Thursday, 21 October 2021
DIO BULDANA NEWS 21.10.2021
कोरोना अलर्ट : प्राप्त 416 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 02 पॉझिटिव्ह
1 रूग्णाला मिळाली सुट्टी
बुलडाणा, (जिमाका) दि. 21 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 418 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 416 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 02 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 2 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 119 तर रॅपिड टेस्टमधील 297 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 416 अहवाल निगेटीव्ह आहेत.
पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : बुलडाणा शहर : एकता नगर 1, शेगांव शहर : एसबीआय कॉलनी 1 संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आली आहे. अशाप्रकारे जिल्ह्यात 02 रूग्ण आढळले आहे. तसेच उपचाराअंती 1 रूग्णाला वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे रूग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.
त्याचप्रमाणे आजपर्यंत 727856 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 86918 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 86918 आहे. आज रोजी 55 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 727856 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 87606 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 86918 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सद्यस्थितीत कोविडचे 14 सक्रीय रूग्ण उपचार घेत आहेत. तसेच आजपर्यंत 674 कोरोना बाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.
*************
पाणी आरक्षण समितीच्या सभेचे आयोजन
बुलडाणा, (जिमाका) दि. 21 :सन 2021-22 या वर्षामध्ये पाटबंधारे विभागाच्या विविध प्रकल्पांमधून पिण्याचे पाण्यासाठी उपलब्ध पाणीसाठ्यानुसार आरक्षण आरक्षण करावयाची आहे. यासाठी पाणी वापर करणाऱ्या नगर परिषद व ग्रामपंचायत तथा इतर संबंधितांना पाणी आरक्षणाची मागणी नोंदविण्याबाबत कळविण्यात आले आहे. त्यानुसार त्यांनी केलेली पाणी आरक्षणाची मागणी व उपलब्ध पाणीसाठा याबाबत जिल्हा पाणी आरक्षण समितीची सभा पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या अध्यक्षतेखाली व सदस्य सचिव जिल्हाधिकारी एस रामामूर्ती यांच्या प्रमुख उपस्थितीत 25 ऑक्टोंबर रोजी दु. 12.30 वाजता नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, बुलडाणा येथे आयोजित करण्यात आली आहे, असे कार्यकारी अभियंता, बुलडाणा पाटबंधारे विभाग यांनी कळविले आहे.
***************
बाल न्याय मंडळाच्या बैठकीचे आज लोणार येथे आयोजन
बुलडाणा, (जिमाका) दि. 21 :बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम 2015 मधील अधिकारान्वये राज्य शासनाने महाराष्ट्र राज्य बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) नियम 2018 मधील नियमानुसार मंडळाची फिरती बैठक आयोजित करण्यात येते. येत्या शुक्रवार, 22 ऑक्टोंबर 2021 रोजी आशा बालकाश्रम, हिरडव रोड, लोणार येथे मंडळाच्या फिरत्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीत मंडळासमोर त्या- त्या भागातील विधी संघर्षग्रस्त बालकांची प्रकरणे सुनावणीसाठी घेण्यात येणार आहे. तरी या बैठकीला संबंधितांनी उपस्थित रहावे, असे आवाहन अमोलकुमार देशपांडे, प्रमुख दंडाधिकारी, बाल न्याय मंडळ, बुलडाणा यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
***********
--
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment