Tuesday, 15 September 2020

DIO BULDANA NEWS 15.9.2020

 


माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहीम जिल्ह्यात प्रभावीपणे राबवा

-         पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे

·         26 लक्ष 60 हजार 897 लोकसंख्येची होणार तपासणी

·         जिल्ह्यात 1718 पथकांची स्थापना, गंभीर आजार असलेल्या रूग्णांची वेगळी नोंद

·        तीव्र श्वसनाचे आजार व फ्लू सदृश्य आजारांचे होणार सर्वेक्षण

·        15 सप्टेंबर ते 10 ऑक्टोंबर, 12 ते 24 ऑक्टोंबर दरम्यान चालणार मोहीम

·        18 सप्टेंबर ते 2 ऑक्टोंबर दरम्यान जिल्ह्यात लॉकडाऊन  

बुलडाणा, दि. 15 (जिमाका) : कोरोनावर प्रभावीपणे नियंत्रण मिळविण्यासाठी राज्यात आजपासून राबविण्यात येणारी माझे कुटुंब माझी -जबाबदारी ही मोहीम जिल्ह्यात प्रभावीपणे राबवावी. या मोहिमेत कुणीही कुचराईने काम करू नये, कुचराई करणाऱ्या अधिकारीकर्मचाऱ्यांवर  कारवाई रावी, असे निर्देश राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांनी आज दिले.

    माझे कुटूंब माझी जबाबदारी या मोहिमेचा शुभारंभीय कार्यक्रमाचे आयोजन  जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समिती सभागृहात करण्यात आले होते. त्यावेळी पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे बोलत होते.  यावेळी व्यासपिठावर जि.प अध्यक्षा मनिषाताई पवार,  आमदार सर्वश्री डॉ. संजय रायमूलकर, संजय गायकवाड  जिल्हाधिकारी एस राममूर्ती, मुख्य कार्यकारी अधिकारी एस षण्मुखराजन,  पोलीस धिक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ उपस्थित होते. तसेच सभागृहात जि.प सभापती रियाजखा पठाण, पुनम राठोड, ज्योतीताई पडघान, मलकापूरचे नगराध्यक्ष हरीष रावळ, मेहकरचे नगराध्यक्ष कासीम गवळी आदींसह पं.स सभापती, जि.प सदस्य व लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने संपूर्ण् राज्यभर 15 सप्टेंबर पासून माझे कुटुंब माझी 

जबाबदारी मोहीम हाती घेण्यात आली असून कोरोना नियंत्रणासाठी ही मोहीम उपयुक्त ठरेल असा विश्वास व्यक्त करून पालकमंत्री डॉ. शिंगणे म्हणाले, या मोहिमेअंतर्गत आरोग्य विभागाने नियुक्त केलेले पथके जिल्ह्यातील प्रत्येक कुटुंबांपर्यंत घरोघरी जाऊन लोकांची ताप आणि ऑक्सिजन लेव्हल तपासणी, लोकांना आरोग्य शिक्षण आणि महत्त्वाचे आरोग्य संदेश देणेसंशयित कोरोना रुग्ण शोधणे व उपचारासाठी संदर्भ सेवा तसेच मधुमेहहृदयविकारकिडनी विकार यासारखे आजार असणाऱ्या व्यक्तींना शोधून काढणे व उपचारासाठी  संदर्भ सेवा  उपलब्ध करून  देणार आहेत. यामुळे  कोरोना  रूग्णांच्या संपर्कात आालेल्या संशयितांचा शो घेवून त्यांना वेळीच आरोग्य सुविधा उपलब्ध करून  देणे शक्य होणार आहे.

माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम  पहिल्या टप्प्यात  15 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर  दरम्यान  तर दुसऱ्या  टप्प्यात  12 ऑक्टोबर ते 24 ऑक्टोबर  या कालावधीत  राबविण्यात येणार  असल्याचे  सांगून  पालकमंत्री  म्हणालेएका  महिन्याच्या कालावधीत दोनवेळा थक प्रत्येक कुटुंबाला भेटणार हेत. या मोहिमेच्या यशस्वीतेसाठी जिल्हा प्रशासनाने योग्य  नियोजन करावे. जिल्हा आरोग्य प्रशासनाने रूजू न होणाऱ्या डॉक्टरांचे समुपदेशन करावे. तसेच त्यांना रूजू होण्याचे ठिकाण त्यांच्या सोयीनुसार द्यावे.  या सर्वेतून एकही कुटूंब अथवा घर चुकू नये.  याकामी सर्वांचे सहकार्य घ्या.  नागरीकांनी घरी आलेल्या  पथकाला आरोग्य तपासणी करू द्यावी. पथकाला सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. 

    जिल्ह्यात ऑक्सीजनचा पुरेसा साठा ठेवण्याच्या सांगत पालकमंत्री म्हणाले, जिल्ह्यात कोवीड हॉस्पीटलमध्ये आयसीयु बेड्स 149 आहेत आणी ऑक्सीजन सपोर्ट बेड 206 आहेत. जिल्ह्याची कोवीड रूग्णालयाची ऑक्सीजनची गरज 5296 क्युबीक मीटर असून आपल्याकडे सध्या 2876 क्युबीक मीटरचे ऑक्सीजन सिलेंडर उपलब्ध आहेत. तसेच आणखी 20 ड्युरा सिलेंडर (जंबो सिलेंडरच्या 25 पट कॅपॅसीटीचे सिलेंडर) च्या खरेदीला आजच मान्यता देण्यात आली आहे. येत्या 15 दिवसात हे सिलेंडर प्राप्त होतील. त्यामुळे कोवीड रूग्णालयाची ऑक्सिजन क्षमता ही 4200 क्युबीक मीटर ने वाढणार असून जिल्ह्याला आवश्यक तेवढा ऑक्सिजन उपलब्ध होणार आहे.  

  पालकमंत्री पुढे म्हणाले, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता येत्या 18 सप्टेंबर ते 2 ऑक्टोंबर दरम्यान जिल्ह्यात लॉकडाऊनची परिस्थीती निर्माण करण्यात येणार आहे. यामध्ये पुर्वीप्रमाणे आवश्यक सेवांना वेळ देण्यात येणार आहे. तसेच 2 ऑक्टोंबर पूर्वी परिस्थीतीचा आढावा घेवून पुन्हा लॉकडाऊन वाढविण्यासंदर्भात निर्णय घेण्यात येईल. विनामास्क फिरणाऱ्या नागरीकांना 500 रूपये दंड स्वरूपात कारवाई करण्यात यावी. अभियानादरम्यान विद्यार्थी पालक, सामान्य व्यक्ती यांचेसाठी निबंध, पोस्टर्स, मॅसेजेस, शॉर्ट फिल्म स्पर्धा घेतल्या जाणार आहे. तसेच  विविध स्तरावर बक्षीस देण्यात येणार आहे.  

  याप्रसंगी उपस्थित आमदार डॉ रायमूलकर, आमदार संजय गायकवाड यांनी आपली मत मांडले. उपस्थित लोकप्रतिनीधींनी आपल्या सुचना, तक्रारी यावेळी मांडल्या. जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ पाटील यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.  कोविड केअर सेंटरवरील सुविधांविषयी आवश्यक सूचनाही यावेळी पालकमंत्री डॉ. शिंगणे यांनी दिल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक  अती. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सांगळे यांनी केले. कार्यक्रमाला लोकप्रतिनिधी, संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.   

                                                                        थोडक्यात अशी राहणार मोहीम

जिल्ह्यातील ग्रामीण भागातील 21 लक्ष 7 हजार 765, शहरी भागातील 5 लक्ष 53 हजार 132 अशाप्रकारे एकूण 26 लक्ष 60 897 लोकसंख्येची तपासणी करण्यात मोहीमेतंर्गत करण्यात येणार आहे.  या मोहीमेदरम्यान ग्रामिण भागात 1595, शहरी भागात 123 असे एकूण 1718 पथके जिल्ह्यात 5 लक्ष 69 हजार 972 कुटूंबांची घरोघरी जावून तपासणी करणार आहे. या पथकांमध्ये 5154 सदस्य असणार आहे.

                                                            ************

मार्केटिंग फेडरेशनमार्फत शेतकऱ्यांचे मुग, उडीद खरेदी सुरु

·        शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी करावी

बुलडाणा,(जिमाका) दि. 15: केंद्रशासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत हंगाम 2020-21 करीता मुग 7196 रुपयेउडीद 6000 हजार रुपये प्रति क्विंटल हमीदराने नाफेडच्यामार्फत शेतकऱ्यांचा मुगउडीद खरेदी करण्यात येणार आहे. त्यासाठी मार्केटिंग फेडरेशनच्यावतीने जिल्ह्यासाठी तालुका सहकारी शेतकी खरेदी-विक्री संघ देऊळगांव राजालोणारमेहकरशेगांवसंग्रामपुरबुलडाणा, मोताळा येथे संत गजानन कृषी उत्पादक कंपनी व साखरखेर्डा ता.सिं.राजा येथे सोनपाऊल ॲग्रो प्रोडयुसर कंपनी यांना उपअभिकर्ता म्हणून नेमणूक करण्यात आलेली आहे.

    तसेच शेतकऱ्यांची दि.15 सप्टेंबर 2020 पासून वरील खरेदी केंद्रावर नोंदणी सुरु करणार आहे. शेतकऱ्यांनी चालु हंगामातील 7/12 उतारापिकपेराबॅकेचे पासबुक झेरॉक्सआधार कार्ड घेऊन खरेदी केंद्रावर मुगउडीद खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी करुन शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावाअसे आवाहन जिल्हा पणन अधिकारी पी. एस. शिंगणे व जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे केले आहे.   

                                                            ******

कोरोना अलर्ट : प्राप्त 401 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 218 पॉझिटिव्ह

  • 273 रूग्णांना मिळाली सुट्टी

बुलडाणा,(जिमाका) दि.15: प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 619 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 401 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 218 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 185 व रॅपिड टेस्टमधील 33 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 212 तर रॅपिड टेस्टमधील 189 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 401 अहवाल निगेटीव्ह आहेत.

     पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे :  नांदुरा शहर : 10, नांदुरा तालुका : तरवाडी 1, वडनेर 1,  खामगांव तालुका : जळका भडंग 1, बोरजवळा 1, वर्णा 3, घाटपुरी 1,   खामगांव शहर : 23, जळगांव जामोद शहर : 3, जळगांव जामोद तालुका : आसलगांव 1, बुलडाणा शहर : 23, बुलडाणा तालुका : वरवंड 1, साखळी 1, अजीसपूर 2, केसापूर 1, भादोला 1, पळसखेड 1, दाभा 1,   शेगांव शहर : 6, दे. राजा शहर : 13, दे. राजा तालुका : चिंचखेड 1, धोत्रा 4, दे. मही 1,  रोहीखेड 1,  किन्ही पवार 1, गोंधनखेड 1, गारगुंडी 2,  चिखली तालुका : सातगांव भुसारी 2, भानखेड 3, वळती 2, सावरगांव डुकरे 1, दे. घुबे 2, एकलारा 1, जळी 1, हेलगा 1,  चिखली शहर : 13, मेहकर शहर : 2, मेहकर तालुका : हिवरा आश्रम 4, मादनी 1, उकळी 1, डोणगांव 1, जानेफळ 1,  मलकापूर तालुका : वाघोळा 1, झोडगा 2,हिंगणा काझी 1, कुंड 2, धरणगांव 3,  मलकापूर शहर : 13, मोताळा शहर : 2, मोताळा तालुका :सिं. लपाली 2, बोराखेडी 1, आव्हा 1, धा. बढे 2,  लोणार शहर : 4, लोणार तालुका : जांभुळ 2, पिंप्री खंडारे 1, चिखला 1,  सुलतानूपर 1,बिबी 1,  सि.राजा तालुका : राहेरी 14,  वारोडी 4, बारलींगा 1, तांबेवाडी 1,  आंबेवाडी 1, साखरखेर्डा 2, जांभोरा 6,   सिं.राजा शहर : 2, संग्रामपूर शहर : 2, संग्रामपूर तालुका : टुनकी 1, बोडखा 1,        मूळ पत्ता रिसोड जि. वाशिम 1   संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 218 रूग्ण आढळले आहे.  त्याचप्रमाणे उपचारादरम्यान पोलीस लाईन, बुलडाणा येथील 55 वर्षीय पुरूष व दे. माळी ता. मेहकर येथील 75 वर्षीय पुरूष रूग्णाचा मृत्यू झाला आहे.  

      तसेच आज 273 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.

सुट्टी देण्यात आलेले रूग्ण पुढीलप्रमाणे :  कोवीड केअर सेंटर नुसार बरे होवून सोडलेले रूग्ण खामगांव : 28,  जळगांव जामोद : 30, सिं. राजा : 25, मेहकर : 13, शेगांव : 18, मलकापूर : 26, बुलडाणा : आयुर्वेद महाविद्यालय 56, चिखली : 12, नांदुरा : 16, दे. राजा : 22, लोणार : 19, मोताळा : 4.

   तसेच आजपर्यंत 24097 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 4033 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 4033 आहे. 

  आज रोजी 1474 नमुने अहवालाच्या प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 24097 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 5254 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 4033 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या  रूग्णालयात 1155 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार  सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 66 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

No comments:

Post a Comment