भेसळ करणाऱ्या विक्रेंतावर होणार कारवाई, तक्रारी नोंदविण्याचे आवाहन

 दूध व दुग्धजन्य पदार्थ भेसळ नियंत्रण समिती गठीत;

> भेसळ करणाऱ्या विक्रेंतावर होणार कारवाई, तक्रारी नोंदविण्याचे आवाहन


बुलढाणा, दि. २८ (जिमाका) : सणासुदीच्या दिवसात अनेक ठिकाणी, मिठाई व गोड धोड पदार्थ बनविण्यासाठी दूध व दुग्धजन्य पदार्थाचा वापर केला जातो. खवा, बर्फी, मावा, पेढा मिठाई बनविण्यासाठी लागणारे दूध व खवा सारख्या पदार्थामध्ये भेसळ होण्याचे नाकारता येत नाही. त्यामुळे अशी भेसळ रोखण्यासाठी शासनाने दूध व दुग्ध जन्य पदार्थ भेसळ नियंत्रण समिती गठीत केली असून भेसळ करणाऱ्या विक्रेतांवर कडक कारवाई केली जाणार आहे. कोणीही स्थानिक दुकानदार किंवा विक्रेता भेसळ करीत असल्यास समितीच्या निदर्शनास आणून द्यावे, असे आवाहन समितीव्दारे करण्यात आले आहे.


अतिरिक्त जिल्हाधिकारी यांचा अध्यक्षतेखाली दूध व दुग्ध जन्य पदार्थ भेसळ नियंत्रण समिती गठीत केली आहे. त्यामध्ये अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक, पशुसंवर्धन उपायुक्त, वजन माप नियंत्रक अधिकारी सदस्य असून जिल्हा दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी सदस्य सचिव आहेत. 

जिल्ह्यातील मलकापूर, नांदुरा आणि सिंदखेडराजा, देऊळगाव राजा परिसरात बऱ्याच ठिकाणी दुग्धजन्य पदार्थ तयार करणारे स्थानिक व्यवसायिक आहेत. तसेच जिल्हा बाहेरून सुद्धा सण उत्सवानिमित्त खूप मोठ्या प्रमाणात मिठाई बाजारात विकायला येतात. त्यामुळे सतर्कता बाळगून नागरिकांना स्वच्छ व शुद्ध मिठाई किफायत दरात उपलब्ध व्हावी म्हणून सदर समिती कार्यरत असते. दि. 25 ऑक्टोंबर 2024 रोजी अन्न सुरक्षा अधिकारी जी. के. वसावे आणि जिल्हा दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी डॉ. डी. एन.काळे यांनी नांदुरा तालुक्यातील काही गावांमध्ये तसेच नांदुरा रेल्वे स्थानक परिसरात भेट देऊन दुग्धजन्य पदार्थ विक्रेत्याकडून दुग्धजन्य पदार्थांचे नमुने तपासणी करिता घेऊन पुढील कारवाई करण्यात येत आहे, अशी माहिती  जिल्हा दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी यांनी प्रसिद्धीपत्रकाव्दारे दिली आहे.

000000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

news 9.6.2017 dio buldana

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या