्यासाठी इच्छुकांनी www.rrlf.gov.in या संकेतस्थळावरून माहिती घ्यावी. आवश्यकता असल्यास जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. ग्रंथालयांनी वरीलपैकी कोणत्याही एका योजनेसाठीचा प्रस्ताव विहित मार्गाने व मुदतीत आवश्यक कागदपत्रांसह इंग्रजी, हिंदी भाषेत चार प्रतीत जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयास दि. 30 नोव्हेंबर 2024 पर्यंत पोहचतील अशा बेताने पाठवावेत, असे आवाहन ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर यांनी केले आहे.

000000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

news 9.6.2017 dio buldana

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या