शेतकऱ्यांनी
पिवळा मोझॅकची उपाययोजना करावी
*कृषि
विभागाचे आवाहन
बुलडाणा, दि. 25 : सोयाबीन पिकावरील
पिवळा मोझॅक रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेतकऱ्यांनी उपाययोजना करावी, असे
आवाहन कृषि विभागाने केले आहे.
सोयाबीन पिकावर सोयबीन पिवळा मोझॅक रोगाचा
प्रादुर्भाव आढळून येत आहे. सुरवातीच्या अवस्थेत फक्त काही झाडांवरच हा
प्रादुर्भाव आढळून येतो. परंतु नंतर मात्र पांढऱ्या माशीमुळे रोगाचा प्रसार होतो.
संपूर्ण पिक सोयाबीन पिवळा मोझॅकला बळी पडू शकत असल्याने शेतकऱ्यांनी तातडीने
उपाययोजना करणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांनी सोयाबीन पिवळा मोझॅकने ग्रस्त झाडे तात्काळ उपटून घ्यावी आणि नष्ट करावी, एकरी
१५ ते २० पिवळे चिकट सापळे लावावेत.
पांढऱ्या माशीच्या नियंत्रणासाठी
थायमीथोक्झाम १२.६० टक्के अधिक लँबडा सायहँलोथ्रोन ९.५० टक्के झेडसी @ २.५ मिली
प्रती १० लिटर पाणी हे व्यापारी नाव अलीका किंवा बितासायफ्लूथ्रोन ८.४९ टक्के अधिक
इमिडाक्लोप्रीड १९.८१ टक्के @ ७ मिली प्रती १० लिटर पाणी हे व्यापारी नाव सोलोमोन किटकनाशकाची
तात्काळ फवारणी करावी, असे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी सं. गं. डाबरे यांनी
कळविले आहे.
00000
राष्ट्रीय
क्रीडा दिनानिमित्त विविध कार्यक्रम
बुलडाणा, दि. 25 : हॉकीचे जादुगार
मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिनानिमित्त यावर्षीही 29 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय क्रीडा
दिन साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त जिल्ह्यात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात
आले आहे.
जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालयात
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यात मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पुजन, व्याख्यानमाला, राष्ट्रीय खेळाडूंचा
सत्कार, मान्यवरांचे खेळाडूंना मार्गदर्शन, विविध खेळाचे प्रात्यक्षिक आदी
कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
हॉकी स्पर्धेसाठी सहकार विद्या मंदिर,
बुलडाणा, स्पर्धा संयोजक सय्यद आबीद, फुटबॉल स्पर्धेसाठी एडेड हायस्कूल, बुलडाणा,
राहुल औशालकर, सिकई-वुशू, स्वयंसिध्दा प्रात्यक्षिकासाठी अरविंद्र अंबुसकर, मैदानी
खेळासाठी जिल्हा क्रीडा संकुल येथे विजय वानखेडे, गणेश जाधव, समाधान टेकाळे, खो-खो
स्पर्धेसाठी जिजामाता क्रीडा व व्यापारी संकुल, बुलडाणा, सागर उबाळे, हॅण्डबॉल
स्पर्धेसाठी जिजामाता क्रीडा व व्यापारी संकुल, बुलडाणा मनोज श्रीवास, प्रणव
काठोके, आर्चरी स्पर्धेसाठी तालुका क्रीडा संकुल, बुलडाणा, चंद्रकांत इलग, कबड्डी
स्पर्धेसाठी जिजामाता क्रीडा व व्यापारी संकुल, बुलडाणा, गोपालसिंग राजपूत,
वसंतराव धोरण, बॉक्सिंग स्पर्धेसाठी जिल्हा क्रीडा संकुल, राज सोळंकी, मोहम्मद
सुफीयान, व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी प्रबोधन विद्यालय, रविंद्र गणेशे, फुटबॉल आणि
खो-खो स्पर्धेसाठी श्री शिवाजी विद्यालयाचे क्रीडांगण संदीप पाटील आदी खेळाच्या
प्रदर्शनीय स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. तसेच तालुकास्तरावर तालुका क्रीडा
संकुल येथे विविध कार्यक्रम आणि वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित केले आहे.
शहरातील विविध शाळा, महाविद्यालय,
क्लब, संघटना, प्रशिक्षण केंद्र आदी ठिकाणी खेळाडूनी शारदा ज्ञानपीठ, बुलडाणा येथे
होणाऱ्या मुख्य कार्यक्रमला उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश
जाधव यांनी केले आहे.
अधिकृत एकविध खेळ संघटनेतर्फे आयोजित
अधिकृत राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये प्राविण्य आणि सहभाग
घेतलेल्या खेळाडूंनी प्रमाणपत्राची छायांकित प्रत क्रीडा कार्यालयास दि. 28 ऑगस्ट 2022
पर्यंत सादर करावी, तसेच दि. 29 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 7.30 वाजता शारदा ज्ञानपीठ,
बुलडाणा येथे उपस्थित राहावे. क्रीडादिनाच्या कार्यक्रमासाठी शारदा ज्ञानपीठ,
बुलडाणा येथे सकाळी 8 वाजता उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश
जाधव यांनी केले आहे.
00000
शुक्रवार,
बुधवारचे दिव्यांग तपासणी शिबीर रद्द
बुलडाणा, दि. 25 : जिल्हा
रूग्णालयात नियमितपणे दिव्यांग तपासणी शिबीर घेण्यात येते. मात्र तपासणीच्या दिवशी
सार्वजनिक सुट्टी असल्यामुळे हे शिबीर रद्द करण्यात आले आहे.
प्रत्येक बुधवारी अस्थीव्यंग, नेत्र
दिव्यांग बोर्ड आणि प्रत्येक शुक्रवारी मतिमंद, मनोरूग्ण, कान, नाक, घसा संबंधित
दिव्यांग बोर्ड सुरू असते. मात्र शुक्रवार, दि. 26 ऑगस्ट 2022 रोजी पोळा आणि बुधवार,
दि. 31 ऑगस्ट 2022 रोजी गणेश चतुर्थी निमित्त शासकीय सुट्टी असल्यामुळे या दोन्ही
दिवसांचे दिव्यांग तपासणी शिबीर रद्द करण्यात आले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील
नागरिकांनी तपासणीसाठी येऊ नये, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक यांनी केले आहे.
00000
No comments:
Post a Comment