वसंतराव नाईक महामंडळाच्या कर्जासाठी बुधवारी ईश्वर चिठ्ठी
बुलडाणा, दि. 3
: वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळातर्फे राबविण्यात
येणाऱ्या थेट कर्ज योजनेसाठी बुधवार, दि. 8 मार्च 2023 रोजी दुपारी 4.30 वाजता
ईश्वर चिठ्ठी काढण्यात येणार आहे.
विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्गाच्या
आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील
नागरिकांसाठी महामंडळातर्फे एक लाख रूपयांपर्यंतच्या मर्यादेत थेट कर्ज
योजना राबविण्यात येते. या योजनेतील लाभार्थ्यांची निवड जिल्हाधिकारी यांच्या
उपस्थितीत ईश्वर चिठ्ठीने करण्यात येणार आहे. या योजनेसाठी प्रस्ताव सादर केलेल्या
अर्जदारांनी जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक
एच. जी. आत्राम यांनी केले आहे.
00000
No comments:
Post a Comment