विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई; 8 लक्ष 22 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त

 

विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई; 8 लक्ष 22 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त

 

बुलडाणा,(जिमाका) दि.21: विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीची पुर्वतयारी म्हणून राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध मद्यनिर्मीती, वाहतुक व विक्रीवर प्रतिबंध घालण्यासाठी विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. मोहिमेंतर्गत गेल्या 15 दिवसात अवैध मद्यनिर्मिती व विक्री प्रकरणी 70 गुन्हे दाखल केले असून 77 जणांवर अटकेची कारवाई करण्यात आली आहे. कारवाईमध्ये दोन वाहने, 695 लिटर हातभट्टी दारु, 287 लिटर देशी दारु, 17 लिटर विदेशी दारु, 12 हजार 423 लिटर रसायन तर 5 लिटर बिअर जप्त करण्यात आले आहे. जप्त झालेला एकूण मुद्देमालाची किंमत 8 लक्ष 22 हजार 415 रुपये आहे, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक डॉ. पराग मो. नवलकर यांनी दिली आहे.

 

 राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक डॉ. नवलकर यांच्या नेतृत्वात जिल्ह्यात कार्यरत विविध अनुज्ञप्त्यांच्या व्यवहारावर देखरेख तसेच नियंत्रणासाठी सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वीत केली आहे. तसेच मध्यप्रदेश राज्याच्या सिमावर्ती भागात तपासणी नाके उभारुन सदर नाक्यावर परराज्यातून येणाऱ्या अवैध मद्य वाहतुकीवर अंकुश ठेवण्यात येत आहे. चार निरीक्षकांच्या नियंत्रणाखाली चार पथकांची नेमणुक केली आहे. त्यांच्या मदतीसाठी इतर नऊ अधिकारी नेमलेले आहेत. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, संचालक प्रसाद सुर्वे, राज्य उत्पादन शुल्काचे विभागीय उपआयुक्त अर्जुन ओहोळ यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात येत आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत दि. 1 ते 15 ऑक्टोबर 2024 दरम्यान संपूर्ण जिल्ह्यात विशेष मोहीम राबविण्यात आली. या मोहीमेमध्ये एकुण 70 गुन्ह्याची नोंद करण्यात आलेली असुन त्यामध्ये 69 वारंट गुन्ह्यांसह दोन वाहने जप्त करण्यात आली आहे. जप्त केलेला मुद्देमालाची किंमत 8 लक्ष 22 हजार 415 रुपयांचा आहे. तसेच बुलढाणा जिल्ह्यातील किरकोळ व ठोक विक्री मद्य अनुज्ञप्तीधारक यांच्या अनुज्ञप्तीमध्ये जर बनावट मद्य आढळुन आले आहे, अशावर अनुज्ञप्ती कायमस्वरुपी रद्य करुन त्यावर महाराष्ट्र दारुबंदी कायदा 1949 अंतर्गत कठोर कार्यवाही करण्यात आली आहे.

 

अवैध मद्य विक्रेते, वाहतुक व विक्री करणाऱ्यावर तसेच हॉटेल्स, ढाब्यांची तपासणी करुन ढाबा चालक, मालकांसह त्याठिकाणी मद्य सेवन करणाऱ्या व्यक्तींवर कठोर कारवाई करण्यात येत आहे. अनियमीतता आढळून येणाऱ्या परवानाधारक मद्यविक्री दुकानदारांवरही कारवाई सुरु आहे. नागरीकांनी अवैधरित्या मद्यविक्री करणाऱ्या हॉटेल्स ढाब्यावर जाऊन मद्य सेवन करु नये, असे आवाहन करण्यात येत आहे. अवैध मद्यविक्री करणाऱ्या हॉटेल्स, ढाब्याबाबत, अवैध मद्यनिर्मीती वाहतुकीबाबत माहीती देण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडील टोल फ्री नंबर १८००२३३९९९९ किंवा व्हॉटसअॅप नंबर ८४२२००११३३ वर किंवा excisesuvidha.mahaonline.gov.in या विभागाचे पोर्टलवर तात्काळ माहिती द्यावी.

0000000000000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

news 9.6.2017 dio buldana

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या