DIO BULDANA NEWS 17.10.2021



 सिंदखेड राजा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाची पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांनी केली पाहणी

बुलडाणा, (जिमाका) दि. १७: जिल्ह्यात काल १६ ऑक्टोंबर रोजी रात्रीपासून कमी अधिक प्रमाणात पाऊस पडत आहे. या पावसाने सर्वदूर हजेरी लावली आहे. त्यामुळे जिल्ह्यात खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्या अनुषंगाने पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांनी आज नुकसान ग्रस्त भागाची पाहणी केली. 
    सिंदखेड राजा तालुक्यातील राजेगाव  परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस पडला. या पावसामुळे शेतीचे नुकसान झाले. राजेगाव परिसरातील नुकसान झालेल्या भागाची पाहणीही आज पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांनी आज केली. यावेळी पालकमंत्री डॉ शिंगणे यांनी यंत्रणेला तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले. याप्रसंगी तहसीलदार, कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

news 9.6.2017 dio buldana

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या