ज्ञानगंगा अभयारण्यात प्रतिबंधात्मक कलम लागू
बुलडाणा, दि. 24 : ज्ञानगंगा अभयारण्यातील अवैधरित्या
प्रवेश रोखणे आणि वनातील कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी अभयारण्य क्षेत्रात
प्रतिबंधात्मक कलम लागू करण्यात आले आहे. हे आदेश दि. 30 सप्टेंबर 2022 पर्यंत
लागू राहतील.
विभागीय वनअधिकारी, वन्यजीवन विभाग अकोला यांनी ज्ञानगंगा अभारण्य हे पर्यटनदृष्ट्या जिल्ह्याचे वैभव आहे. यामध्ये बुलडाणा आणि खामगाव वन्यजीव परिक्षेत्र समाविष्ट आहेत. खामगाव परिक्षेत्रामध्ये एकूण 12 बीट असून सदर परिक्षेत्राच्या सीमेला लागून मेंढपाळांची गावे आहेत. अभयारण्यामध्ये अवैधरित्या प्रवेश करुन मेंढीद्वारे किंवा कोणत्याही गुराद्वारे अवैध चराई करणे हा वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 व भारतीय वनकायदा 1927 नुसार दंडनीय अपराध आहे. सदर मेंढपाळ हे ज्ञानगंगा अभयारण्यातील अतिसंवेदनशिल क्षेत्रात अवैधरित्या प्रवेश करुन अवैध मेंढी चराई करतात.
अभयारण्यातील क्षेत्रात दि. 8 ऑगस्ट 2022 रोजी कार्यरत
असलेले वन कर्मचारी आणि इतर 21 कर्मचारी चिंचखेड बंड नियत क्षेत्रामध्ये सामुहिक
जंगलगस्त करताना
त्याठिकाणी सुमारे 4 हजार मेढ्यांसह 25-30 मेंढपाळ अवैध चराई करीत असल्याचे आढळून
आले. मेंढ्या व मेंढपाळ यांना अटकाव करुन 2 मेंढपाळांना ताब्यात घेण्यात आले.
अटकाव केलेले मेंढपाळ आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी वन कर्मचाऱ्यांवर दगडफेक करुन
अश्लील भाषेत शिवीगाळ केली. राज्य राखीव पोलीस गट क्र. 4 नागपूर यांचे चमूतील 2
कर्मचाऱ्यांवर प्राणघातक हल्ला करुन मेंढ्यासह पळून गेले.
या अभयारण्यात कायदा, शांतता आणि सुव्यवस्था अबाधित
राहण्यासाठी अभायारण्य क्षेत्रात दि. 16 ऑगस्ट ते 30 सप्टेंबर 2022 या कालावधीत
फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 144 लागू करण्यात आले आहे. त्यामुळे ज्ञानगंगा
अभयारण्यातील अतिसंवेदशिल क्षेत्राचे संरक्षण करणे सोईचे होईल. यासाठी जिल्हाधिकारी
एस. रामामुर्ती यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 (1) (2) (3) नुसार
प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करुन जिल्ह्यातील गेरु, बोथा, बोथा
कवडगांव, बोथा, पिंपरचोच, कवडगांव, गिलोरी, तारापूर, गावामधील खामगाव वन्यजीव
परिक्षेत्रामध्ये दि. 22 ऑगस्ट ते 30 सप्टेंबर 2022 पर्यंत प्रतिबंधात्मक कलम लागू
केले आहे.
000000
शेतकऱ्यांनीखरीप हंगाम पिक स्पर्धेत सहभागी व्हावे
*कृषि विभागाचे आवाहन
बुलडाणा, दि.
24 : पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी येत्या
हंगामात खरीप हंगाम पिक स्पर्धा घेण्यात येत आहे. यात शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे,
असे आवाहन कृषि विभागातर्फे करण्यात आले आहे.
शेतीची उत्पादकता वाढावी, यासाठी शेतकऱ्यांकडून विविध प्रयोग
करण्यात येतात, अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना प्रोत्साहन देवून विजेत्या शेतकऱ्यांना
गौरव केल्यास त्यांचे मनोबल वाढण्यास मदत होते. ते अधिक उमेदीने नवनवीन आणि
अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करतील. यामुळे कृषि उत्पादनामध्ये भर घालण्यासाठी
शेतकऱ्यांचे योगदान मिळेल, तसेच परिसरातील इतर शेतकऱ्यांना मार्गदर्शक होवून
जिल्ह्याच्या पर्यायाने राज्याच्या एकूण उत्पादनात भर पडेल, यासाठी कृषि विभागातर्फे
पिक स्पर्धा राबविण्यात येत आहे.
पिकस्पर्धेतील जिल्ह्याकरिता
खरीप हंगामातील स्पर्धेसाठी सोयाबीन, तूर आणि मका पिके समाविष्ट करण्यात आली आहेत.
प्रती तालुका किमान स्पर्धक संख्या ही सर्वसाधारण गटासाठी 10 आणि आदिवासी गटासाठी
5 शेतकरी राहिल.पिकस्पर्धेमध्ये सहभागी लाभार्थीचे शेतावर त्या पिकाखालील किमान 10
आर क्षेत्रावर सलग लागवड असणे आवश्यक आहे. पुरेशे अर्ज प्राप्त झाल्यानंतर संबंधित
पिकाची पिकस्पर्धा संबधित तालुका कृषि अधिकारी जाहीर करतील.
स्पर्धेत भाग
घेणाऱ्या शेतकऱ्याला एकाच वेळी एकापेक्षा जास्त पिकांसाठी स्पर्धेत सहभाग घेता येईल.
सर्व गटासाठी प्रवेश शुल्कपिकनिहाय प्रत्येकी 300रुपये राहणार असून अर्ज दाखल करण्याची
अंतिम दि. 31 ऑगस्ट 2022 आहे.पिकस्पर्धेत भाग घेऊ इच्छिणाऱ्या स्पर्धकांनी अर्ज विहित
नमुन्यामध्ये भरून त्यासोबत प्रवेश शुल्क चलन, सातबारा, आठ अ चा उतारा आणिअनूसुचित
जमातीचा असल्यास जात प्रमाणपत्र या कागदपत्राची पूर्तता करून संबधित तालुका कृषि अधिकारी
कार्यालयात अर्ज सादर करावे लागणार आहे.
तालुका
पातळीस्तरावर
सर्वसाधारण व आदिवासी गटासाठीपहिले 5 हजार रूपये, दुसरे 3 हजार रूपये, तिसरे
दोन हजार रूपये बक्षीस असणार आहे.जिल्हा पातळीस्तरावर सर्वसाधारण व आदिवासी गटासाठीपहिले 10 हजार रूपये, दुसरे 7 हजार रूपये, तिसरे 5 हजार रूपये बक्षीस
असणार आहे.विभाग पातळीस्तरावर सर्वसाधारण व
आदिवासी गटासाठीपहिले
25 हजार रूपये, दुसरे 20 हजार रूपये, तिसरे 15 हजार रूपये बक्षीस असणार आहे. राज्य पातळीस्तरावर सर्वसाधारण व आदिवासी गटासाठीपहिले 50 हजार रूपये, दुसरे
40 हजार रूपये, तिसरे 30 हजार रूपये बक्षीस असणार आहे.
पिकस्पर्धेच्या मार्गदर्शक सूचना कृषि विभागाच्या krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. तसेच अधिक माहितीसाठी कृषि
सहाय्यक, कृषि पर्यवेक्षक, तालुका कृषि अधिकारी कार्यालय यांच्याशी संपर्क साधावा.
सोयाबीन, तूर आणि मका या पिकासाठी दि. 31 ऑगस्ट 2022 पूर्वी अर्ज सादर करून
पिकस्पर्धेमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन कृषि उपसंचालक व्ही. आर. बेतीवार यांनी
केले आहे.
00000
पिकविम्यासाठी शेतीच्या नुकसानीची माहिती 72 तासात द्यावी
*कृषि विभागाचे आवाहन
बुलडाणा, दि.
24 : प्रधानमंत्री पिक विमा योजनेत खरीप हंगाम 2022 मध्ये सहभागी झालेल्या शेतकऱ्यांनी
त्यांच्या शेतपिकाच्या नुकसानीची माहिती पिक विमा कंपनीस 72 तासाच्या आत कळविण्यात
यावी. तसेच आपल्या क्षेत्रातील विमा प्रतिनिधीची संपर्क करावा, असे आवाहन कृषि विभागाने
केले आहे.
स्थानिक आपत्ती आणि काढणी पश्चात नुकसान आणि या जोखीमेच्या बाबी अंतर्गत विमा
संरक्षण घेतलेल्या शेतकऱ्यांनी शेत सर्वे नंबरनुसार बाधित पिक आणि बाधित क्षेत्राबाबत
घटना घडल्यापासून 72 तासाच्या आत नुकसानग्रस्त क्षेत्र तपशील कळविणे बंधनकारक आहे.
तक्रार दाखल करताना शेतकऱ्यांनी एकापेक्षा जास्त गट क्रमांकातील किंवा एकापेक्षा जास्त
पिकाचे पीक विमा भरले असतानाही त्यांना एकच पावती मिळते. अशा वेळी क्रॉप इन्शुरन्स
ॲप, टोल फ्री क्रमांक 18004195004 वर तक्रार दाखल करताना गट आणि पिकाकरिता गट आणि पिकानुसार
तक्रार दाखल करावी.तक्रार दाखल झाल्यानंतर प्रत्येक तक्रारीकरिता स्वतंत्र तक्रार क्रमांकशेतकऱ्यांच्या
मोबाईलवर येईल.सदरील तक्रार क्रमांकजतन करुन ठेवावे.
भारतीय कृषि विमा कंपनीचे जिल्हा, तालुका प्रतिनिधी यांची माहिती पुढीलप्रमाणे
आहे. बुलडाणाजिल्हास्तरसाठी दिलीप उ. लहाने 9881017458, C/O प्रशांत तिमसे, मुठे ले-आऊट,
डॉ. काटकर रुग्णालयासमोर, बुलडाणा, 443001, बुलडाणा तालुक्यासाठी अमोल द. गाडेकर, 9588411588,C/O प्रशांत तिमसे, मुठे ले-आऊट, डॉ.
काटकर रुग्णालयासमोर, बुलडाणा,443001, चिखलीसाठीयोगेश दि. लहाने, 7775900453,भूदेवी
कॉम्प्लेक्स, राऊतवाडी, बस स्टॉप, चिखली, 443201,मोताळासाठीमंगेश द.गाडेकर,9158357731,महाजनहॉस्पिटलच्यामागील
बाजूला, नवीन मलकापूर रोड, सांगळद, मोताळा.443103,मलकापूरसाठीमनोहर सं.पाटील,
9098918031, दुकानक्रमांक3, दिपक नगर, बुलढाणा
रोड, मलकापूर 443101,मेहकरसाठी नंदकिशोर भा.जोगदंडे, 9309981345,प्रभाग क्रमांक 7,
शिवाजी नगर, म्हाडा कॉलनी, संकल्प हॉस्पिटलजवळ, मेहकर, 443301,लोणारसाठी अमोल न.चव्हाण,
8390730020,तालुकाकृषी कार्यालय, लोणार, मेहकर रोड जवळ, लोणार, 443302,देऊळगाव राजासाठीश्रीकृष्णा
ग.ढाकणे,8698491195, सिव्हिल कॉलनी, वार्ड क्र. 11, रेस्ट हाऊसजवळ, देऊळगाव राजा,
443204, सिंदखेड राजासाठी रवींद्र भा.गोरे, 9503186720, शिवालय बिल्डिंग, गायत्री हॉस्पिटलजवळ,
मेहकर रोड, सिंदखेड राजा, 443203, खामगावसाठी सुर्यकांत ग.चिंचोले, 8806677166, वामननगर,
वामननगर चौक जवळ, खामगाव 444303,शेगावसाठी पवन ज्ञा. डीक्कर, 7887978715,दुकान क्रमांक ३, बस डेपोजवळ राजेश्वरी
कॉलनी, श्याम निवास, शेगाव 443203, संग्रामपूरसाठी वैभव कि.गाळकर, 8806176215, दुकान क्रमांक २, बीएसएनएल कार्यालयासमोर, जय
माता दी नगर, संग्रामपूर 443202,जळगाव जामोदसाठी विशाल
भ. मांटे, 8698522403, देशमुखवाडी, प्रभाकरनगर, नांदुरा रोड, जळगाव जामोद, 443402,
नांदुरासाठीकुंदन शा.सोळंके, 9657253445, दुकान क्रमांक ६, बालाजी कॉम्प्लेक्स, हनुमान
मंदिरासमोर, नांदुरा 443204 या विमा कंपनीच्या प्रतिनिधी आणि pikvima@aicofindia.comया ई-मेलवर संपर्क करावा, असे आवाहन कृषि विभागातर्फे करण्यात आले आहे.
00000
जिल्हा ग्रंथालयात स्वातंत्र्य सैनिक चरित्रकोश उपलब्ध
बुलडाणा, दि. 24 : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत
महात्सवानिमित्त स्वातंत्र्य सैनिक चरित्रकोश खंड 1 व 2 विदर्भ विभाग खंड जिल्हा
ग्रंथालय अधिकारी कार्यालयात उपलब्ध आहेत.
सदर चरित्रकोशामध्ये विदर्भातील स्वातंत्र्य सैनिकांची
माहिती वाचकांना
000000000
माजी सैनिकांच्या पाल्यांना विशेष गौरव पुरस्कार
*अर्ज करण्याचे आवाहन
बुलडाणा, दि. 24 : जिल्ह्यातील माजी सैनिक, विधवा
यांच्या पाल्यांना विशेष गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. यासाठी दि.
20 सप्टेंबर 2022 पर्यंत अर्ज करावे लागणार आहे.
कल्याणकारी निधी नियमांतर्गत दरवर्षी दहावी आणि बारावी
उत्तीर्ण पाल्यांसाठी, पदवी पदव्युत्तर आणि आयआयटी, आयआयएम, एआयआयएमएसकरिता विशेष
गौरव पुरस्कार देण्यात येणार आहे. दहावी, बारावी बोर्डाच्या परीक्षेत 90 टक्क्यांपेक्षा
जास्त गुण मिळवून उत्तीर्ण होणाऱ्या प्रत्येक शिक्षण मंडळातील पहिल्या 5 पाल्यांना
एक रकमी 10 हजार रूपये पुरस्कार, पदवी, पदव्युत्तर विद्यापीठात प्रथम क्रमांकाने
उत्तीर्ण पाल्यास एकरकमी 10 हजार रूपये विशेष गौरव पुरस्कार, आयआयटी, आयआयएम, एआयआयएमएस
अशा नामवंत आणि ख्यातीप्राप्त संस्थांमध्ये प्रवेश मिळालेल्या माजी सैनिक, विधवा
यांच्या पाल्यांना 25 हजार रूपये विशेष गौरव पुरस्कार देण्यात येईल.
पात्र माजी सैनिक, विधवा पत्नी यांनी आपले अर्ज सर्व
आवश्यक कागदपत्रांसह दि. 20 सप्टेंबर 2022 पर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय,
बुलडाणा येथे जमा करावेत. विशेष गौरव पुरस्काराची प्रकरणे कार्यालयात उपलब्ध आहेत.
इच्छुकांनी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, बुलडाणा येथे संपर्क करावा, असे आवाहन
सहायक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी भास्कर पडघान यांनी केले आहे.
00000000
राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय खेळाडूंना विशेष गौरव पुरस्कार
बुलडाणा, दि. 24 : राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर
यश संपादन करणाऱ्या जिल्ह्यातील माजी सैनिक, विधवा यांच्या पाल्यांना विशेष गौरव
पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. यासाठी इच्छुकांनी दि. 20 सप्टेंबर 2022
पर्यंत अर्ज करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील माजी सैनिक, पत्नी, पाल्यांनी राष्ट्रीय,
आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळातील पुरस्कार प्राप्त खेळाडू, साहित्य, संगीत, गायन,
वादन, नृत्य आदी क्षेत्रातील पुरस्कार विजेते, यशस्वी उद्योजकांचा पुरस्कार, संगणक
क्षेत्रात अतिउत्कृष्ट कामगिरी, तसेच देश, राज्याची प्रतिष्ठा वाढवतील अशा
स्वरुपाचे लक्षणीय काम करणाऱ्या माजी सैनिक, पत्नी, पाल्यांना त्यांच्या कार्याबद्दल
राष्ट्रीयस्तरासाठी 10 हजार रूपये, आंतरराष्ट्रीयस्तरासाठी 25 हजार रूपयांचा विशेष
गौरव पुरस्कार सैनिक कल्याण विभागाकडून दिला जातो.
निकषास पात्र माजी सैनिक, विधवा पत्नी यांनी आवश्यक सर्व
कागदपत्रांसह दि. 20 सप्टेंबर 2022 पर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, बुलडाणा
येथे जमा करावेत. विशेष गौरव पुरस्काराची प्रकरणे कार्यालयात उपलब्ध आहेत. तरी
इच्छुक पात्रता असलेल्यांनी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, बुलडाणा येथे संपर्क करावा,
असे आवाहन सहायक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी भास्कर पडघान यांनी केले आहे.
0000000
एअर मार्शल व्ही. ए. पाटकर
विशेष गौरव पुरस्कार
बुलडाणा, दि. 24 : जिल्ह्यातील माजी सैनिक, विधवा पत्नी
यांच्या पाल्यांसाठी एअर मार्शल व्ही.ए. पाटकर विशेष गौरव पुरस्कार देण्यात येणार
आहे. यासाठी दि. 20 सप्टेंबर 2022 पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
शैक्षणिक वर्ष 2021-22 मध्ये दहावी आणि बारावी
बोर्डाच्या परीक्षेत सर्वाधिक गुण प्राप्त करुन उत्तीर्ण झालेल्या पाल्याकरीता एअर
मार्शल व्ही. ए. पाटकर विशेष गौरव पुरस्कार देण्यात येतो. या पुरस्काराच्या निवडीसाठी
ओळखपत्र, एसएससी, एचएससी बोर्डाच्या प्रमाणपत्राची छायांकित प्रत, गुणपत्रिकेची
छायांकित प्रत आणि वैयक्तिक अर्जासह दि. 20 सप्टेंबर 2022 पर्यंत जिल्हा सैनिक
कल्याण कार्यालय, बुलडाणा येथे सादर करावे, असे आवाहन सहायक जिल्हा सैनिक कल्याण
अधिकारी भास्कर पडघान यांनी केले आहे.
0000000
कृषि विभागाच्या रोजंदारी मजुरांची
अंतरीम ज्येष्ठता सुची प्रसिद्ध
बुलडाणा, दि. 24 : कृषि विभागाच्या जिल्ह्यातील सर्व
फळरोपवाटीका, तालुका बिज गुणन केंद्र, कृषि चिकीत्सालय येथील रोजंदारी मजुरांची अंतारीम
ज्येष्ठता सुची जिल्हास्तरावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
ज्येष्ठता यादी फळरोपवाटीका, तालुका बिज गुणन केंद्र,
कृषि चिकीत्सालयांना पाठविण्यात आली आहे. तसेच जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालयात
लावण्यात आली आहे. या अंतिम ज्येष्ठता सुचीबाबत कामाचा तपशिल, जन्म दिनांक,
शैक्षणिक पात्रता तसेच यादीत नाव नसल्याबाबत आक्षेप असल्यास संबंधितांनी 10
दिवसाच्या आत लेखी पुराव्यासह जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालयास संपर्क साधावा.
विहीत कालावधीत आक्षेप नोंदविले नसल्यास त्या आक्षेपाचा विचार केला जाणार नाही,
असे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी सं. गं. डाबरे यांनी कळविले आहे.
00000
सामाजिक ऐक्य पंधरवडानिमित्त सद्भावना शपथ
*सद्भावना शर्यतीत उत्साहाने सहभाग
बुलडाणा, दि. 24 :
जिल्हा प्रशासन, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि नेहरु युवा केंद्राच्या वतीने
दि. 20 ऑगस्ट ते दि. 5 सप्टेंबर 2022 या कालावधीत सामाजिक ऐक्य पंधरवडा साजरा
करण्यात येत आहे. या पंधरवड्यानिमित्ताने बुधवार, दि. 24 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 7 वाजता
जिजामाता क्रीडा व व्यापारी संकुल बुलडाणा येथे सद्भावना शपथ आणि सद्भावना शर्यत
पार पडली.
माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त 20
ऑगस्ट रोजी सद्भावना दिवस साजरा करण्यात येतो. तसेच दि. 20 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर
2022 दरम्यान सामाजिक ऐक्य पंधरवडा साजरा करण्यात येत आहे.
वीज वितरण कंपनीचे उपअभियंता बद्रीनाथ जायभाये, डॉ. जी.
बी. राजपूत, डॉ. दिलीप कुळकर्णी यांनी सद्भावना शर्यतीला हिरवी झेंडी दाखविली. यावेळी
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातील क्रीडा अधिकारी रविंद्र धारपवार, राज्य क्रीडा
मार्गदर्शक अनिल इंगळे, नेहरु युवा केंद्राचे अजयसिंग राजपूत, धनंजय चाफेकर,
रविंद्र गणेशे, विजय वानखेडे, शैलेश खेडकर, राजेश टारपे, महेंदसिंग ठाकूर, अनुप
सोनोने, नितीन भिसे, विनोद गायकवाड, श्रीकृष्ण कुवारे, रविंद्र बोबडे, विठ्ठल
इंगळे, मदनलाल कुमावत, सदाशिव गद्दलकर, निलेश रेखे, लक्ष्मण नागपूरे, बंडू राऊत,
शेख समीर, विनायक चोपडे, हर्षल काळवाघे, दिपक जाधव आदी उपस्थित होते. जिल्हा
क्रीडा अधिकारी गणेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली कैलास डुडवा, गोपाल गोरे यांनी
पुढाकार घेतला.
0000000
No comments:
Post a Comment