साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ; योजनेंतर्गत सुविधा कर्जाचे 30 तर महिला समृद्धीचे 25 लाभ्यार्थ्यांची निवड

 साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ; योजनेंतर्गत सुविधा कर्जाचे 30 तर महिला समृद्धीचे 25 लाभ्यार्थ्यांची निवड


बुलडाणा, (जिमाका) दि.9:   साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळामार्फत विविध योजनेअंतर्गत ईश्वरचिठ्ठीव्दारे लाभार्थीची निवड करण्यात आली आहे. सुविधा कर्ज योजनेचे 30 तर महिला समृद्धी योजनेअंतर्गत 25 कर्ज मागणी अर्ज निवड करण्यात आली आहे, अशी माहिती साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक यांनी दिली. 


साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळामार्फत सुविधा कर्ज योजनेअंतर्गत प्रकल्प मर्यादा 5 लाख रुपये व महिला समृध्दी योजनेअंतर्गत प्रकल्प मर्यादा एक लक्ष 40 हजार रुपये आहे. अध्यक्ष तथा निवासी उपजिल्हाधिकारी अजिंक्य गोडगे यांच्या अध्यक्षतेखाली लाभार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. त्यानुसार सुविधा कर्ज योजनेमध्ये 117 पात्र अर्जामध्ये 99 पुरुष व 18 महिला आहेत. त्यापैकी उदीष्टाप्रमाणे 18 पुरुष व 12 महिला असे एकुण 30 लाभार्थीची चिठ्ठीव्दारे निवड करण्यात आली आहे. तसेच महिला समृध्दी योजनेचे उदीष्टे 25 असुन एकुण 33 कर्ज प्रस्तावापैकी 25  महिला लाभार्थीची चिठ्ठीव्दारे निवड करण्यात आली आहे. यावेळी निवड समितीचे सदस्य समाजकल्याण विभाग ए.जे. हिवाळे प्रतीनिधी, जिल्हा व्यवस्थापक तथा सदस्य सचिव जगदिश म. गाभणे उपस्थित होते. सदर कार्यक्रम डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, चिखली रोड बुलडाणा येथे पार पडला असुन कार्यक्रमास ग्रामिण व शहरी भागातुन मोठया संख्येने अर्जदार व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच सर्व महामंडळाचे कर्मचारी उपस्थित होते.

00000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

news 9.6.2017 dio buldana

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या