Monday, 8 August 2022

DIO BULDANA NEWS 08.08.2022

 स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम

आज जिजामाता प्रेक्षागारात सामुदायिक राष्ट्रगीत गायन

* अधिकारी, कर्मचारी यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन

बुलडाणा, दि. 8 : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवांतर्गत जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय बुलडाणा, शिक्षण विभाग जिल्हा परिषद बुलडाणा यांच्यातर्फे विविध कार्यक्रमाचे आयोजन दि. 9 ते 17 ऑगस्ट 2022 या दरम्यान करण्यात आले आहे. यात मंगळवार दि. 9 ऑगस्ट रोजी सामुदायिक राष्ट्रगीत गायनाचा कार्यक्रम होणार आहे.

या उपक्रमांतर्गत्‍ दि. 9 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 11 वाजता जिजामाता प्रेक्षागार येथे सामुहिक राष्ट्रगीत गायनाचा कार्यक्रम घेण्यात येणार आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी दि. 9 ऑगस्ट 2022 रोजी बुलडाणा शहरातील सर्व शाळा, महाविद्यालय, खाजगी शाळा, महाविद्यालय, स्काऊट ॲण्ड गाईड, एनएसएस, एनसीसी तसेच सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी, क्रीडा मंडळे, संस्था यांनी सकाळी 10.30 वाजता जिजामाता क्रीडा व व्यापारी संकुल, बुलडाणा येथे उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. नागरिकांनी ते सकाळी 11 वाजता ज्या ठिकाणी असतील, त्याच ठिकाणी उभे राहून राष्ट्रगीत गायन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

जिजामाता क्रीडा व व्यापारी संकुल, बुलडाणा येथे दि. 13 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 7 वाजता सायकल मॅरेथान होणार आहे. तसेच दि. 17 ऑगस्ट 2022 रोजी मॅरेथान स्पर्धेचे आयोजन जिजामाता क्रीडा व व्यापारी संकुल, बुलडाणा येथून करण्यात येणार आहे. या दोन्ही स्पर्धांकरीता शहरातील शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी, क्रीडाप्रेमींनी जिजामाता क्रीडा व व्यापारी संकुल, बुलडाणा येथे उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव यांनी केले आहे.

00000

अधिकारी, कर्मचाऱ्यांचे मतदार ओळखपत्र

आधार कार्डशी जोडणी करावी

*जिल्हाधिकारी एस. रामामुर्ती यांचे आदेश

बुलडाणा, दि. 8 : भारत निवडणूक आयोगाने मतदार ओळखपत्र आधार कार्डशी जोडण्याचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार कार्यालय प्रमुखांनी अधिनस्त अधिकारी, कर्मचाऱ्यांचे मतदार ओळखपत्र हे आधार कार्डशी लिंक करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी एस. रामामुर्ती यांनी केले आहे.

मतदार ओळखपत्र हे आधार कार्डशी जोडण्यासाठी व्होटर हेल्पलाईन हे ॲप प्ले-स्टोअरवर जाऊन डाऊनलोड करावे. वोटर रजिस्ट्रेशन क्लिक करावे. फॉर्म 6 ब ला क्लिक करावे. लेट्स स्टार्ट ला क्लिक करावे. त्यानंतर मोबाईल क्रमांक टाकावा. मोबाईलवर आलेला ओटीपी टाकावा. व्होटर आयडी असेल तर येस आय हॅव व्होटर आयडी हे निवडावे. व्होटर आयडी नंबर टाकून महाराष्ट्र राज्य निवडावे. नंतर प्रोसिड क्लिक करावे. त्यानंतर आधार क्रमांक टाकावा. डन करून कन्फर्म क्लिक करावे. त्यानंतर आधार निवडणूक ओळाखपत्राला लिंक झाल्याचा मॅसेज आणि रेफरंस नंबर येणार आहे.

कार्यलयप्रमुखांनी वरील पद्धतीचा अवलंब करून अधिकारी, कर्मचारी यांचे मतदार ओळखपत्र आधार कार्डशी संलग्न करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

00000


No comments:

Post a Comment