राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे बुलढाणा येथे आगमन व स्वागत

 राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे बुलढाणा येथे आगमन व स्वागत


         बुलडाणा,(जिमाका),दि.4 : राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे आज सकाळी बुलढाणा येथील एमएसआरटीसी वर्कशॉप मागील हेलीपॅडवर शासकीय हेलीकॉप्टरने आगमन झाले. प्रशासनाच्यावतीने जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. 


            यावेळी  मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात, पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, उपविभागीय अधिकारी शरद पाटील आदी उपस्थित होते. यावेळी पोलीस बँड पथकाद्वारे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांना मानवंदना देण्यात आली.

                                                   000000










Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

news 9.6.2017 dio buldana

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या