वन विभागाची कारवाई; खैराचा अवैध साठा जप्त

 

वन विभागाची कारवाई; खैराचा अवैध साठा जप्त

बुलडाणा, (जिमाका) दि.17:  बुलढाणा वनपरिक्षेत्र अंतर्गत वनपरिमंडळ नियतक्षेत्र बिरसिंगपुर मधील बुलडाणा-सिल्लोड रस्ता लगत देऊळघाट येथील बस स्टॅडच्या पाठीमागे अवैध खैर लाकुड साठा असल्याची माहिती धुळे विशेष अन्वेषण पथकाने दिली. त्यानुसार वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी तातडीने कारवाई करत खैराचा अवैध साठा जप्त केला. यामध्ये अंदाजे 11 घ.मी. खैर लाकुड साठा जप्त करुन संबंधीतांवर वन गुन्हा नोंदविण्यात आला. पुढील तपास सुरु असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी वर्षा कोळेकर यांनी प्रसिद्धी पत्रकाव्दारे दिली.

0000000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

news 9.6.2017 dio buldana

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या