जिल्हाधिकारी कार्यालयात शहिद दिनानिमित्त अभिवादन
बुलडाणा, दि. 23 : शहिद दिनानिमित्त क्रांतीकारी भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन करण्यात आले.
निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते यांनी भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी नायब तहसिलदार संजय बंगाळे, नाझर गजानन मोतेकर, संजय वानखेडे यांच्यासह अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. उपस्थित अधिकारी आणि कर्मचारी यांनी पुष्पार्पण करून अभिवादन केले.
00000
शनिवारी जिल्हास्तरीय युवा संसद कार्यक्रम
*युवकांनी सहभागी होण्याचे आवाहन
बुलडाणा, दि. 23 : नेहरु युवा केंद्र आणि संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने जिल्हास्तरीय युवा संसद शनिवार, दि. 25 मार्च 2023 रोजी सहकार विद्या मंदिरातील सहकार ऑडीटोरिअम येथे आयोजित करण्यात आली आहे. मुख्य वक्ता म्हणून विधानसभेचे माजी सभापती अरुणभाई गुजराथी उपस्थित राहणार आहे.
युवा संसदेचे उद्घाटन खासदार प्रतापराव जाधव यांच्या हस्ते होणार आहे. बुलढाणा अर्बन को-ऑपरेटीव्ह क्रेडीट सोसायटीचे अध्यक्ष राधेश्याम चांडक अध्यक्षस्थानी राहतील. यावेळी आमदार संजय गायकवाड, जिल्हाधिकारी डॉ. ह. पि. तुम्मोड, उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन कदम, राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉ. राजेश बुरंगे उपस्थित राहणार आहेत.
यात ‘वसुधैव कुटुंबकम’ असून लाईफस्टाईल फॉर एन्व्हायरमेंट, आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 या विषयांवर मार्गदर्शन आणि युवकांमध्ये चर्चा, त्याचबरोबर युवकांचे सांस्कृतिक कार्यक्रम राहणार आहेत. यात युवकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन नेहरु युवा केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी नरेंद्र डागर यांनी केले आहे.
00000
विविध उपक्रमांनी जलजागृती सप्ताह साजरा
बुलडाणा, दि. 23 : जलसंपदा विभागातर्फे आंतरराष्ट्रीय जल दिनानिमित्त जिल्ह्यात जलजागृती सप्ताहात जलदौड, जलप्रतिज्ञा, पाणी वापर संस्थांच्या कार्यशाळा, पाणी बचतीच्या कार्यशाळा, रांगोळी स्पर्धा, जनजागृती, महिला मेळावा आदी विविध उपक्रमांनी जलजागृती सप्ताह साजरा करण्यात आला. सप्ताहाचा समारोप बुधवार, दि. 22 मार्च रोजी पार पडला.
जलसंपदा विभागाच्या वतीने दि. 16 ते 22 मार्च दरम्यान जिल्ह्यात जलजागृती सप्ताह साजरा करण्यात आला. या सप्ताहात शाळा, महाविद्यालय, बसस्थानक आणि इतर सार्वजनिक ठिकाणी जलजागृतीपर कार्यक्रम घेण्यात आले. सप्ताहाचा समारोप संनियत्रण अधिकारी तुषार मेतकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपकार्यकारी अभियंता क्षितीजा गायकवाड, उपविभागीय अभियंता सुनिल नागपुरे उपस्थित होते.
श्री. मेतकर यांनी येत्या काळात पाण्याची समस्या निर्माण होणार असल्याने नागरिक तसेच औद्योगिक संस्थांनी पाण्याचा काटकसरीने उपयोग करावा, असे आवाहन केले.
श्रीमती गायकवाड यांनी महिलांची पाणीबचतीविषयक भुमिका विषद केली. सुरुवातीला जलप्रतिज्ञेचे सामुहिक वाचन घेण्यात आले. यावेळी जलसंपदा विभागाच्या वतीने जिल्ह्यात जलजागृती सप्ताहानिमित्त घेण्यात आलेल्या कार्यक्रमाची माहिती देण्यात आली. मंजितसिंग राजपूत यांनी सुत्रसंचालन केले. केशव जवादे यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी करण उमाळे, भरत राऊत, जानकीराम आव्हाळे, रवींद्र पाटील, सतिष खोडके, प्रल्हाद गोरे, शत्रुघ्न धोरण, भगवान देवकर, राजू चव्हाण यांनी पुढाकार घेतला.
00000
तंबाखू नियंत्रण पथकाची खामगावात कारवाई
*पानटपरीचालकांकडून 10 हजारांचा दंड वसूल
बुलडाणा, दि. 23 : तंबाखू नियंत्रण पथकाने सिगारेट व तंबाखू प्रतिबंधक कायदा 2003 नुसार खामगाव येथे मंगळवार, दि. 21 मार्च 2023 रोजी कारवाई केली. यात पानटपरी चालकांकडून 10 हजार 600 रूपयांचा दंड वसूल करण्यात आला.
ही कारवाई जिल्हाधिकारी डॉ. ह. पि. तुम्मोड यांच्या निर्देशानुसार जिल्हा रुग्णालयातील राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाची चमूतील जिल्हा सल्लागार डॉ. लता भोसले, सामाजिक कार्यकर्त्या अर्चना आराख, अन्न सुरक्षा अधिकारी श्री. वसावे, श्री. देशमुख, खामगाव शहर पोलिस ठाण्याचे गणेश कोल्हे, श्री. वावस्कर यांनी केले. ही कारवाई जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भुसारी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पाटील, खामगा शहराचे ठाणेदार शांतीकुमार पाटील, गुन्हे अन्वेषण विभागाचे अशोक लांडे यांच्या मार्गदर्शनात 39 टपरीचालकांवर कारवाई करण्यात आली.
00000
No comments:
Post a Comment