Wednesday, 16 September 2020
DIO BULDANA NEWS 16.9.2020
प्रकल्पांमधील पेयजल आरक्षणासाठी मागणी सादर करण्यास 25 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ
मागणी सादर करण्याचे बुलडाणा पाटबंधारे विभागाचे आवाहन
बुलडाणा,(जिमाका) दि.16 : बुलडाणा जिल्हा पाणी आरक्षण समितीची सभा मा. पालकमंत्री तथा अध्यक्ष जिल्हा पाणी आरक्षण समिती, तसेच समितीचे सदस्य सचिव तथा जिल्हाधीकारी यांचे प्रमुख उपस्थितीत 5 ऑक्टोंबर ते 15 ऑक्टोंबर 2020 दरम्यान आयोजित करण्यात येणार आहे. त्यानुसार बुलडाणा पाटबंधारे विभागाकडील प्रकल्पांवरून पिण्याचे पाणी आरक्षणाची मागणी नोंदविण्यात येत आहे. सर्व नगर परिषदा / महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, पंचायत समिती / संबंधित ग्रामपंचायत यांनी कार्यकारी अभियंता, बुलडाणा पाटबंधारे विभाग, बुलडाणा यांचेकडे पेयजल आरक्षणाची मागणी नोंदविण्यासाठी 25 सप्टेंबर 2020 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तरी 25 सप्टेंबर पुर्वी न चुकता पाणी मागणी सादर करावी. जेणेकरून जिल्हा पाणी आरक्षण समितीच्या सभेमध्ये सदर मागणी उपस्थीत करणे शक्य होईल. सदर सभेमध्ये प्रकल्पांमधील उपलब्ध पाणी साठ्यानुसार पिण्याच्या पाण्याचे आरक्षणास मंजूरी देण्यात येणार आहे. याची सर्व संबंधीत बिगर सिंचन आरक्षण करणाऱ्या संस्थांनी नोंद घ्यावी. प्रतीक्षा न करता पाणी मागणी तात्काळ सादर करावी, असे आवाहन कार्यकारी अभियंता, बुलडाणा पाटबंधारे विभाग यांनी केले आहे.
******
शासनाने हमीदराने खरेदी केलेल्या शेतमालाची शेतकऱ्यांना रक्कम अदा
सन 2017-18 मध्ये तूर व हरभरा खरेदी न झालेल्या शेतकऱ्यांना माहिती द्यावी
बुलडाणा,(जिमाका) दि.16 : केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत हंगाम 2019-20 मध्ये नाफेडतर्फे जिल्ह्यामध्ये 9 खरेदी केंद्रावर हमीदराने तुर, मका, हरभरा व ज्वारी खरेदी केली आहे. नाफेडच्यावतीने तूर प्रति क्विंटल 5800 रूपये, हरभरा 4875 रूपये प्रती क्विंटल, मका 1760 रूपये प्रति क्विंटल व ज्वारी 2550 रूपये प्रती क्विंटल हमीदराने खरेदी करण्यात आली होती.
तूरीची खरेदी 204027 क्विंटल व खरेदी रक्कम 118.33 कोटी रूपये आहे. ही सर्व रक्कम शेतकऱ्यांना अदा करण्यात आली आहे. तसेच हरभरा शेतमालाची 332753 क्विंटल खरेदी करण्यात आली. या खरेदीपोटी 162.21 कोटी रूपये रक्कम शेतकऱ्यांना अदा करावयाची होती ती सर्व रक्कम अदा करण्यात आली आहे. अशाचप्रकारे मक्याची 182288 क्विंटल खरेदी करण्यात आली. खरेदी रक्कम 32.08 कोटी आहे. ही सर्व रक्कम शेतकऱ्यांना अदा करण्यात आली आहे. तसेच ज्वारीची 3317 क्विंटल खरेदी करण्यात आली असून या खरेदीपोटी अदा करावयाची 0.84 कोटी रूपये शेतकऱ्यांना अदा करण्यात आले आहे. वरीलप्रमाणे शेतकऱ्यांकडून खरेदी करण्यात आलेली तुर, हरभरा, मका व ज्वारी खरेदीची रक्कम संपुर्ण शेतकऱ्यांना अदा करण्यात आली आहे. यामध्ये काही शेतकऱ्यांची रक्कम त्यांचे खाते क्रमांक, आयएफएससी कोड, जनधन खाते व खाते बंद असल्यामुळे परत आलेली आहे. ज्या शेतकऱ्यांना तुर, मका खरेदीची रक्कम प्राप्त झाली नसेल. त्यांनी संबंधित खरेदी केंद्रावर जावून आपली दुरुस्ती करुन घ्यावी. संबंधित शेतकऱ्यांना रक्कम मिळणे सोईचे होईल.
तसेच मका खरेदी केलेल्या शेतकऱ्यांचे परत आलेल्या रक्कमेबाबत शासनाकडे माहिती पाठविण्यात आली असून त्यांना सुध्दा लवकरच रक्कम प्राप्त होणार आहे. तूर व हरभरा अनुदानाबाबत ज्या शेतकऱ्यांनी सन 2017-18 मध्ये सदर शेतमाल खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी केलेली होती. मात्र त्यांची खरेदी होवू शकली नाही, अशा शेतकऱ्यांना शासनाने अनुदान जाहीर केलेले होते. त्यानुसार संबंधित संस्थेकडे शेतकऱ्यांची यादीसुध्दा पाठविण्यात आलेली होती. मात्र अद्याप शेतकऱ्यांनी संस्थेकडे त्याची माहिती सादर न केल्यामुळे त्यांना अनुदानाची रक्कम अदा करता आलेली नाही. त्यामुळे 8 दिवसाचे आत शेतकऱ्यांनी माहिती सादर करावी अन्यथा अनुदानाची रक्कम शासनाकडे परत करावी लागेल. संबंधित शेतकऱ्यांनी तात्काळ माहिती संस्थांकडे सादर करावी, असे आवाहन जिल्हा पणन अधिकारी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.
********
कोरोना अलर्ट : प्राप्त 397 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 138 पॉझिटिव्ह
198 रूग्णांना मिळाली सुट्टी
बुलडाणा,(जिमाका)दि.16: प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालां पैकी एकूण 535 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 397 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 138 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 108 व रॅपिड टेस्टमधील 30 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 229 तर रॅपिड टेस्टमधील 168 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 397 अहवाल निगेटीव्ह आहेत.
पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : मलकापूर शहर : 2, खामगांव शहर : 19, खामगांव तालुका : घाटपुरी 1, लाखनवाडा 1, पिं. राजा 3, शेगांव शहर : 7, शेगांव तालुका : टाकळी विरो 1, संग्रामपूर तालुका : धामण गोट 1, संग्रामपूर शहर : 4, दे.राजा शहर : 9, दे. राजा तालुका : गोंधनखेड 1, अंढेरा 1, दे. मही 5, बुलडाणा शहर : 13, बुलडाणा तालुका : नांद्राकोळी 2, हिवरा 2, मोताळा शहर : 6, मोताळा तालुका : धा. बढे 1, शेलापूर 1, जळगांव जामोद तालुका : झाडेगांव 1, जळगांव जामोद शहर : 7, मेहकर तालुका : मादनी 3, पिंप्री माळी 5, उकळी 1, शेलगांव दे. 6, डोणगांव 7, हिवरा आश्रम 2, मेहकर शहर : 3, नांदुरा शहर : 3, लोणार शहर : 1, लोणार तालुका : सावरगांव तेली 1, चिंचोली 2, सिं. राजा तालुका : साखरखेर्डा 1, दे. धनगर 1, चिखली शहर : 9, चिखली तालुका : आंधई चांधई 1, खंडाळा 3, सवणा 1 संशयीत व्यक्ती पॉझिटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 138 रूग्ण आढळले आहे. त्याचप्रमाणे उपचारादरम्यान समता कॉलनी, खामगांव येथील 68 वर्षीय महिला, बुलडाणा येथील 70 वर्षीय पुरूष व शिवाजी वेस, खामगांव येथील 83 वर्षीय पुरूष रूग्णाचा मृत्यू झाला आहे.
तसेच आज 198 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.
सुट्टी देण्यात आलेले रूग्ण पुढीलप्रमाणे : कोवीड केअर सेंटर नुसार बरे होवून सोडलेले रूग्ण खामगांव : 20, जळगांव जामोद : 18, सिं. राजा : 14, मेहकर : 11, शेगांव : 14, मलकापूर : 29, बुलडाणा : आयुर्वेद महाविद्यालय 22, चिखली : 10, नांदुरा : 15, दे. राजा : 19, लोणार : 12, मोताळा : 1, सग्रामपूर 13.
तसेच आजपर्यंत 24494 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 4231 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 4231 आहे.
आज रोजी 1497 नमुने अहवालाच्या प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 24494 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 5392 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 4231 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रूग्णालयात 1092 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 69 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.
*******
माझे कुटूंब माझी जबाबदारी मोहीमेची प्रभावी सुरूवात
पहिल्याच दिवशी 30618 घरांना भेटी
कोविड लक्षणे असलेल्या 207 व्यक्तींची ओळख
48 व्यक्तींना उपचारासाठी कोविड केअर सेंटरला पाठविले
बुलडाणा,(जिमाका)दि.16: राज्याचे मुख्यमंत्री मा. उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून राज्यात काल 15 सप्टेंबर 2020 पासून माझे कुटूंब माझी जबाबदारी ही मोहीम यशस्वीरित्या सुरू झाली. जिल्ह्यातही काल पालकमंत्री ना.डॉ राजेंद्र शिंगणे यांच्याहस्ते मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला आहे. जिल्ह्यात या मोहीमेची प्रभावी अंमलबजावणी सुरू झाली असून पहिल्याच दिवशी पथकातील सदस्यांनी 30 हजार 618 घरांना भेटी देत नागरीकांची तपासणी केली. यामध्ये शहरी भागात 1779 व ग्रामीण भागात 28 हजार 839 गृह भेटींचा समावेश आहे.
या भेटीमध्ये केलेल्या तपासणीत शहरी भागात 17 व ग्रामिण भागात 190 असे 207 व्यक्तींना कोविडची लक्षणे आढळून आली आहेत. त्यापैकी 48 व्यक्तींना पुढील उपचारासाठी कोविड केअर सेंटरला दाखल करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे यामध्ये ऑक्सिजनची शरिरातील स्तर 95 टक्क्याच्या खाली असलेले 13 व्यक्ती तपासणीत आढळून आले आहेत. हे सर्व नांदुरा तालुक्यातील आहे. सर्वात जास्त लक्षणे असलेले 76 व्यक्तीसुद्धा नांदुरा तालुक्यात आढळून आल्या आहेत. तसेच या तपासणीदरम्यान पथकाला ग्रामीण भागात 2378 व्यक्ती दुर्धर आजाराने ग्रासलेल्या दिसून आल्या, तर शहरी भागात ही संख्या 91 आहे, अशी माहिती आरोग्य विभागाकडून प्राप्त आहे. जिल्ह्यात आरोग्य विभागामार्फत ही मोहिम राबविण्यात येत आहे. मोहिमेदरम्यान घरी आलेल्या पथकाला सहकार्य करून तपासणी करू द्यावी, असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात येत आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment