*कोरोना अलर्ट : प्राप्त 1171 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 01 पॉझिटिव्ह*
• 04 रुग्णांना मिळाली सुट्टी
बुलडाणा, (जिमाका) दि. 8 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 1172 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 1171 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 01 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाला आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 1 अहवालाचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 121 तर रॅपिड टेस्टमधील 1050 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 1171 अहवाल निगेटीव्ह आहेत. पोझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : मेहकर तालुका : चोंढी 1 संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आली आहे. अशाप्रकारे जिल्ह्यात 01 रूग्ण आढळला आहे. तसेच वैद्यकीय प्रोटोकॉल प्रमाणे उपचाराअंती 04 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे आजपर्यंत 722984 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 86900 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 86900 आहे. आज रोजी 504 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 722984 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 87591 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 86900 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सद्यस्थितीत कोविडचे 18 सक्रीय रूग्ण उपचार घेत आहेत. तसेच आजपर्यंत 673 कोरोना बाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.
********
आर्मी स्पोर्टस् इन्स्टीट्युट बॉईज स्पोर्टस् कंपनीकरीता क्रीडा नैपुण्य चाचणीस प्रारंभ
*खेळाडूंचा मोठा प्रतिसाद
बुलडाणा, (जिमाका) दि. ८: जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांचे वतीने आर्मी स्पोर्टस् इन्स्टीट्युट बॉईज स्पोर्टस् कंपनी यांचे करीता क्रीडा नैपुण्य चाचण्यांना जिल्हा क्रीडा संकुल बुलडाणा येथे 07 ऑक्टोंबर 2021 पासून प्रारंभ झाला. जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव यांचे हस्ते चाचण्यांचे उद्घाटन संपन्न झाले. याप्रसंगी प्रा.डॉ.मनोज व्यवहारे, प्रा.डॉ.बाबाराव सांगळे, क्रीडा अधिकारी बी.आर.जाधव, राज्य क्रीडा मार्गदर्शक महेश खर्डेकर, अनिल इंगळे, अक्षय गोलांडे, वैभव लोढे, शुभम सुरडकर, रवि भगत, गणेश जाधव, मो.सुफीयान, प्रविण चिम, समाधान टेकाळे आदींनी बॉक्सींग व तलवारबाजी संयोजक म्हणून काम पाहिले.
सर्वप्रथम मान्यवरांचेहस्ते मैदानाचे पुजन करुन 30 मी. फ्लाईंग स्टार्ट पार पडली. आजच्या चाचणीमध्ये तलवारबाजी, बॉक्सींग या खेळाच्या संपन्न झाल्या. या चाचण्यामध्ये बुलडाणा जिल्ह्यातील 60 ते 70 खेळाडू सहभागी झाले होते. प्रास्ताविकामध्ये गणेश जाधव यांनी आंतरराष्ट्रीय व ऑलिंम्पिक दर्जाचे खेळाडू घडविण्यासाठी राज्यातील खेळाडूंची निवड करुन शास्त्रोक्त प्रशिक्षण, संतुलित आहार व अद्यावत क्रीडा सुविधा पुरवून दर्जेदार कामगिरी करण्यासाठी लहान वयातच मुलांना क्रीडा विषयक प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. यासाठी शासनाच्या या उपक्रमात सर्वांनी सहभागी होवून यशस्वी व्हावे असे सांगितले.
आज संपन्न झालेल्या बॉक्सींग व तलवारबाजी चाचण्यांमध्ये 30 मी. फ्लाईंग स्टार्ट, 2 मी. बाय 10 मी. शटल रन, 50 मी. रन, पुश अप, सिट अप, 1000 मी.धावणे, 4 बाय 6 मी. रन, स्टँडींग ब्रॉड जम्प, बिप टेस्ट या चाचण्या घेण्यात आल्या. या चाचण्यांमध्ये 80 टक्के गुण मिळविणाऱ्या खेळाडूंना विभागीय क्रीडा नैपुण्य चाचणीसाठी पात्र ठरविल्या जाईल. संचालन अनिल इंगळे यांनी तर आभार प्रदर्शन महेश खर्डेक्रर यांनी केले. आज कुस्ती, आर्चरी व वेटलिफ्टींग खेळांच्या चाचण्यांचे आयोजन जिल्हा क्रीडा संकुल बुलडाणा येथे होणार आहे.
सदरच्या चाचण्या यशस्वीतेसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव यांचे मार्गदर्शनाखाली कार्यालयाचे क्रीडा अधिकारी आर.आर.धारपवार, विजय बोदडे, सुरेशचंद्र मोरे, विनोद गायकवाड, कैलास डुडवा, कृष्णा नरोटे, गणेश डोंगरदिवे तसेच दिपक जाधव, सुहास राऊत, कु.दिक्षा हिवाळे, कु.कल्याणी टेकाळे, प्रसाद भाते, निशिकांत जाधव, रोहित खंडारे, शहानवाज खान, पियुष तायडे, यश बट्टू, सुरज इंगळे, प्रशिक मिसाळ, ओम शिवशंकर, आकाश मोरे, मनिष सिरसाट यांनी परिश्रम घेतले. तसेच जिल्हा सामान्य रुग्णालयाचे वैद्यकीय पथक व पोलीस बंदोबस्त पथक सुध्दा उपस्थित होते, असे जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी कळविले आहे.
*********
मूग व उडिद शासकीय खेदीसाठी नाव नोंदणी सुरू
• 15 ऑक्टोंबर 2021 पर्यंत करावी नोंदणी
* सोयाबीन खरेदीसाठी नाव नोंदणी 15 ऑक्टोंबर पासून सुरू होईल
बुलडाणा, (जिमाका) दि. ८ : शासनाच्या आदेशान्वये पणन हंगाम 2021-22 मध्ये केंद्र शासनाची आधारभूत किंमत खरेदी योजनेतंर्गत हमी दराने मूग, उडिद, सोयाबीन या शेतमालाची शेतकऱ्यांकडून खरेदी करण्यास मान्यता मिळाली आहे. त्यासाठी जिल्ह्यात 10 खरेदी केंद्रांना मान्यताही देण्यात दिली आहे. त्यानुसार जिल्ह्यात मूग व उडिद साठी 15 ऑक्टोंबर 2021 पर्यंत तर सोयाबीन करिता 15 ऑक्टोंबर पासून मार्केटींग फेडरेशनचे सब एजंट संस्थामार्फत पोर्टलवर ऑनलाईन शेतकऱ्यांची नोंदणी होणार आहे. मूग प्रती क्विंटल 7275, उडिद प्रती क्विंटल 6300 व सोयाबीन शेतमालासाठी 3950 रुपये हमी दर आहे.
जिल्ह्यात तालुका खरेदी विक्री संघ बुलडाणा, दे. राजा, लोणार, मेहकर, संग्रामपूर व शेगांव, स्वराज्य शेतीपुरक सहकारी संस्था चिखली, संत गजानन कृषि विकास शेतकरी उत्पादक कंपनी मोताळा, सोनपाऊल ॲग्रो प्रोड्युसर कंपनी अंजनी खु केंद्र साखरखेर्डा ता. सिं.राजा, मा. जिजाऊ कृषि विकास शेतकरी कंपनी नारायणखेड केंद्र सिं.राजा या खरेदी केंद्रांना मान्यता मिळाली आहे. या ठिकाणी ऑनलाईन शेतकरी नाव नोंदणी सुरू आहे. शेतकऱ्यांनी नाव नोंदणीसाठी आधार कार्ड, सन 2021-22 चा पीक पेरा, बँक पासबुक झेरॉक्स, चालु असलेला सात बारा अशा संपूर्ण कागदपत्रांसह संबंधित तालुक्यातील संस्थेशी संपर्क साधावा. शेतकऱ्यांनी नाव नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा पणन अधिकारी यांनी केले आहे.
*****
गाय, म्हैस, शेळी पालन व्यवसायाचे प्रशिक्षणाचे आयोजन
• प्रवेश नोंदणी १६ ऑक्टोंबर पर्यंत करावी
बुलडाणा,(जिमाका) दि.८ : महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (MCED) द्वारा जिल्हा उद्योग केंद्र मार्फत उद्योग अथवा व्यवसाय सुरु करु इच्छिणाऱ्या सुशिक्षीत बेरोजगार युवक, युवतींसाठी बुलडाणा येथे गाय, म्हैस, शेळी व कुक्कुट पालन या प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर प्रशिक्षण १६ ते २० ऑक्टोंबर दरम्यान पाच दिवसांमध्ये आयोजित करण्यात आले आहे. या प्रशिक्षणाकरीता प्रवेश नोंदणी दि. १६ ऑक्टोंबर पर्यंत कार्यालयीन वेळेत प्रकल्प अधिकारी गणेश गुप्ता यांच्याकडे किंवा त्यांच्या मोबाईल क्रमांक 8275093201, 9011578854 वर करावी. तसेच उद्योजकता विकास केंद्र द्वारा जिल्हा उद्योग केंद्र, मलकापुर रोड, बुलडाणा येथे संपर्क करावा.
तसेच प्रशिक्षणास भाग घेणारा उमेदवार किमान 5 वा वर्ग पास असणे आवश्यक असून त्याचे वय 18 ते 50 वर्षे असावे. प्रशिक्षण यशस्वीपणे पुर्ण केल्यानंतर प्रमाणपत्र दिल्या जाणार आहे. प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश सुशिक्षीत बेरोजगार युवकांनी तंत्रशुध्द प्रशिक्षण घेऊन स्वत:चा उद्योग व्यवसाय सुरु करण्याचा आहे. सदर प्रशिक्षणात गाय, म्हैस, शेळी व कुक्कुट पालनाचे तंत्र, गाय, म्हसीचे प्रकार व त्यांच्या जाती, लसीकरण, संशोधन रोग व लक्षणे, खाद्य निर्मिती व चाऱ्याचे प्रकार, शेळी केंद्रास प्रत्यक्ष भेट, शासकीय योजनांची माहिती देण्यात येणार आहे. प्रशिक्षणात मार्गदर्शन तज्ज्ञ व्यक्ती करणार आहे. तरी प्रशिक्षणासाठी प्रवेश नोंदणी करावी, असे आवाहन एसीईडी चे विभागीय अधिकारी प्रदीप इंगळे यांनी केले प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
******
Comments
Post a Comment