स्वातंत्र्य दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण
बुलडाणा, दि. 13 : भारतीय
स्वातंत्र्याच्या 75व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या
प्रांगणात ध्वजवंदन आणि संचलन सोहळा सोमवार, दि. 15 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 9.05 वाजता
होणार आहे. जिल्हाधिकारी एस. रामामुर्ती यांच्या हस्ते ध्वजवंदन होणार आहे.
यावेळी नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या
वतीने करण्यात आले आहे.
00000
स्वातंत्र्याच्या
अमृत महोत्सवानिमित्त सायकल, मोटार सायकल रॅली
बुलडाणा, दि. 13 : भारतीय स्वातंत्र्याच्या 75व्या वर्षानिमित्त
जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा अधिकारी, शिक्षण विभाग, पर्यावरण मित्र मंडळ,
वन विभाग यांच्या वतीने आज दि. 13 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 7 वाजता, जिजामाता क्रीडा
व व्यापारी संकुल येथून सायकल, मोटार सायकल रॅली काढण्यात आली.
निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते, जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश
जाधव, तहसिलदार रुपेश खंडारे, वन परिक्षेत्र अधिकारी अभिजीत ठाकरे, सहायक वन संरक्षक
आर. आर. गायकवाड, आंतरराष्ट्रीय सायकल पटू संजय मयुरे आदी उपस्थित होते. उपस्थित
मान्यवरांनी रॅलीस हिरवी झेंडी दाखविली. यावेळी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त
दि. 13 पासून ते दि. 15 ऑगस्ट 2022 पर्यंत प्रत्येक कार्यालयात आणि घरोघरी राष्ट्रीय
ध्वज सन्मानपुर्वक फडकविण्याबाबत आवाहन केले.
रॅलीमध्ये एडेड हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेज, सहकार विद्या मंदिर,
शारदा ज्ञानपीठ, सेंट जोसेफ इंग्लिश हायस्कूल, भारत विद्यालय, प्रबोधन विद्यालय आदी
शाळेतील विद्यार्थी सहभागी झाले. तसेच पर्यावरण मित्र मंडळातील सदस्य आणि वनविभागातील
अधिकारी, कर्मचारी, जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी, लेखाधिकारी, सायकल
पटू, मोटार सायकल घेऊन सहभागी झाले.
रॅलीची सुरवात जिजामाता क्रीडा व व्यापारी संकुल येथून प्रारंभ
होऊन, संगम चौक, शिवाजी विद्यालय, राजमाता चौक, शासकीय आयटीआय, मलकापूर रोड, जयस्तंभ
चौक, बाजार लाईन, जनता चौक, कारंजा चौक, एडेड चौक येथून निघून राणी बगीचा येथे समारोप
करण्यात आला. याठिकाणी तहसिलदार, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाचे अधिकारी, कर्मचारी,
वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी वृक्षारोपण केले. गणेश जाधव यांनी
प्रास्ताविक केले. अनिल इंगळे यांनी सूत्रसंचालन केले.
रॅलीचे आयोजन जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली
अनिल इंगळे, रविंद्र धारपवार, विजय बोदडे, विनोद गायकवाड, कैलास डुडवा, कृष्णा नरोटे,
गोपाल गोरे, गणेश डोंगरदिवे, तसेच जिल्हा क्रीडा प्रशिक्षण केंद्र मैदानीचे खेळाडू
गणेश जाधव, समाधान टेकाळे, राहुल औशलकर, प्रदीप डांगे पर्यावरण मित्र मंडळ, अनु माकोणे,
श्री. माहोरे, रविंद्र गणेशे, श्री. एंडोले, श्री. उबरहंडे, श्री. जाधव, श्री. देशमुख,
धनंजय चाफेकर, नेहरु युवा केंद्राचे श्री. मोरे आदींनी परिश्रम घेतले.
00000
जिल्हा ग्रंथालयात अधिकारी घडविण्याचे कार्य होते
- निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त तीन दिवसीय ग्रंथप्रदर्शनीचे उद्घाटन
बुलडाणा, दि. 13 : ग्रंथ, पुस्तकांच्या सानिध्यात राहल्याने माणसाच्या बुद्धी, मनाचा आणि विचारांचा विकास होतो. जिल्हा ग्रंथालयाने स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना आवश्यक ती सर्व पुस्तके, संदर्भग्रंथ उपलब्ध करुन देण्यासोबतच प्रशस्त अभ्यासिका निर्माण केली आहे. या माध्यमातून जिल्हा ग्रंथालयात अधिकारी घडविण्याचे कार्य होत आहे, असे प्रतिपादन निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते यांनी केले.
देशात आझादी का अमृत महोत्सव साजरा केला जात आहे. यात जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्या वतीने स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी तसेच वाचक, देशप्रेमी नागरिकांसाठी तीन दिवसीय ग्रंथप्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले आहे. आज दि. 13 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 11 वाजता निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते यांच्या हस्ते ग्रंथप्रदर्शनीचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी जिल्हा ग्रंथालय अधिकारी सतीश जाधव, कि. वा. वाघ, नेमीनाथ सातपुते, पंजाबराव गायकवाड, विष्णू इंगळे, राजू साबळे, श्री. बोदडे, मुकेश पाटील यांच्यासह ग्रंथालय चळवळीतील पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी उपस्थित होते.
ग्रंथप्रदर्शन दि. 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्टपर्यंत सर्वांसाठी सुरु राहणार आहे. निवासी उपजिल्हाधिकारी श्री. गिते यांनी जिल्हा ग्रंथालयातील सुसज्ज अभ्यासिका, पुस्तकांचे दालन आणि इतर विभागांची पाहणी करून स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला. जिल्हा ग्रंथालय अधिकारी सतीश जाधव यांनी ग्रंथालयातील विविध विभागांची तसेच योजनांची माहिती दिली. कार्यक्रमासाठी विक्रम सोनुले, धनंजय मरे, सय्यद जाकीर, गजानन जोशी यांनी पुढाकार घेतला.
0000
No comments:
Post a Comment