जिल्हा क्रीडा प्रशिक्षण केंद्रात फुटबॉलचे प्रशिक्षण; खेळाडूंनी लाभ घ्यावा

 

जिल्हा क्रीडा प्रशिक्षण केंद्रात फुटबॉलचे प्रशिक्षण; खेळाडूंनी लाभ घ्यावा

            बुलढाणा, दि.18 (जिमाका) : क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमाने फुटबॉल खेळाचे जिल्हा प्रशिक्षण केंद्र जिल्हा क्रीडा संकुल, क्रीडानगरी, बुलढाणा येथे दि. 22 ऑक्टोंबर 2024 पासुन सुरुवात होत आहे. या प्रशिक्षण केंद्रात खेळाडूंना तंत्रशुध्द मार्गदर्शन विनामुल्य मिळणार आहे. तरी जिल्ह्यातील सर्व विद्यार्थी, खेळाडूंनी प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा,  असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी बि.एस.महानकर यांनी केले आहे.

           प्रशिक्षण केंद्र सायंकाळी 5 ते  7 वाजेदरम्यान सुरु राहिल. सदर प्रशिक्षण केंद्र कार्यान्वीत करण्याकरीता क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे यांचेमार्फत राज्य क्रीडा मार्गदर्शक(एन.आय.एस.) डॉ.जिवन मोहोड यांची बुलढाणा येथे नियुक्ती करण्यात आलेली आहे. खेळाडूंना तंत्रशुध्द मार्गदर्शन विनामुल्य प्रशिक्षण मिळणार असून याचा लाभ जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील सर्व विद्यार्थी, खेळाडूंनी घ्यावा.

00000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

news 9.6.2017 dio buldana

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या