Wednesday, 13 October 2021

DIO BULDANA NEWS 13.10.2021

 बाल शक्ती, बाल कल्याण पुरस्कारासाठी 15 पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

बुलडाणा,दि. 13 (जिमाका) – केंद्र शासनाच्या महिला व बालकल्याण विभागामार्फत बाल शक्ती पुरस्कार व बाल कल्याण पुरस्कार दिला जातो. या पुरस्कारासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 15 ऑक्टोंबर असून सविस्तर माहिती पुढील प्रमाणे. बाल शक्ती पुरस्कार सन 2021 व बालकल्याण पुरस्कार 2021 करिता केंद्र शासनाने अर्ज मागविलेले आहेत. सदरचे अर्ज हे www.nca-wcd.nic.in या संकेतस्थळामार्फत ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जाणार आहेत. यापुरस्काराची माहिती वरील सकेतस्थावर देण्यात आलेली आहे. पुरस्कारासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 15 ऑक्टोंबर 2021 पर्यंत आहे, असे आवाहन जिल्हा बाल संरक्षण यांनी  केले आहे.
बाल शक्ती पुरस्कार :
हा पुरस्कार ज्या मुलांनी (5 पेक्षा अधिक व 18 वर्षापर्यंतच्या) शिक्षण, कला, संस्कृतिक कार्य, खेळ, नाविन्यपूर्ण शोध, सामाजिक कार्य व शौर्य इत्यादी क्षेत्रात नैपुण्यपूर्ण कामगिरी केलेली आहे. अशा मुलांना हा पुरस्कार देण्यात येतो.
बाल कल्याण पुरस्कार: हा पुरस्कार वैयक्तीक गटामध्ये मुलांच्या विकास, संरक्षण व कल्याण या क्षेत्रात कोणत्याही प्रकारचे वेतन अथवा मानधन न घेता मानसेवी उदात्त भावनेतून किमान 7 वर्षे काम करणाऱ्या व्यक्तीस हा पुरस्कार दिला जातो.तसेच संस्था स्तरावर बालकल्याण क्षेत्रात अपवादात्मक कार्य करणाऱ्या संस्थेला हा पुरस्कार दिला जातो. संस्था पूर्णत: शासनाच्या निधीवर अवलंबून नसावी. बालकल्याण क्षेत्रात किमान 10 वर्षे सातत्यपूर्ण उत्कृष्ट कार्य करणारी असावी.
*******
जळगाव जामोद येथे  14 ऑक्टोंबर रोजी कर्ज मेळाव्याचे आयोजन
बुलडाणा, (जिमाका) दि. 13 : भारत सरकारच्या वित्त मंत्रालयाने दिलेल्या निर्देशानुसार संपूर्ण देशात 7 ऑक्टोंबर ते 15 ऑक्टोंबर 2021 पर्यंत क्रेडिट आऊटरिच अभियान राबविण्यात येणार आहे. या अनुषंगाने जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी एस रामामूर्ती यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 14 ऑक्टोंबर 2021 रोजी  संत रुपलाल महाराज मंगल कार्यालय, जळगाव जामोद येथे  कर्ज मेळावा  दुपारी 12 वाजता पार पडणार आहे. या ठिकाणी सर्व शासकीय व खाजगी बँक प्रतिनिधी उपस्थित राहून कर्ज प्रकरणे निकाली काढणार आहे. तरी जास्तीत जास्त नागरिकांनी या कर्ज मेळाव्यांचा लाभ घ्यावा,  असे आवाहन अग्रणी जिल्हा बँक व्यवस्थापक श्री. हेडाऊ यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment