DIO BULDANA NEWS 14.9.2020,1

 


चांगेफळ येथील तीन व्यक्ती पुरात वाहून गेले; एकाचा मृतदेह सापडला

·         आपत्ती व्यवस्थापन विभागाचे शोधकार्य सुरू

बुलडाणा,(जिमाका) दि.14 : सिं. राजा तालुक्यातील चांगेफळ येथील विद्रुपा नदी पुराच्या पाण्यात 13 सप्टेंबर रोजी गावातील तीन व्यक्ती पोहण्यासाठी  गेल्या.  परिणामी पुराच्या पाण्याचा अंदाज न आल्यामुळे सदर तीनही व्यक्ती नदीच्या पाण्यात वाहून गेल्या. याबाबत आपत्ती व्यवस्थापन विभागाने शोध कार्य नदीपात्रात सुरू केले असता त्यांना आज 14 सप्टेंबर रोजी  कैलास ऊर्फ गंगाराम शांताराम भालेराव वय 30 वर्ष यांचा मृतदेह सापडला. तसेच ज्ञानेश्वर धोंडीबा भालेराव वय 21 व त्यांच्या येथे पाहुणा आलेला अविनाश सुरेश बांगर वय 25 रा. कानडी पो. माळणी ता. मंठा जि. जालना यांचे शोधकार्य सुरू आहे. मात्र आज 14 सप्टेंबर च्या सायंकाळपर्यंत शर्थीचे प्रयत्न करून दोघांचा शोध लागला नाही. अशी माहिती तहसीलदार, सिं. राजा यांनी आपत्ती व्यवस्थापनअधिकारी यांना दिली असल्याचे आपत्ती व्यवस्थापन अधीकारी श्री. पवार यांनी कळविले आहे. 

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

news 9.6.2017 dio buldana

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या